scorecardresearch

परप्रांतीय भंगार व्यावसायिकावर स्थानिकांचा हल्ला

देगाव प्रकरण परप्रांतीय भंगार व्यवसायिकांविरोधातील स्थानिकांच्या उद्रेकाचे उदाहरण ठरते आहे.

दापोली : दापोली तालुक्यात देगाव येथे आज दुपारी एका परप्रांतीय भंगार व्यवसयिकाच्या घरावर स्थानिक ग्रामस्थांच्या जमावाने हल्ला करून त्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगासागर शुक्ला असे या भंगार व्यवसायिकाचे नाव असून जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  दरम्यान, दापोलीसह संपूर्ण कोकणात भंगार व्यवसायासाठी मोठय़ा संख्येने परप्रांतीय नागरिक दाखल झाले आहेत. मात्र या व्यवसायिकांचा बेकायदा व्यवहार करणाऱ्यांशी संबंध येत असल्याने अनेक भागात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा होते. अशी प्रकरणं हाताळताना पोलिसांकडूनही सावध भूमिका घेतली जाते. देगाव प्रकरण परप्रांतीय भंगार व्यवसायिकांविरोधातील स्थानिकांच्या उद्रेकाचे उदाहरण ठरते आहे. यामुळे या व्यवसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Locals attack outsiders scrap dealers in dapoli taluka zws