राज्य शासनानं परवान्यासह अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना प्रवासाची मुभा दिल्याने आज मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. या मार्गावर वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी केली जात असल्याने या रांगा लागल्या आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून गुजरात आणि राजस्थानकडे जाणाऱ्या वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अच्छाड येथे या वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी होत असल्याने वाहनांच्या रांगा दिसून आल्या.

अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात परराज्यातील अनेक प्रवाशी आणि कामगार अडकून पडले आहेत. आज सरकारने त्यांना प्रवासाची परवानगी दिल्याने गुजरात-राज्यस्थानकडे जाणाऱ्या नागरिकांनी महामार्गावर घरी परतण्यासाठी एकच गर्दी केली केली.