Pune Mumbai News Updates, 05 October 2026 : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राज्यात चांगले अधिकारी हवे असतील, तर आपण सर्वानी विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला हवा,” असे ते म्हणाले. पुढील काही दिवसांत विद्यार्थी पुणे बंद पाडतील, असा दावा करतानाच, “तसेच “येत्या दोन दिवसांत आम्ही अशी भूमिका घेऊ जी सरकारला कदाचित आवडणार नाही,” असा इशाराही रोहित पवारांनी दिला. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील राजकारण, MPSC आंदोलन, दुष्काळ आणि पाणीटंचाईसह विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहुयात.
मुंबईतील ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेल्या ‘कोल्हेकुई’ टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. “मोर्चाचं नाव गर्जना आणि तुम्ही म्हणताय कोल्हेकुई. आता जे कोल्हे आहेत त्यांना कोल्हेकुईच आठवणार. गर्जना वाघाची आहे ना. लाखो वाघ तिथे जमले होते,” असा टोला राऊतांनी लगावला. “यांना १० लाखांचा मोर्चा दिसत नाही, लाखोंचा मोर्चा दिसत नाही. त्यांच्या दृष्टीमध्ये दोष आहे,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि एसआयआरच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.
राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे. राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यासह नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमधील काही भागांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसला असून, शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून १९५२ पासून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाचा इतिहास सांगितला. १९५२-५६, १९५७, १९६१, १९६५-६६ तसेच २००२-०४ मध्येही अशा प्रकारचे पुनर्निरीक्षण झाल्याचे त्यांनी नमूद केले. पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाऊ नये आणि याद्या अचूक राहाव्यात, यासाठी एसआयआर ही दीर्घकाळापासूनची प्रक्रिया असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
कमी पाऊस, पाणीसाठ्याची स्थिती आणि एल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. धरणांमध्ये १० टक्के अतिरिक्त आपत्कालीन साठा राखला जाणार असून, पिण्याचे पाणी, पशुधन आणि चाऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. उद्योगांना वापरलेल्या पाण्यापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
Today’s Live News Updates from Maharashtra , 05 October 2026
मुख्यमंत्री ‘घाशीराम कोतवाल झाले’; आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांची टीका
ठाण्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा; शहराचा पारा ३७.३ अंशांवर
खबर पीक पाण्याची: परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे चिंता वाढली
एल निनोमुळे चिकन महाग? उष्णतेचा कोंबड्यांच्या वाढीवर परिणाम…
महिना अखेर पर्यंत चार कामगार संहिता सुधारणा केंद्राकडे
दुष्काळ निवारणासाठी आमदार निधीतून २५ लाखांपर्यंतची कामे
वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा; आमदार बालाजी किणीकरांचे आदेश
ठाण्यातील न्यूरोसर्जन डॉ. निलेश पोतदार यांना ‘एशियाज मॉडर्न हिरो अवॉर्ड’
Marathwada Drought 2026 : सविस्तर : दुष्काळग्रस्त मराठवाड्यातून स्थलांतर: जगणं आक्रसत जाताना… !
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू, पण विदर्भात 'ऑक्टोबर हिट' चा चटका; अकोला ३७.१ अंशांवर…
सुवर्णकन्या कुमकुम आणि रौप्यपदक विजेता यशदीपचे अमरावतीत जल्लोषात स्वागत; आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी
काँग्रेसचे आजी-माजी प्रदेशाध्यक्ष एकाच व्यासपीठावर! नागपूर पदवीधरसाठी अभिजीत वंजारींचे जोरदार शक्तिप्रदर्शन
नितीन गडकरी यांच्या घरावरील महिला मोर्चा स्थगित! गडकरींनी अशी काय जादू केली की पोलिसांची परवानगी तरीही मोर्चा मागे?

वाचा राज्यातील ठळक घडामोडी
