केतन अग्रवाल या २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूची चर्चा राज्यभरात रंगली आहे. केतनला त्याच्या होणाऱ्या बायकोने म्हणजेय सिया गोयलने धक्का दिला आणि चेतन चौधरीने तिला साथ दिली असा आरोप होतो आहे. दरम्यान चेतनच्या कुटुंबाने चेतनला या प्रकरणात गोवलं जातं आहे असं म्हटलं आहे.
चेतनचे वडील बाबूलाल चौधरी काय म्हणाले?
बाबूलाल चौधरी यांचं गुलटेकडी भागात मसाल्याचं शॉप आहे. धनश्री मसाले नावाने हे मार्केटमधे प्रसिद्ध आहे. बाबूलाल चौधरी म्हणाले, माझा मुलगा चेतन चौधरी याचा या प्रकरणात, केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाशी काहीही संबंध नाही. दुसरीकडे अशी माहिती समोर येते आहे की लोहगडावर चेतन हा केतन आणि सियापासून अवघ्या काही फुटांवर उभा होता. त्याने पोलिसांना हे सांगितल्याचं समजलं आहे. पण बाबूलाल चौधरी म्हणत आहेत की माझ्या मुलाला म्हणजेच चेतनला यात गोवलं जातं आहे. सिया आणि चेतन यांची ओळख होती. सिया हे नावही आम्हाला आत्ता समजलं आहे. १८ जूनला चेतनने आईला सांगितलं होतं त्या दिवशी मला मिटिंग आहे. तो लोहगडावर का गेला होता? मला माहीत नाही. मी सियाला पोलीस चौकीत पाहिलं. तिचं नाव, तिचं घर याविषयी मला आत्ताच माहिती मिळाली आहे. माझ्या मुलाला म्हणजे चेतनला या प्रकरणात गोवलं जातं आहे. चेतनने मला सांगितलं की त्याने कुणालाही धक्का वगैरे दिलेला नाही.
चेतन तिथे उभा होता पण त्याने काहीही केलं नाही-बाबूलाल चौधरी
चेतन तिथे उभा होता पण तो लांब उभा होता. सियाने धक्का दिला की नाही माहीत नाही. पण सिया केतन अग्रवालच्या बाजूलाच उभी होती असं मला चेतनने सांगितलं असंही बाबूलाल चौधरी म्हणाले. चेतन हा एकदम साधा मुलगा आहे. रोज तो दुकानात येतो. सिया आणि चेतन यांची ओळख कशी झाली हे पण मला माहीत नाही. चेतन माझ्याबरोबर असायचा. मी त्या मुलीला म्हणजेच नेहाला कधीही भेटलो नाही. तिच्याबाबत मला काल समजलं आहे. तिचे आई वडील काय करतात हे देखील मला माहीत नाही. चेतन निर्दोष आहे तो सुटला पाहिजे असंही बाबूलाल चौधरी म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाबाबत मला काही माहितच नाही. पोलिसांनी सुरुवातीला आम्हाला कल्पना दिली नव्हती. नंतर सकाळी १०.३० च्या दरम्यान जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला सांगितलं की हे हत्या प्रकरण आहे. मी पोलिसांना तातडीने सांगितलं की माझा मुलगा असं करणार नाही. १८ जूनच्या दिवशी त्याचं आणि माझं बोलणंही झालं नाही. तो आईला फक्त मिटिंगला जातोय असं सांगून गेला होता. सोमवारी रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याला नंतर अटक करण्यात आली असंही बाबूलाल चौधरी म्हणाले.
