scorecardresearch

मला आणि प्रणितीला भाजपाने ऑफर दिली होती: सुशीलकुमार शिंदे

आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. जोपर्यंत जगू तोपर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केला आहे. मला व मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपाने पक्षात येण्याची ऑफर दिली होती, अशी माहिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. शिंदे यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांची लढत बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्याशी आहे.

ते म्हणाले, भाजपाच्या नेत्याने प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मलाही भाजपात येण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. जोपर्यंत जगू तोपर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत. भाजपा जातीधर्माचे राजकारण करत आहे. हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या निवडणुकीत लोक भाजपाला थारा देणार नाहीत, असे भाकितही त्यांनी केले. भाजपात येण्याची ऑफर कोणी दिली हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूकडून संविधानाला गाडण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lok sabha election 2019 bjp gave me and praniti shinde offer for enter in to party says sushil kumar shinde

ताज्या बातम्या