सांगली : बाजार समितीच्या आवारात तासगाव अर्बन बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांची टोळी उघडकीस आणत एका संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २४ तासांत गजाआड केले असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी सांगितले. अज्ञात चोरट्यांनी बाजार समितीमधील तासगाव अर्बन बँक लुटण्याचा काल मध्यरात्री अयशस्वी प्रयत्न केला. बँकेत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली होती.

या प्रकरणी ओंकार साळुंखे ( वय १९,रा. राजीव गांधी झोपडपट्टी) याला अटक केली असून मुनीब भाटकर (रा. सांगली) व सुदर्शन यादव (रा. कराड) हे फरार आहेत. संशयिताकडून कोयता, कटावणी, चाकू जप्त केले आहेत.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Former Shiv Sena MLA Mahadev Babar announced support for independent candidate Gangadhar Badhe
हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या

हेही वाचा…Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं महायुतीच्या बैठकीनंतर सूचक वक्तव्य, “मी काळजीवाहू मुख्यमंत्री, आता…”

तासगाव अर्बन बँकेची सांगली बाजार समितीमध्ये शाखा कार्यरत आहे. या शाखेत असणारी स्ट्राँगरूम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, सायरन वाजला. यामुळे चोरट्यांनी पोबारा केला.

चोरट्यांनी बँकेचे शटर तोडून आत प्रवेश केला. यावेळी सतर्क यंत्रणेचा भोंगा वाजू नये यासाठी असलेल्या अलार्मचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यानंतर कटावणीने स्ट्राँगरूम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.

हेही वाचा…सोलापूर जिल्हा बँक घोटाळा; तत्कालीन संचालकांकडून ११०३ कोटी वसुली होणार

दरम्यान, अलार्मचा वीजपुरवठा खंडित होताच याचा संदेश बँकेच्या व्यवस्थापकांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांची चाहूल लागण्यापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली. मात्र, माग मिळाला नाही. मात्र, चोरट्यांचा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. या आधारे पोलीस अज्ञातांचा शोध घेत होते.