Maharashtra Politics, Crime Updates, 30 September 2026 राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला. यासोबतच विद्यार्थ्यांची फीस देखील बोर्डाने माफ केली. एल निनोचा मोठा प्रभाव राज्यात बघायला मिळतोय. २०२७ मध्ये एल निनोचे संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांची हत्या करण्यात आली. मारेकरी तोंडाला रूमाल बांधून आले होते असं सांगण्यात आलं आहे. माझ्या वडिलांना रेकी करून संपवलं असा आरोप आता पुर्णेकर यांचा मुलगा राम पु्र्णेकर याने केला आहे. यासह सगळ्याच घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Mumbai Maharashtra Live News Today, 30 September 2026 माझ्या वडिलांना रेकी करून संपवण्यात आलं, प्रदीप पुर्णेकर यांचा मुलाचा आरोप; यासह महत्त्वाच्या घडामोडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती देण्यात जनहित नाही; उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांचे अपील फेटाळले
आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबियांची घेतली भेट
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही हल्लेखोर प्रदीप पूर्णेकर यांच्या मनोरमा नगर येथील कार्यालयात घुसले आणि हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये प्रदीप पूर्णेकर हे गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेनंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी उपमहापौरांचे पोलिस आयुक्तांना पत्र
मानपाड्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येने खळबळ उडाल्यानंतर आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे. आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईक व समर्थकांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला असतानाच, भाजपचे नेते व ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पोलिस आयुक्तांना पत्र देत सखोल चौकशी करून हत्येमागील हेतू व संपूर्ण वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणण्याची मागणी केली आहे.
कर्मचाऱ्यांवरील कथित छळवणुकप्रकरणी मुंबई महापालिकेचा विधी विभाग चर्चेत
मुंबईत ९७ टक्के गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन
बोरिवलीत ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत ३५ बांधकामांवर कारवाई
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: जगभरातील संस्थांचे आयआयटी मुंबईला पत्र; 'पालक, अनुसूचित जाती समाजाची माफी मागा'
बोरिवलीत १.३८ कोटींच्या हेरॉईनसह सराईत तस्कराला बेड्या; अमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई
प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या घटनेनंतर कापूरबाडी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचा ठिय्या
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही हल्लेखोर प्रदीप पूर्णेकर यांच्या मनोरमा नगर येथील कार्यालयात घुसले आणि हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये प्रदीप पूर्णेकर हे गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी आता कापूरबाडी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी ठिय्या दिला आहे.
पीएचडी संशोधकांनी संशोधनातून नवोन्मेषाला व्यावसायिक रूप द्या, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे आवाहन
MPSCच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचा सवाल; ‘समान न्यायाचा निकष आमच्यासाठी वेगळा का?’, कोणावरही आरोप नाहीत पण…
ठाण्यात टपऱ्या, महामार्गावर नशेचा खुला बाजार; संजय केळकर यांच्याकडून पोलिसांना १३ ठिकाणांची यादी
पुणे: ‘एचसीएमटीआर’ च्या कामाला नोव्हेंबर पासून सुरुवात ! काय आहे महापालिकेचे नियोजन
प्रदीप पूर्णेकर हत्येच्या कटात मित्राचाच सहभाग,पोलीस तपासानंतर पप्या शिंदे याला अटक; अन्य चार आरोपींचा शोध सुरू
अंबरनाथच्या महालक्ष्मी नगरमध्ये प्लास्टिकविरोधात कारवाई; ११ किलो प्लास्टिक जप्त
त्र्यंबकेश्वरचे कुशावर्त तीर्थ ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद; पितृपक्षात भाविकांची गैरसोय, विधींसाठी पर्यायी घाटांची व्यवस्था
शिशु अन्नाच्या प्रचारावर कडक निर्बंध; फॉर्म्युला दुधाच्या जाहिराती, मोफत नमुने, कॅशबॅक, इन्फ्लुएन्सर प्रचाराला बंदी
प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या घटनेनंतर कापूरबाडी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचा ठिय्या; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही हल्लेखोर प्रदीप पूर्णेकर यांच्या मनोरमा नगर येथील कार्यालयात घुसले आणि हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये प्रदीप पूर्णेकर हे गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी आता कापूरबाडी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी ठिय्या दिला आहे.
"राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्यात"; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या घटनेनंतर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
हाफकिनमधील १९५ कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना; महामंडळावर दरमहा साडेपाच लाखांचा आर्थिक भार
रोहित पवार यांची शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारवर टीका
नाशिक येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांचा दुष्काळी दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरसकट दुष्काळ जाहीर न केल्याबद्दल आणि अपुऱ्या मदतीबद्दल त्यांनी सरकारला जबाबदार धरले. “झोपले होते हे सरकार,” असे म्हणत त्यांनी ऑगस्टपासूनच सर्वेक्षण करण्याची आवश्यकता होती असे प्रतिपादन केले.
जपानमधील उद्योजकांना पुण्यात 'या' सुविधा देण्याची महापौरांची घोषणा !
बाळासाठी ‘हेल्थ मिक्स’ खरेदी करताय? आकर्षक नावामागे काय दडलेय? ‘एफडीए’च्या आदेशात गंभीर नोंदी!
मिरा भाईंदरच्या रोजगार महाकुंभला उत्स्फूर्त प्रतिसाद; एक हजारहून अधिक रोजगार संधी, १९ नामांकित कंपन्यांचा सहभाग
माजी खासदाराच्या गाडीची धडक; महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, पत्नीसह अन्य एक जखमी
टिटवाळा, खंबाळपाडा, नेवाळीमध्ये १८ जणांकडून ६३ लाखांची वीजचोरी
‘नशामुक्ती’च्या घोषणेत गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ ?
बडतर्फ पोलीस अधिकरी सचिन वाझेच्या जामिनाला अंतरिम स्थगिती, एनआयएला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाची शक्यता

प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या (फोटो-सोशल मीडिया)
ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांची हत्या करण्यात आली. मारेकरी तोंडाला रूमाल बांधून आले होते असं सांगण्यात आलं आहे. माझ्या वडिलांना रेकी करून संपवलं असा आरोप आता पुर्णेकर यांचा मुलगा राम पु्र्णेकर याने केला आहे.
