गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. यासंदर्भात बिबट्या पाहिल्याचे काही दावे देखील करण्यात येत होते. मात्र, त्याविषयी खात्रीशीर माहिती मिळू शकली नव्हती. आता मात्र सज्जनगडावर बिबट्याचा बछडा सापडल्यामुळे सज्जनगडावर बिबट्या असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. काही पर्यटकांना अचानक हे बिबट्याचं पिल्लू दिसल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. बिबट्याच्या बछड्याला पाहाण्यासाठी सज्जनगडावरील मंडळींनी चांगलीच गर्दी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किल्ले सज्जनगडावर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास गडावरील रामघळ परिसरात काही युवक भटकंती करत होते. यावेळी त्यांना अचानक बिबट्याचा बछडा खेळताना दिसला. त्यामुळे युवकांची भंबेरी उडाली. काही काळ हे तरुण या बछड्यापासून चार हात लांबच राहिले. मात्र, आसपास बिबट्या नसल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी या बछड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ काढले. काही वेळातच ही घटना सज्जन गडावर समजताच युवकांची गर्दी वाढली आणि त्यातील काहींनी ही घटना तत्काळ वनधिकाऱ्यांना कळविली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard cub found in satara sajjangad sinner forest department in action rno news pmw
First published on: 21-09-2022 at 13:17 IST