Latur ZP Election Winner List 2026: लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी, ०९ फेब्रुवारी) जाहीर झाला. लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या ५९ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी शनिवारी (०७ फेब्रुवारी) मतदान पडले होतेय जिल्हा परिषदेसाठी २४२ तर पंचायतच समितीसाठी ४१९ उमेदवार रिंगणात होते. यावेळी जिल्ह्यात ६३.७९ टक्के मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला होता.

१४२ टेबलांवर मतमोजणी

जिल्ह्यात लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, चाकूर, उदगीर, देवणी, जळकोट, शिरुर अनंतपाळ आणि अहमदपूर या दहा तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु झाली. जिल्ह्यात १४२ टेबलांवर मतमोजणी झाली. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये गेल्या काही वर्षात भाजपाने पक्ष मोठा करण्यास खूप प्रयत्न केले आहेत. या निवडणुकीत या दोन्ही पक्षात थेट संघर्ष पाहायला मिळत आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांचा असा आहे निकाल

काँग्रेस २३ जागांवर विजयी, भाजपा – १८, शिवसेना (शिंदेसेना) – ०१, राष्ट्रवादी – १२, उद्धव ठाकरे गट – ०१, शरद पवार गट – ०१, मनसे – ०१ आणि अपक्ष ०२ उमेदवार विजयी झाले आहेत.

लातूर जिल्हा परिषदेतील विजय उमेदवारांची यादी

खंडाळी गट – अशोक कासले (अपक्ष)

आर्वी गट – राजश्री देशमुख (काँग्रेस)

पानगाव गट – सुनील नागरगोजे (मनसे)

पाखरसांगवी गट – सोनाली थोरमोटे (काँग्रेस)

महाराणाप्रताप नगर गट- महादेव प्रभाकर म्हस्के (काँग्रेस)

लातूर पंचायत समिती विजयी उमेदवारांची यादी

गंगापूर गण – शिवानी (काँग्रेस)

पाखरसांगवी गण – अक्षय देशमुख (काँग्रेस)

आर्वी गण – तनुजा चव्हाण (काँग्रेस)

पानगाव गण – मोनिका सूर्यवंशी (मनसे)

महापूर गण – श्रीकांत बैले (काँग्रेस)

बाभळगाव गण – पूजा उफाडे (काँग्रेस)

पानचिंचोली गण – सुनीता वाघमारे (भाजपा)

टीप: विजयी उमेदवारांची यादी निकाल समोर येईल त्याप्रमाणे अपडेट होत आहे…