Maharashtra Political Crisis Live Updates | Maharashtra Karnataka Border Disputes Latest Updates | Loksatta

Maharashtra Breaking News: सीमाप्रश्नावरून राज ठाकरेंनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलं; वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर!

Maharashtra Karnataka Border Disputes Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय, सांस्कृतिक, गुन्हे विश्व आणि इतर घडामोडी एका क्लिकवर!

Maharashtra Breaking News: सीमाप्रश्नावरून राज ठाकरेंनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलं; वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर!
महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट

Mumbai Maharashtra Updates, 07 December 2022 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता आक्रमक भूमिका घेतली जात आहे. शरद पवार यांनी तर कर्नाटकमध्ये जाण्याचा अल्टिमेटमच दिला आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे सरकारवर सीमाप्रश्नावरून टीका केली जात आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलं, तरी या मुद्द्यावरून दिल्लीतील राजकीय घडामोडीही वाढू लागल्या आहेत.

Live Updates

Maharashtra Marathi Batmya Live, 07 December 2022: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

18:16 (IST) 7 Dec 2022
रुळाचा आवाज हेरून त्याने टाळली रेल्वेची मोठी दुर्घटना; पुणे विभागातील रेल्वे चालकाचा मध्य रेल्वेकडून गौरव

एक्स्प्रेस रेल्वे लोहमार्गावरून धावत असताना रुळांमधून येणाऱ्या आवाजातून त्याला दुर्घटनेची शक्यता जाणवली. प्रसंगावधान राखून त्याने तातडीने त्याची सूचना संबंधितांना दिली. तपासणी होताच रूळांना गंभीर तडा गेल्याचे स्पष्ट झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

सविस्तर वाचा

17:24 (IST) 7 Dec 2022
ठाण्यातील दिवा सीमावादाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे; दिवा परिसराचा नवी मुंबईत समाविष्ट करण्याची मागणी

एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला असतानाच, दुसरीकडे दिवा परिसर ठाणे महापालिका हद्दीतून वगळण्याची मागणी जागा हो दिवेकर या संस्थेने केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा

17:23 (IST) 7 Dec 2022
नागपूर: पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावर पावसाचे सावट

नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा यासाठी कामी लागली आहे. बातमी वाचा सविस्तर…

17:17 (IST) 7 Dec 2022
गुजरात भाजपा राखेल, काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले; संजय राऊतांचं मत

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. उद्या म्हणजेच ८ दिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी गुजरातमध्ये पुन्हा भाजपा सत्तेत येईल, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. तसेच गुजरातमध्ये काँग्रेसची मेहनत आणि यंत्रणा दोन्ही कमी पडली, असंही ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यांसदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

16:29 (IST) 7 Dec 2022
बारामतीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला लुटले; विद्यार्थ्याला विवस्त्र करुन ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

बारामती परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला धमकावून त्याच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. विद्यार्थ्याला एका शेतात नेऊन चोरट्यांनी विवस्त्र करुन ध्वनिचित्रफीत तयार केली.

सविस्तर वाचा

16:07 (IST) 7 Dec 2022
कळवा रेल्वे स्थानकात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली

कळवा रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावर २९ वर्षीय प्रवासी महिलेची सोनसाखळी चोरट्याने खेचून नेल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा

15:54 (IST) 7 Dec 2022
ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात क्लस्टरचा अडसर; आमदार संजय केळकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याची प्रक्रीया गेल्या काही वर्षांपासून सुरु असून काही प्रकल्पांची बांधकाम मंजुरी प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. परंतु महापालिका क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या क्लस्टर योजनेमुळे त्यातील अनेक प्रकल्प रखडल्याने विकासक हैराण झाले असून त्याचबरोबर घर खाली करणाऱ्या नागरिकांना विकासकाकडून घरभाडे मिळणे बंद होण्याची भिती वाटू लागली आहे.

सविस्तर वाचा…

15:53 (IST) 7 Dec 2022
पुणे : दुचाकी चोरट्याला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा

दुचाकी चोरल्या प्रकरणी चोरट्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. समाधान गणपत जगताप (वय २८, रा. यवत) असे शिक्षा सुनावलेल्या चोरट्याचे नाव आहे. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. सविस्तर वाचा…

15:52 (IST) 7 Dec 2022
पुणे : बौद्ध पारिभाषिक शब्दकोशात आता चिनी भाषेचाही समावेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभाग बौद्ध पारिभाषिक शब्दकोशाचा प्रकल्प सुरू आहे. आतापर्यंत या कोशामध्ये पाली, संस्कृत, तिबेटन, इंग्रजी या भाषांचा समावेश होता. मात्र आता  कोशाच्या पाचव्या भागापासून चिनी भाषेचा देखील समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. महेश देवकर यांनी दिली.

