लोकसभा निवडणूक निकालाने राज्यात युतीला बळ मिळाले असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांत वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती आणि आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत दिसलेले विधानसभा मतदारसंघातील हे चित्र.

’राज्यातील १९ मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवारांना सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी  

(जळगाव, रावेर, बुलढाणा, अकोला, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, जालना, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर.)

’विधानसभा मतदारसंघात एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळालेले उमेदवार

१) कुणाल पाटील (काँग्रेस) – धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य मतदारसंघात १ लाख २१ हजार.

२) सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी ) – बारामतीमध्ये १ लाख २७ हजार.

३) हेमंत गोडसे (शिवसेना) – नाशिक मतदारसंघातील नाशिक पश्चिम मतदारसंघात १ लाख ०४ हजार

४) गोपाळ शेट्टी (भाजप) – उत्तर मुंबईतील बोरिवली मतदारसंघात १ लाख १८ हजार

५) गिरीश बापट (भाजप) – पुणे मतदारसंघातील कोथरूड मतदारसंघात १ लाख ०६ हजार.

६) रणजितसिंह निंबाळकर (भाजप) -माढा मतदारसंघातील माळशिरस मतदारसंघात १ लाख ६३० मते.

एक लाखांच्या आसपास मताधिक्य मिळालेले मतदारसंघ

डॉ. सुभाष भामरे (भाजप) – धुळे ग्रामीणमध्ये ९९,१३१ मताधिक्य.

डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना) – डोंबिवली मतदारसंघात ९३ हजार.

राजन विचारे (शिवसेना ) – ठाण्यातील ओवळा-माजीवडय़ात ९३ हजार.

’गोपाळ शेट्टी (भाजप) – उत्तर मुंबईतील चोरकोप ९५ हजार.

मनोज कोटक (भाजप) – मुलुंड ८७ हजार.

श्रीरंग बारणे (शिवसेना) – चिंचवड ९७ हजार.

प्रमुख्य नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघातील आघाडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – ५५ हजार.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे – ५३ हजार.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील – १९ हजार.

राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार – १.२७  लाख

माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील – २५ हजार.

भाजप नेते एकनाथ खडसे – ६० हजार.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन – ४५ हजार.

शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे – ८२ हजार.

ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे – २४ हजार.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे – १९ हजार.

काँग्रेसचे विश्वजित कदम – ६ हजार.

आशीष शेलार – १५ हजार.

काँग्रेसचे वर्षां गायकवाड – ९ हजार.

ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख – ८ हजार.

या नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये पिछाडी

पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस), छगन भुजबळ (राष्ट्रवादी), बाळासाहेब थोरात (काँग्रेस), वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (भाजप), आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा (भाजप), राज्यमंत्री विजय शिवतरे (शिवसेना), अमित देशमुख (काँग्रेस), प्रणिती शिंदे (काँग्रेस), डॉ. सुनील देशमुख (भाजप), राजेश टोपे (राष्ट्रवादी)