Maharashtra Politics Updates, 29 September 2026: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा मोर्चा अराजकीय असेल आणि त्यात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, फक्त देशाचा तिरंगा झेंडाच हातात असेल, असे सांगितले. राज आणि उद्धव ठाकरे यांनी या मोर्च्याची माहिती देत मोर्च्यात सामील व्हावं असं सर्व राजकीय पक्ष आणि जनतेला आवाहन केले.
यासह राज्यात सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. विविध भागातून दुष्काळाची भीषण परिस्थिती समोर येऊ लागली आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा यासाठी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना समस्या भेडसावू लागली आहे. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधीपक्ष रस्त्यावर उतरले असून, कुमार यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. यासह राज्यातील राजकारण, गुन्हे, कला, क्रीडा, संस्कृती, दुष्काळ परिस्थिती यासह विविध महत्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Mumbai Maharashtra Live News Today, 29 September 2026: महाराष्ट्र बातम्या लाईव्ह
परभणी जिल्ह्यातील पाच जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई
झुंडबळी! जमावाच्या मारहाणीनंतर चोराचा मृत्यू, बेलतरोडीत तणाव
वाघाच्या दहशतीतही शाळेसाठी ११ विद्यार्थ्यांची तीन किलोमीटर पायपीट; गोटाटोल्यातील चिमुकल्यांचा रोजचा ‘वनवास’
लोकसत्ता इम्पॅक्ट: वसईत अखेर झाडांच्या मुळांवरील काँक्रिटचा थर हटवला
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पहिल्या यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांनाही मदत मिळणार? मुख्यमंत्री काय म्हणाले?
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पहिल्या यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांबाबतही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. "तांत्रिक निकषांमुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष बाब म्हणून ज्या तालुक्यांचे पीक करपले आहे, मात्र ते निकषात बसत नाहीत, तिथे प्रत्यक्ष जमीन पाहणी करून त्यांना दुष्काळाचे सर्व फायदे देणार," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे.
https://twitter.com/AshokChavan1958/status/2104889564431368219?s=20
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्याकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 11 लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे कृषी उत्पन्न बाजार समिती खामगांवच्या वतीने मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
https://twitter.com/CMOMaharashtra/status/2104893368308572163?s=20
आमदार विलास भुमरे यांच्याकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1,51,000 एवढी मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण, जि. छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आमदार विलास भुमरे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
https://twitter.com/CMOMaharashtra/status/2104894046993052087?s=20
पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पिकांचे नुकसान; त्र्यंबकेश्वरमध्ये 'या' मागण्यांसाठी हरसूल व जव्हार रस्यावर आंदोलन
दि. बा. पाटील यांच्यानंतर भूमिपुत्रांच्या लढ्याची जबाबदारी सुरेश म्हात्रे यांच्याकडे, सागरी भूमिपुत्र महासंघाच्या कार्यक्रमात शरद पवारांचे विधान
अण्णासाहेब पाटील महामंडळाला आणखी १५० कोटी
केईएम रुग्णालयातील डॉक्टरांकडून ८१ वर्षांच्या हृदयाला नवसंजीवनी
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटके भरलेली एसयूव्ही आढळल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर वाहनमालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने तपास केला असून, विशेष NIA न्यायालयात खटला सुरू आहे.
‘स्टेमी महाराष्ट्र’ माध्यमातून ५० लाखांहून अधिक ईसीजी; ३४ जिल्ह्यांत २,४१५ स्पोक केंद्रे, ९९ हब रुग्णालयांचे जाळे
महाघोटाळा! भूदानाच्या जमिनींवर बिल्डरांचा दरोडा, एसआयटी मार्फत होणार चौकशी
२ ऑक्टोबरच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल दिपकेंनी मानले ठाकरे बंधूंचे आभार
२ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या CJP च्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल अभिजीत दिपके यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. "आपली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे," असे दिपकेंनी म्हटले आहे.
https://twitter.com/abhijeet_dipke/status/2104865644697010558?s=20
अप्रेंटिसशिप, फेलोशिप आणि तंत्रज्ञानातून करिअरच्या नव्या संधी; मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे प्रतिपादन
आयआयटीच्या चौकशी समितीने बोलावल्यास स्वतःची बाजू मांडू; साहिल वाकोडे यांच्या वडिलांचा दावा
संजय राऊत असं काय बोलले की राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासह पत्रकारांमध्येही पिकला हशा
राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या संवाद सुरु असल्याचे राऊतांनी वक्तव्य केले होते. याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर राऊतांनी स्पष्टीकरण देताना, "सगळ्यांचा एकमेकांशी संवाद सुरु आहे," असं वक्तव्य केल्याचे सांगितले. यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह पत्रकारांमध्येही हशा पिकला. या मुद्यावर सर्वांची चर्चा सुरु असून, राज ठाकरे देखील या प्रकरणी पुढाकार घेत असल्याचे राऊत पुढे म्हणाले. तसेच, त्यांनी पुढे पत्रकार परिषदेचाही दाखला दिला.
कयानी बेकरीचा परवाना रद्द, मुंबईतील इतर १२ आस्थापनांवर एफडीएची कारवाई; अस्वच्छतेमुळे निर्णय
"हा लढा फक्त राजकीय पक्षांचा नाही तर जनतेचा देखील", राज ठाकरे
ग्राहकांसाठी दागिने खरेदीची सुवर्णसंधी! जळगावात सोने, चांदी आणखी 'इतके' स्वस्त
खाई त्याला खवखवे म्हणत राज ठाकरेंचा भाजपाला टोला
निवडणूक आयुक्तांबाबत जे काही सांगितलं जातं आहे ते कपोलकल्पित आहे असं भाजपाने म्हटलं आहे. दरम्यान याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता राज ठाकरे म्हणाले आम्ही जर का निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढत असू तर मग भाजपाला काय त्रास होतो आहे? मराठीत एक म्हण आहे खाई त्याला खवखवे असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला आहे. तसंच मोर्चाच्या दिवशी इतर कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल. तिरंगा घेऊन आम्ही सगळे मोर्चात सहभागी होऊ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
"आजपर्यंत झालेल्या अपमानाचा हा विषय" - राज ठाकरे
"हा विषय एसआयआरचा आहे. आजपर्यंत झालेल्या अपमानाचा हा विषय आहे," असे राज ठाकरे इंडिया आघाडीकडून ऑफर आली तर? याप्रश्नावर बोलताना म्हणाले. विषय भरकट असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच, ०४ तारखेच्या मोर्चासाठी सर्व पक्षीयांना आमंत्रण असून, या मोर्चात कोणताही तिरंगा वगळता कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरु, लाईव्ह अपडेट्स
येथे पाहा पत्रकार परिषद
बारामतीत गुन्हेगारी घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळेंची पोस्ट
कसारा-कर्जत रेल्वे मार्गावर १२ नव्या लोकल न सोडल्यास १ डिसेंबरपासून जन आंदोलन
रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! तिकिटाबरोबरच 'हे' कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा भरावा लागणार दंड
चाळीसगावात १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. आईसोबत कामाच्या ठिकाणी गेलेल्या मुलीवर, आई पाणी भरण्यासाठी घरी गेल्याची संधी साधून दोन तरुणांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीनेही आरोपींना मदत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांत पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मध्य प्रदेशातील दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मोठी बातमी: MPSC च्या दोन सदस्यांवर टांगती तलवार, SIT कारवाईची शक्यता; अध्यक्षांना मात्र यापासून….

पत्नी कुंती यांच्यासमवेत आमदार रोहित पवार (फोटो - X/ Rohit Pawar)