सविस्तर वाचा…

15:50 (IST) 7 Dec 2022
उघड्या मॅनहोलची समस्या : अनुचित प्रकार घडल्यास महानगरपालिकेला जबाबदार धरणार; उच्च न्यायालयानचा इशारा

उघड्या मॅनहोलमध्ये पडून कोणाचा मृत्यू झाला किंवा कोणी जखमी झाल्यास त्यासाठी महानगरपालिकेला जबाबदार धरले जाईल, असा इशारा उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई महानगरपालिकेला दिला. उघड्या मॅनहोलमध्ये पडून जखमी झालेल्यांना नुकसानभरपाईसाठी दिवाणी न्यायालयात जाण्याचे आदेश आम्ही देणार नाही.

सविस्तर वाचा…

15:33 (IST) 7 Dec 2022
‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडास आवर घालावा आणि…’ राज ठाकरेंचा सूचक इशारा!

मागील काही दिवसांपासून उफाळून आलेला महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद, काल बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची झालेली तोडफोड या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना सूचक इशारा दिला आहे. वाचा सविस्तर बातमी…

15:15 (IST) 7 Dec 2022
मुंबई: विलेपार्ले स्टुडिओ घोटाळ्यात अखेर महापालिकेची कारवाई

विलेपार्ले पश्चिम येथील गोल्डन टोबॅको कंपनीच्या आवारातील मोकळ्या भूखंडावर भले मोठे स्टुडिओ उभारण्याचा घोटाळा मान्य करीत महापालिकेने अखेर कारवाई करीत बेकायदा स्टुडिओंचे बांधकाम पाडून टाकले.

सविस्तर वाचा

15:08 (IST) 7 Dec 2022
Delhi MCD Election Result : अनेक मंत्री- सहा मुख्यमंत्र्यांसह कार्यकर्त्यांची फौज उतरवूनही दिल्लीत भाजप पराभूत

गुजरातप्रमाणे दिल्ली महापालिका निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. सलग चौथ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने डझनहून अधिक केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे ६ मुख्यमंत्री, ७ खासदार, शंभराहून अधिक पदाधिकारी असा फौजफाटा प्रचारात उतरवला होता. बातमी वाचा सविस्तर…

14:17 (IST) 7 Dec 2022
राज्यपालांचं करायचं काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने केला पिंपरी चिंचवडमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींच्या विचारधारेचा पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडेलोट करण्यात आला आहे. शहरातील चिखली परिसरात असणाऱ्या ऐतिहासिक जाधव गडावरून प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करत विचारधारेचा विरोध करण्यात आला आहे. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सविस्तर वाचा…

14:16 (IST) 7 Dec 2022
पुणे: आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती प्रक्रियेबाबत आक्षेप

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गट ब, क आणि ड संवर्गातील पदांसाठी राबवलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेवर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप नोंदवला आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या निवडयादीतील काही उमेदवारांची निवड आक्षेपार्ह असल्याचे नमूद करत संबंधित उमेदवारांच्या चौकशीची मागणीही करण्यात आली.

सविस्तर वाचा…

14:15 (IST) 7 Dec 2022
पुणे: तरुणीला ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी; प्रभात रस्ता परिसरातील घटना; तिघांच्या विरोधात गुन्हा

तरुणीवर ॲसिड टाकून तिला जीवे मारण्याची धमकी डेक्कन जिमखाना भागात परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ओंकार शिंगारे, सागर शिंगारे यांच्यासह त्यांच्या आईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ओंकार शिंगारे तरुणीच्या ओळखीचा आहे. सविस्तर वाचा…

14:14 (IST) 7 Dec 2022
पुणे : विद्यापीठाला तीन वर्षांसाठी सेट परीक्षेसाठी मान्यता

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तीन वर्षांसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता सेट परीक्षेच्या कालावधीत कोणताही खंड पडणार नाही. मार्चमध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी आतापर्यंत १ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 7 Dec 2022
मुंबई: कुर्ला, सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांवर हल्ला करण्याची धमकी

मुंबईतील कुर्ला, सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांवर एक व्यक्ती हल्ला करणार असल्याबाबत माहिती देणारा संदेश नवी मुंबईतील ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनला प्राप्त झाला होता. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पण सुदैवात त्यात तथ्य आढळले नाही.

