Mumbai Rain Local Train Updates Marathi News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात धुवाँधार पाऊस कोसळत असून आजही राज्यातील विविध भागात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. मुंबई-ठाण्यात पाऊस ओसरला असला तरीही नाशिकला आज रेड अलर्ट जारी करून शाळा, कॉलेज आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, काल मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने विरोधकांनी यावर टीका सुरूच ठेवली आहे. आज पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Mumbai Pune Thane Live News Updates, 6 July 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

18:22 (IST) 7 Jul 2026

निवृत्तीविषयक देयकांमधील विलंब चिंताजनक; आर्थिक अडचणी हे कारण नाही, 'बेस्ट'ला कोट्यवधींचे व्याज देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

'बेस्ट' उपक्रमाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे उपदान (ग्रॅच्युइटी) आणि निवृत्तीवेतन मिळण्यास झालेला विलंब अत्यंत चिंताजनक असल्याची टिप्पणी करून मुंबई उच्च न्यायालयाने त्याबाबत नाराजी व्यक्त केली. ...सविस्तर बातमी
18:12 (IST) 7 Jul 2026

मराठवाड्यासाठी मुंबईतून दोन नव्या रेल्वे ,एलटीटी–नांदेडच्या दोन साप्ताहिक गाड्या सुरू

गाडी क्रमांक १७६६५/१७६६६ आणि १७६६७/१७६६८ ची नियमित सेवा जुलै महिन्यापासून सुरू होणार ...सविस्तर वाचा
18:12 (IST) 7 Jul 2026

महापालिकेला दोष देणे नागरिकांनी थांबवले पाहिजे, 'आपणच गटारे तुंबवतो, जमिनी बळकावतो… मुंबईतील पूरस्थिती ही 'आपलीच निर्मिती', मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबईच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचलेले पाहणे हेच आपल्या नशिबात आहे. आपण याबाबत काहीच करू शकत नाही, असेही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती घुगे यांनी म्हटले. ...सविस्तर वाचा
18:06 (IST) 7 Jul 2026

Video जळगाव रहस्यमय हत्याकांड : मुख्यमंत्री म्हणाले; “पोलीस विभागासाठी लज्जास्पद बाब, निलंबनच नव्हे तर…”

दोषी पोलिसांवर केवळ निलंबन नाही तर थेट बडतर्फी आणि फौजदारी कारवाई करणार; देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात इशारा ...सविस्तर बातमी
17:50 (IST) 7 Jul 2026

झाडांनी अडवली बेस्टची वाट, तीन दिवसात ४०० बसमार्गांना फटका, बेस्टचे २ कोटीचे उत्पन्न पाण्यात

रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत शहरात ३०० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. झाडे रस्त्यावर पडल्याने बेस्टची वाहतूक कोलमडली. झाड हटविण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने बेस्ट प्रशासनाने बस मार्गांमध्ये बदल केला. ...सविस्तर वाचा
17:39 (IST) 7 Jul 2026

विदर्भात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता; हवामान खात्याचे भाकीत नेमके काय? जाणून घ्या…

अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूरसह संपूर्ण विदर्भात १० ते १३ जुलैदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. ...वाचा सविस्तर
17:38 (IST) 7 Jul 2026

पपईच्या पानाच्या रसापासून बनवलेले औषध ठरतेय कर्करोग रुग्णांसाठी वरदान ; टाटा रुग्णालयात केमोथेरपी उपचार पद्धतीसाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार सुरू

लाखो रुपयांचे महागडे इंजेक्शन आणि उपचार आता अवघ्या ३०० रुपयांच्या आयुर्वेदिक कॅरिपील गोळीमुळे शक्य ...अधिक वाचा
17:35 (IST) 7 Jul 2026

मुंबई : दोन दिवसांत ८०० विमानांना विलंब, ५० पेक्षा जास्त विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप

मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबई विमानतळावरील धावपट्टी रविवारी एक तास बंद करण्यात आली होती. तर सोमवारी पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी झाल्याने हवाई वाहतुकीला फटका बसला. ...सविस्तर वाचा
17:21 (IST) 7 Jul 2026

दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये नागपूरच्या महिलांचा विनयभंग; अश्लील शेरेबाजी, छेडछाड..नेमकं काय घडलं?

रेल्वे हेल्पलाइनवर तक्रार करूनही वेळेत मदत नाही; संतापलेल्या प्रवाशांनी नैनी रेल्वे स्थानकावर इंजिनसमोर उतरून रोखली गाडी. ...वाचा सविस्तर
17:16 (IST) 7 Jul 2026

इचलकरंजी बनली चिखलकरंजी! नागरिक संतप्त; महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश

भररस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे, चिखलामुळे दुचाकीस्वारांचे, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे अपघात नित्याचे झाले आहेत. विकास हवा आहे, पण तो लोकांचे जीव धोक्यात घालून नको, अशी भावना आता इचलकरंजीतील प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहे. ...सविस्तर बातमी
16:50 (IST) 7 Jul 2026

