scorecardresearch

ठाण्यात मेट्रो-४ च्या कारशेडच्या जागेचा सर्व्हे करण्यास विरोध; ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी मांडल्या मागण्या

सर्व्हे करण्याआधी काही अटी शर्ती पूर्ण करा अशी मागणी स्थानिक गावकरी आणि शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे

Metro Carshed, Metro,
सर्व्हे करण्याआधी काही अटी शर्ती पूर्ण करा अशी मागणी स्थानिक गावकरी आणि शेतकऱ्यांनी तहसीदारांकडे केली आहे

घोडबंदर रोडवरील मोगरपाडा येथे मेट्रो-४ च्या कारशेडसंदर्भात आज संबंधित जागेचा सर्व्हे होणार होता. मात्र सर्व्हे करण्याआधी काही अटी शर्ती पूर्ण करा अशी मागणी स्थानिक गावकरी आणि शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. तसंच जमिनींचा योग्य तो मोबदला द्यावा अशीदेखील मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आमचा मेट्रो कारशेडला विरोध नसून ग्रामस्थांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे अशी विनंती तहसीलदार युवराज बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.

१०० एकर जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून एमएमआरडीएने आरक्षण टाकले होते. परंतु, अनेक वेळा एमएमआरडीए व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी जागेवर जाऊन सुद्धा स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या विरोधामुळे या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम होऊ शकले नव्हते. त्यामुळे हे काम प्रलंबित होते. 

ठाणे ओवळा माजिवाडाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन ग्रामस्थांसोबत बैठक केली. या बैठकीत आमदार प्रताप सरनाईक यांनी ग्रामस्थांच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. त्यांनतर ठाणे जिल्हाधिकारी यांनी स्थानिकाच्या मागण्या समजून घेतल्यानंतर जागेवरील कारशेडचा तिढा सुटणार होता. या जमिनीवर सर्वेक्षण सुरु होणार होते.

सदर जागा ५५० एकर असुन १०० एकर जागा मेट्रो कारशेडसाठी घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच जागेचा योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे. त्यानंतर सर्व्हे करावा अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सर्वेला गावकऱ्यांनी विरोध केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Locals oppose land survey for metro carshed 4 sgy

ताज्या बातम्या