सविस्तर वाचा

13:05 (IST) 7 Dec 2022
निर्दयीपणाचा कळस! पायावर पाय ठेऊन बसल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाची बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

भंडारा : शाळा सुटल्यानंतर वऱ्हांड्यात पायावर पाय ठेऊन बसल्याचे पाहून भडकलेल्या एका शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. निर्दयीपणाचा कळस गाठणारी ही घटना तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये घडली. बातमी वाचा सविस्तर…

13:02 (IST) 7 Dec 2022
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात गृह खात्याच्या निवृत्त उपसचिवांची साक्ष

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मंगळवारी गृहखात्याचे निवृत्त उपसचिव शिरीष मोहोळ यांची साक्ष नोंदविण्यात आली. बचाव पक्षाकडून त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्याच्या आदेशावर गृह खात्याचे तत्कालीन उपसचिव म्हणून शिरीष मोहोळ यांनी स्वाक्षरी केली होती. सविस्तर वाचा…

13:02 (IST) 7 Dec 2022
पुणे : नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना; प्रशासनाकडून आज प्रत्यक्ष पाहणी

कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी खासगी संस्थेने सुचविलेल्या तात्पुरत्या उपाययोजना अंतिम टप्प्यात आहेत. या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून बुधवारी सकाळी साडेदहा वाजता केली जाणार आहे. नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल खासगी संस्थेकडून लवकरच प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 7 Dec 2022
साई रिसॉर्ट कारवाई प्रकरण : ‘त्या’ सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, सोमय्यांची याचिकेद्वारे मागणी

दापोलीतील साई रिसॉर्टची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रिसॉर्टच्या बांधकामावर पाडकाम कारवाई केली नसल्याचा रत्नागिरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेला दावा न्यायालयाची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर अवमान कारवाई करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केली. सविस्तर वाचा…

12:59 (IST) 7 Dec 2022
सांगली : पाच दिवस चकवा देणाऱ्या सांबराला पकडण्यात वनविभागाला यश

सांगलीतील कुपवाड परिसरामध्ये गेल्या पाच दिवसापासून वनविभागाला चकवा देणाऱ्या सांबराला रेस्क्यू ऑपरेशन करत पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. यासाठी वन विभागाचे पथक गेल्या पाच दिवसापासून दिवस रात्र रेस्क्यू ऑपरेशन मध्ये होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास वनविभागाने या सांबराला पकडले . सविस्तर वाचा…

12:57 (IST) 7 Dec 2022
टिटवाळ्याजवळील सिग्नल बिघाडामुळे लोकल उशिरा

मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी सकाळी साडे सात वाजता सिग्नल यंत्रणेत काही वेळ बिघाड झाला होता. त्यामुळे कल्याणकडून कसारा आणि कसाराकडून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल काही वेळ ठप्प होत्या.

सविस्तर वाचा

12:30 (IST) 7 Dec 2022
नागपुर: बंटी बबलीने सुफी फंड आणला आणि…..

सुफी फंडमध्ये गुंतवणुकीवर जास्त व्याज परताव्याचे आमिष दाखवून शहरातील ३४२ लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका दांम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या दाम्पत्याने ६० लाखांनी फसवणूक केल्याचे सांगितले जात असले तरी फसवणुकीची रक्कम कोट्यवधीत असल्याची माहिती समोर येत आहे. बातमी वाचा सविस्तर…

12:28 (IST) 7 Dec 2022
कल्याण मधील कोटक महिंद्रा बँकेत बनावट नोटा जिरवण्याचा ग्राहकाचा प्रयत्न

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेत एका ग्राहकाने जवळील बनावट पाचशेच्या चलनी नोटा एटीएमच्या माध्यमातून भरल्या. या नोटांच्या माध्यमातून आपण खऱ्या नोटा नंतर बँकेतून काढू हा विचार ग्राहकाने केला.

