“…नाहीतर मंदिर उडवून देऊ”; अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवस्थानाला धमकीचे पत्र

अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकीचे पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बीडच्या परळीतील वैजनाथ मंदिरानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकीचे पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चार दिवसांपूर्वी परळी वैजनाथ देवस्थानाला देखील ५० लाख रुपयांची मागणी करणारे पत्र मिळाले होते. असेच पत्र आता अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या नावाने पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पत्रांवर नांदेड जिल्ह्यातील पत्ता देण्यात आला आहे. 

योगेश्वरी देवस्थान कमिटीच्या नावाने आलेल्या पत्रामध्ये पन्नास लाख रुपये द्या, नाहीतर मंदिर उडवून देऊ अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे. अंबाजोगाई पोलीस याचा अधिक तपास करत आहे.

यापुर्वी बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिर समितीस प्राप्त झालेल्या पत्रामुळे सध्या खळबळ माजली होती. “ वैजनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा RDXने मंदिर उडवून देवू”, अशा आशयाचे समितीस आले होते. वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र आले होते. या पत्रानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Letter of threat to yogeshwari temple at ambajogai beed srk