लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : गेली दहा वर्षे भाजपमध्ये राहिलेले आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘घरवापसी’ केलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली आहे. एकीकडे वडिलांना पक्षात मानाचे पान मिळाले असताना दुसरीकडे त्यांचे पुत्र अभिजीत ढोबळे यांनी पक्षाच्या विरोधात सूर आळवला आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रा. ढोबळे यांनी दहा वर्षांपासूनचा भाजपबरोबर कसाबसा चाललेला संसार मोडीत काढून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला होता. मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र अभिजीत ढोबळे आणि कन्या कोमल साळुंखे- ढोबळे या दोघांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. पक्षाने राजू खरे यांना उमेदवारी दिली आहे.

आणखी वाचा-सोलापूर जिल्हा बँक घोटाळा, निकालाने ऐन प्रचारात खळबळ; दिलीप सोपल, मोहिते पिता-पुत्र, शिंदे बंधू, साळुंखेंच्या अडचणीत वाढ

दरम्यान, राज्यातील राजकारणात दलित चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि पूर्वी अनेक वर्षे शरद पवार यांच्यावर निष्ठा वाहिलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे ‘घरवापसी’ करताच त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदावर सामावून घेण्यात आले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नेमणूकपत्र प्रदान केले आहे.प्रा. ढोबळे यांनी २०१४ नंतर शरद पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रयत्नपूर्वक प्रवेश मिळविला होता. त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु अलीकडे ते भाजपमध्ये फारसे रमले नव्हते. ते पक्षात माघारी फिरले आहेत.

आणखी वाचा-Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”

तथापि, दुसरीकडे मोहोळ राखीव मतदार संघातून उमेदवारी डावलली गेल्यामुळे नाराज झालेले प्रा. ढोबळे यांचे पुत्र अभिजीत ढोबळे यांनी मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विरोधात सूर आळवायला सुरुवात केली आहे. पक्षाचे उमेदवार राजू खरे यांच्या विषयी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून खरे यांच्या अवतीभवती शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या मंडळींचा वावर असतो. जे पक्षाचे सदस्य होते, त्यांना उमेदवारी डावलण्यात आली आणि जे पक्षाचे सदस्य नव्हते, त्यांना उमेदवारी देण्यात आल्याबद्दल अभिजीत ढोबळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजू खरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांचा प्रचार करायचा की नाही, याबाबतचा निर्णय येत्या १४ नोव्हेंबर रोजी आपण कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेणार आहोत, असे ढोबळे यांनी सांगितले.

Story img Loader