scorecardresearch

तीन जणांचा बळी घेणारा बिबट जेरबंद

काही दिवसांपूर्वी आजोबांच्या अत्यसंस्काराला आलेल्या मुलाचा बळी याच बिबटय़ाने घेतला होता.

चंद्रपूर : दुर्गापूर परिसरात १६ हल्ले करून अनेकांचे बळी घेणाऱ्या बिबटय़ाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास दुर्गापूर परिसरात वन विभागाने या बिबटय़ाला पकडले.

दोन दिवसांपूर्वी बिबटय़ाने अडीच वर्षीय बालिकेला तोंडात पकडून नेले होते. मुलीच्या आईने बिबटय़ाशी झुंज देत लेकीची सुटका केली होती. या बिबटय़ाला ठार मारण्याचे आदेश वनविभागाने काढले होते. या बिबटय़ाने दुर्गापूर, ऊर्जानगर परिसरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. काही दिवसांपूर्वी आजोबांच्या अत्यसंस्काराला आलेल्या मुलाचा बळी याच बिबटय़ाने घेतला होता. ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, अजय मराठे, आरआरटी पथक तथा ताडोबा पथक, चंद्रपूर वन विभाग, वन परिक्षेत्र अधिकारी कारेकर यांच्या पथकाने हे काम यशस्वी केले. यासाठी वन विभागाने सहा पिंजरे, कॅमेरा ट्रॅप, तथा ३०० वन कर्मचारी तैनात केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leopard who killed three people finally captured zws