जुलैच्या अवघ्या सात दिवसांत ७७३ मिमी पावसाची नोंद, गतवर्षीच्या तुलनेतही वर्षाव अधिक

सामान्यतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरी २१२.८ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. ...सविस्तर वाचा
16:14 (IST) 7 Jul 2026

कांदाटी खोऱ्यात निसर्गाचा प्रकोप; दरडी झाडे कोसळल्याने १६ गावांचा संपर्क तुटला, भात शेती उध्वस्त

यामुळे उचाट-शिंदी-रघुवीर घाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, खोऱ्यातील १६ गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. ...सविस्तर बातमी
16:13 (IST) 7 Jul 2026

मुख्यमंत्र्यांच्या नावाने घर टॅक्स पावती, उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या नावे रेशन कार्ड! रमाई आवास योजनेत घोटाळ्याचा दानवेंचा आरोप

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारतर्फे दिली. ...सविस्तर बातमी
15:57 (IST) 7 Jul 2026

कोयना पाणलोटक्षेत्रात पावसाचे तांडव; धरणात २४ तासांत आठ टीएमसीहून अधिक पाण्याची विक्रमी आवक, महाबळेश्वरला सलग दुसर्‍या दिवशीही तुफान पाऊस

महाबळेश्वर येथे १५.७५ इंच (४०० मिमी) पावसाची नोंद झाली असून वेण्णा लेक जवळील पूल कोसळला आहे तर केळघर घाटात दरड कोसळली आहे. ...सविस्तर वाचा
15:52 (IST) 7 Jul 2026

LIVE : शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाल्या...

आमची भूमिका सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची आहे. हे (सत्तेत सहभागी होण्याबाबत) आमच्याबाबत सातत्याने बोललं जातंय. असाच कारभार सुरू राहिला तर आम्हाला लढावंच लागेल आणि सत्ता घ्यावी लागेल - सुप्रिया सुळे</p>

15:20 (IST) 7 Jul 2026

…तर महाराष्ट्रातही लाखोंची नावं मतदार यादीतून बाहेर? SIR वर प्रश्नचिन्ह, BLO मतदारांच्या घरी पोहोचलेच नाहीत!

शिक्षकांवर शाळा सांभाळून तर आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांवर दैनंदिन कामाचा ताण; दूरच्या नियुक्तीमुळे अधिकारी संभ्रमात. ...वाचा सविस्तर
15:06 (IST) 7 Jul 2026

का अडकतात महापालिकेचे प्रकल्प? कारण आले पुढे, मंत्रालयासाठी….

विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च आणि कालावधी वाढण्याची भीती; ९०० कोटींच्या सिमेंट रस्ता टप्पा-५ चीही कोंडी होण्याची शक्यता. ...वाचा सविस्तर
14:58 (IST) 7 Jul 2026

डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकाकडून जीवघेणी मारहाण

कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालयातील दोन डाॅक्टर आणि दोन परिचारिकांना शिंदे शिवसेनेच्या एका नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या उन्मत्त नगरसेवकाने सोमवारी संध्याकाळी जीवघेणी मारहाण केली. ...वाचा सविस्तर
14:56 (IST) 7 Jul 2026

दीक्षाभूमी स्मारक समितीचा विषय अंतर्गत, सरकारचा हस्तक्षेप नाही… महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, दीक्षाभूमी विकास आराखडा १५ दिवसांत..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार दीक्षाभूमीचा भव्य विकास आराखडा तयार; पुढील तीन वर्षांत कामे पूर्ण करणार. ...अधिक वाचा
14:18 (IST) 7 Jul 2026

NVS : नवोदय विद्यालय प्रवेश; ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, महत्वाचे म्हणजे…

वर्धा जिल्ह्यासह राज्यातील पाचवीत शिकणारे विद्यार्थी पात्र; जाणून घ्या पात्रता निकष, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रे ...अधिक वाचा
14:13 (IST) 7 Jul 2026

सुरक्षित वारीसाठी ८१ सराईत गुन्हेगारांची परेड; सोलापूर ग्रामीण पोलिसांचे 'हायटेक' नियोजन

यंदाच्या वारीत ५जी नेटवर्क आधारित यंत्रणा आणि आधुनिक सुरक्षा साधनांचा वापर करून हायटेक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. ...सविस्तर वाचा
14:11 (IST) 7 Jul 2026

पावसाच्या विलंबाने ५९ टक्के क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या; परंपरागत पिकांकडेच शेतकऱ्यांचा कल…

जूनमधील कोरड्या खंडानंतर जुलैच्या सुरुवातीला दमदार पाऊस; ओलावा मिळताच बळीराजाकडून पेरण्यांना वेग ...अधिक वाचा
13:44 (IST) 7 Jul 2026

"माझी आई खोकता खोकता बेशुद्ध व्हायची", कबुतरप्रश्नी राम कदमांनी सभागृहात मांडला महत्त्वाचा मुद्दा