सविस्तर वाचा

12:17 (IST) 7 Dec 2022
ताडोबातील ‘ती’ जखमी वाघीण आणि दोन बछडे सुरक्षित; रानडुकराची केली शिकार

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जखमी वाघिणीच्या हालचालीवर ‘कॅमेरा ट्रॅप’, प्राथमिक बचाव दल (पीआरटी) व वनकर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे नियमित लक्ष ठेवण्यात येत आहे. ही वाघीण व तिचे दोन बछडे सुरक्षित असून वाघिणीने रानडुकराची शिकार केल्याची एक चित्रफीत समोर आली आहे. बातमी वाचा सविस्तर…

11:56 (IST) 7 Dec 2022
समृध्दीची पाहणी, मेट्रोची सफर, ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा आणि अन्य काही…. कुठे कुठे जाणार पंतप्रधान?

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा जसजसा जवळ येत आहे तसतशी या दौ-याबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते अनेक प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. बातमी वाचा सविस्तर…

11:54 (IST) 7 Dec 2022
पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी

भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा

11:53 (IST) 7 Dec 2022
मुंबई: अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा; पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचे आदेश

अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्याला सार्वजनिक बांधकाम विभागातील कोट्यांतर्गत पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना मंगळवारी दिले. विद्यापीठ सार्वजनिक रोजगार योजनेंतर्गत शारीरिक अपंगत्व असलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांची नियुक्ती करते.

सविस्तर वाचा

11:43 (IST) 7 Dec 2022
पुणे : मेट्रोची भूमिगत मार्गामध्ये चाचणी यशस्वी; रेंजहिल डेपो ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकापर्यंतचे काम पूर्ण

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत महत्त्वाचा टप्पा असलेल्या भूमिगत मेट्रो मार्गाच्या काही भागात मेट्रोची मंगळवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. रेंजहिल डेपो ते रेंजहिल उन्नत मेट्रो स्थानक आणि रेंजहिल उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानक या तीन किलोमीटर अंतराच्या टप्प्यात मेट्रोची चाचणी घेण्यात आली. सविस्तर वाचा…

11:42 (IST) 7 Dec 2022
पुणे : ऑनलाइन माध्यमातून नेमलेल्या नोकरानं ज्येष्ठ दांपत्याचे लुटले २४ लाखांचे दागिने

दाम्पत्याला गुंगीचे ओैषध देऊन नोकराने ४० तोळे सोन्याचे दागिने, रोकड, हिरेजडीत दागिने असा २४ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना मुंढवा भागातील एका सोसायटीत घडली. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नरेश शंकर सौदा (वय २२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेचे आई-वडील निवृत्त झाले आहेत. आई-वडिलांची देखभाल; तसेच घरातील कामे करण्यासाठी त्यांना नोकराची गरज होती. सविस्तर वाचा…

11:39 (IST) 7 Dec 2022
तब्बल आठ टीएमसी पाणी गळतीचे खापर पुणेकरांवर, महापालिका प्रशासनाचा अजब कारभार

महापालिकेकडून पाणी वितरणामध्ये आठ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी गळती होत असल्याने टीकेला सामोरे जावे लागलेल्या महापालिका प्रशानसाने पाणी गळतीचे खापर पुणेकरांवर फोडण्याचा प्रकार केला आहे. समान पाणीपुरठा योजनेअंतर्गत शहरातील निवासी क्षेत्रात जलमापक बसविण्यात आले नसतानाही जलमापकानुसार पाणी देयके आकारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिकेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

11:39 (IST) 7 Dec 2022
पुणे : मावळमधील मंडल अधिकारी महिलेसह दोघांना पकडले

सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २० हजारांची लाच घेणाऱ्या वडगाव मावळातील मंडल अधिकारी महिलेसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. या प्रकरणी मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर (वय ५४) आणि संभाजी लोहोर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

11:38 (IST) 7 Dec 2022
मुंबई : मलिक खरोखर गंभीर आजाराने त्रस्त ?, जामीन नाकारताना विशेष न्यायालयाचा प्रश्न

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे खरोखर गंभीर आजाराने त्रस्त आहेत, तर त्यांच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) केलेल्या मागणीला त्यांनी स्वत:हून परवानगी का दिली नाही ? असा प्रश्न विशेष न्यायालयाने त्यांना जामीन नाकारताना उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा…

11:37 (IST) 7 Dec 2022
मुंबई : पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक

कुर्ला रेल्वे स्थानकातून पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला रेल्वे स्थानकात रात्रीची शेवटी लोकल चुकल्याने पाच वर्षांच्या मुलासह त्याची आई स्थानकातच थांबली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे मुलाचे अपहरण झाल्याचे तिच्या लक्षात आले. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी तपास करून आरोपी रेहाना शेख (२४) हिला सोमवारी अटक केली. सविस्तर वाचा…

11:20 (IST) 7 Dec 2022
भाजप आमदार होळींची स्वपक्षीयांविरोधात पोलीसांत तक्रार; ‘मेक इन गडचिरोली’प्रकरणी अंतर्गत वाद चव्हाट्यावर

गडचिरोली : ‘मेक इन गडचिरोली’ प्रकल्पाच्या माध्यमातून लाखोंचा अपहार केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांनी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांविरोधात बदनामी करीत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केल्याने भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.आ. होळी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत आपल्यावरील आरोप निरर्थक असून बदनामी करणाऱ्यांविरोधात एक कोटीचा मानहानीचा दावा दाखल केल्याची माहिती दिली. बातमी वाचा सविस्तर…

11:12 (IST) 7 Dec 2022
Parliament Winter Session: “खासदारांच्या वेदना समजून घ्या, त्यांना संधी द्या,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व पक्षाच्या प्रमुखांना आवाहन

नवे किंवा तरुण खासदार यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना सभागृहात जास्त संधी द्यावी. त्यांचा सभागृहाच्या कामकाजातील सहभाग वाढला पाहिजे. सभागृहात होणारा गोंधळ, स्थगिती यामुळे खासदारांचं नुकसान होत असल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. त्यांच्या वेदना तुम्ही समजून घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांना आणि सभागृह नेत्यांना केलं आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर बातमी

10:59 (IST) 7 Dec 2022
ठाणे: कामे निकृष्ट दर्जाची झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

शहरात सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देत हि कामे निकृष्ट दर्जाचे झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिला आहे. बातमी वाचा सविस्तर…

10:14 (IST) 7 Dec 2022
“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला शक्य नाही”, राऊतांचे गंभीर आरोप; म्हणाले, “तीन महिन्यांपूर्वी…”

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशात काल बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. याविरोधात सर्वच स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतान खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांना केला आहे. सविस्तर वाचा –

10:01 (IST) 7 Dec 2022
नागपूर: निवडणूक जिंकले आणि चक्क विद्यापीठाच्या इमारतीतच….

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभा आणि विद्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये विद्यापीठ शिक्षकांमधून निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी प्रशासकीय इमारतीमध्ये आज बुधवारी चक्क मेजवानीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला ‘लंच पार्टी’ असे नाव देण्यात आल्याने ही मेजवानी शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. बातमी वाचा सविस्तर…

10:01 (IST) 7 Dec 2022
नागपूर: सांताक्लॉज पावला, पुणे, मुंबईकरिता आता….

नाताळच्या सुटीत रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने नागपूरहून मुंबई आणि पुण्यासाठी या काळात ३० रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या आठवड्यातून एकदा राहणार असून पुणे-अजनी दरम्यान दहा फेऱ्या होणार आहेत. मुंबई-नागपूर एक्सप्रेस दहा दिवस आणि पुणे-नागपूर एक्सप्रेस देखील दहा दिवस धरणार आहे.बातमी वाचा सविस्तर…

10:00 (IST) 7 Dec 2022
नवी मुंबई : विवाहितेची मुलासह सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलासह ७ व्या मजल्यावरून उडी मारली. यात तिचा मृत्यू झाला.  सुदैवाने तिचा ५ वर्षीय मुलगा वाचला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पतीस अटक करण्यात आली असून लवकरच नणंद आणि सासू यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.बातमी वाचा सविस्तर…

09:58 (IST) 7 Dec 2022
…तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात असेल – रोहित पवार

पवार यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. शरद पवार फक्त बोलत नाहीत तर ते करून दाखवतात. तसे झाले तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकमध्ये असेल, असे रोहित पवार म्हणाले

वाचा सविस्तर

09:56 (IST) 7 Dec 2022
सीमावाद चिघळला: “आमच्या दोघांचंही एकमत झालं आहे की…”

कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांची फोनवरुन चर्चा

वाचा सविस्तर

महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट

महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

First published on: 07-12-2022 at 09:54 IST
Next Story
“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं…” जितेंद्र आव्हाडांची अक्षय कुमारच्या लूकवर संतप्त प्रतिक्रिया