सोलापूर : यंदा उन्हाळय़ात तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढे जाऊन वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही होत असताना त्यापासून बचाव करण्यासाठी लिंबू पाणी प्यावे म्हटले तर लिंबाचा दर आकाशाला भिडला आहे. सोलापुरात अनेक वर्षांनंतर प्रथमच लिंबाचा तर प्रतिकिलो २५० रुपयांवर पोहोचला आहे.
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिंबाची मागणी वाढली असताना आवक घटली आहे. त्यामुळे लिंबाचा भाव प्रचंड वाढला आहे. बाजारात स्थानिक शेतकऱ्यांनी ३७ क्विंटल लिंबू विक्रीसाठी आणला असता प्रतिक्विंटल लिंबाचा दर किमान ८ हजार रुपये आणि कमाल दर तब्बल २० हजार रुपये मिळाला. सरासरी दर १५ हजार रुपयांपर्यंत गेला.
बाजारात लिंबाचा प्रतिकिलो दर सरासरी २५० रुपये असून एक लिंबू १० ते १५ रुपयांस विकले जात आहे. त्यामुळे वाढत्या उष्म्यात घशाची पडणारी कोरड थांबविण्यासाठी लिंबू पाणी घेणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात एका लिंबाची किंमत तीन ते चार रुपये होती. ती आता चौपटींनी वाढली आहे.

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Panvel water
‘पिण्यासाठी पाणी द्या, मग पाणी बचतीचा संदेश द्या’
no drinking water supply in Panvel city along with New Panvel and Kalamboli for two days
पनवेल : पाणी बचतीपूर्वी पिण्यासाठी नळातून पाणी तरी सोडा