ज्या माय माऊलीने मला जन्म दिला ती माझी आई धोंडूबाई कदम. माझी आई देवाघरी जात असताना जिने आयुष्यभर नामस्मरण आणि सद्गुरू वामनराव पै यांची विश्वप्रार्थना केली, तिला आयुष्याची दोन वर्षे मरणासन्न अवस्थेत घालवावी लागली. जे राम कदमच्या आईच्या बाबतीत घडलं, असं महाराष्ट्रातील मुंबईतील कोणाच्याही आईच्या बाबतीत घडू नये, म्हणून मी काही मुद्दे मांडतो. माझ्या आईला फुफ्फुसांचा आजार झाला होता. याला जगात औषध नाही. यात रुग्णाला २४ तास ऑक्सिजनवर ठेवले जाते. यासाठी जुजबी औषध आले आहेत, तेवढाच त्यावर उपचार आहे. हा आजार वाढत जातो, त्याप्रमाणे वेदना वाढत जातात. माझी आई १५-१५ मिनिटे खोकायची. खोकत असातना बेशुद्ध व्हायची. भारतवर्षाला असे ९ लाख रुग्ण होतात.

जीवदया प्रेमी म्हणून माझी घाटकोपरमध्ये ओळख आहे. कबुतरांना दाणे टाकतो त्यामुळे हा आजार बळावतो. कबुतरांच्या ड्रॉपमुळे पाच प्रकारचे आजार होतात. या कोणत्याही आजारांवर उपचार नाहीत. कबुतरांना दाणे टाकू नये, या मताचा मी नाही. माणसाला जगण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे जनावरांनाही आहे.

जर कबुतरांच्या ड्रॉपमुळे गंभीर आजार होत असतील, तर त्याचं रिलोकेशन आणि ट्रॅपिंग करावं. जेणेकरून मनुष्यवस्ती आहे, तेथील लोकांना याचा त्रास होऊ नये. नॅशनल पार्कमध्ये ५० हजार एकेरची जागा आहे. तिथे पुनर्वसन करावं. माझी आई गेली. देवाभाऊंचं सरकार आहे, संवेदनशील विचारांचं सरकार आहे. कबुतरांचा विचार करावा, मग माणसांचाही विचार करावा. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की, सभागृहाने तज्ज्ञांची समिती नेमावी आणि कबुतरांसाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, जेणेकरून लोकांचे प्राण वाचतील., असं राम कदम म्हणाले.

13:28 (IST) 7 Jul 2026

संविधानाचे धडे घेणाऱ्या कायद्याच्या विद्यार्थ्यांची दडपशाही,अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप; राष्ट्रीय विधि विद्यापीठामधील प्रकार

विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत निवेदनात धक्कादायक आरोप; 'ओपन हाऊस' बैठकीत प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रशासनाकडून पाळत ठेवल्याचा दावा. ...वाचा सविस्तर
13:27 (IST) 7 Jul 2026

गत वर्षीच्या तुलनेत यंदा १८.९ टक्के कमी पाऊस; अकोला जिल्ह्यात १५ टक्के पावसाची तूट; पुढील दोन दिवसांत…

अकोट आणि तेल्हारा तालुक्यांमध्ये मुसळधार हजेरी, उर्वरित ५ तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची ओढ ...सविस्तर वाचा
13:22 (IST) 7 Jul 2026

आमदार संजय मेश्राम यांच्या फ्लॅटमध्ये चोरी; धनादेश वटवताना आरोपी अटकेत

नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांच्या विहीरगाव येथील हेरिटेज अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून ७५ हजार रुपयांची रोकड आणि धनादेश लंपास केला. पावसाळी अधिवेशनासाठी आमदार मेश्राम मुंबईत असल्याचा फायदा आरोपीने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

13:20 (IST) 7 Jul 2026

खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या संघर्षमय जीवनावरील‘प्रहार’ चित्रपट ऑगस्टमध्ये पडद्यावर

सोलापूर दौऱ्यावर आले असताना ॲड. निकम यांनी स्वतः या आगामी चित्रपटाचा ट्रेलर दाखवत अधिकृत माहिती दिली. ...सविस्तर वाचा
12:58 (IST) 7 Jul 2026

५० हजार वारकऱ्यांना मिळणार रेनकोट; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्हा परिषदेला सुचना

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेला याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत ...सविस्तर वाचा
12:58 (IST) 7 Jul 2026

सोलापूर जिल्हा कोरडाठाकच; पण पुण्यातून येणाऱ्या पाण्यामुळे तीन दिवसांत उजनीत वाढले ८ टक्के पाणी

दौंड आणि बंडगार्डन येथून होणाऱ्या मोठ्या विसर्गामुळे उजनी धरण लवकरच मृतसाठ्यातून बाहेर येण्याची शक्यता ...वाचा सविस्तर

Mumbai Pune rain IT park work from home demand | Supriya Sule letter to Devendra Fadnavis | Hinjawadi IT employees traffic jam Pune | Maharashtra monsoon live updates IT companies Forum for IT Employees

मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस, IT कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्या, सुप्रिया सुळेंची मागणी (संग्रहित छायाचित्र)

Mumbai Pune Thane Live News Updates, 6 July 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा