Ghatkopar Hoarding Collapse Mumbai : मुंबई, ठाणे जिल्ह्याला काल अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे मुंबईत अतोनात नुकसान झाले. घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला, तर वडाळ्यात पार्किंग टॉवर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. तसंच, मध्य रेल्वे ठप्प झाली होती, मेट्रो सेवा खंडित झाली होती. तासभर पडलेल्या पावसामुळे मुंबईबाहेर राहणाऱ्या चाकरमन्यांची चांगलीच कोंडी झाली. दरम्यान, दुसरीकडे संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एकनाथ शिंदे यांची तक्रार केली आहे. नाशिक पालिकेत झालेल्या ८०० कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी त्यांनी हे पत्र लिहिले आहे. तसंच, काल चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक मतदान केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. त्याचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Marathi News Live Today, 14 May 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

19:03 (IST) 14 May 2024
संयमाची कसोटी… तळपते ऊन, कोंदट वातावरणात एनडीआरएफच्या जवांनाची अविरत सेवा

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

सविस्तर वाचा…

18:32 (IST) 14 May 2024
सलमान खान गोळीबार प्रकरण : हरियाणातून लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाला अटक

कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलला आरोपी हरपाल सिंहने अभिनेता सलमान खानच्या घराचे चित्रीकरण पाठवल्याचा आरोप आहे.

सविस्तर वाचा…

18:20 (IST) 14 May 2024
सोन्याच्या नाण्यांचा मोह नडला…नागपूरच्या इसमाला नऊ लाखांचा गंडा….

स्वस्तात सोने मिळवण्याचा मोह अनेकांना नडतो. नागपूर येथील एका इसमाला असाच एक वाईट अनुभव आला.

सविस्तर वाचा…

18:20 (IST) 14 May 2024
वडाळा पार्किंग टाॅवर दुर्घटना : झोपु प्राधिकरणाकडून विकासकाला कारणे दाखवा नोटीस

मुंबईत सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे वडाळा येथील वाहनतळासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा कोसळला.

सविस्तर वाचा…

18:13 (IST) 14 May 2024
मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये पुढील तीन तासांत वादळी पावसाची शक्यता

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवली आहे. या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किमी राहील.

सविस्तर वृत्त वाचा

17:23 (IST) 14 May 2024
नागपूरमध्ये ‘आयपीएल’च्या धर्तीवर हॉकीची फ्रेंचायजी आधारित स्पर्धा!

शहरात लवकरच ‘आयपीएल’प्रमाणे हॉकीची फ्रेंचायजी आधारित स्पर्धा सुरू होणार आहे.

सविस्तर वाचा…

17:22 (IST) 14 May 2024
नियतीचा न्याय! ‘त्या’ बलात्काऱ्याला न्यायालयातून शिक्षा मिळण्यापूर्वीच…

एका मतीमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन बलात्कार करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा…

17:22 (IST) 14 May 2024
पंतप्रधानांकडून शरद पवारांवरील टीका राष्ट्रवादीच्या पथ्यावर – आर्य

पश्चिम महाराष्ट्रातील एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता भटकती आत्मा अशी टीका केली होती.

सविस्तर वाचा…

17:21 (IST) 14 May 2024
धक्कादायक! प्रियकराने दिला दगा अन् त्याच्या मित्रांनी सर्वस्व लुटले…

तिच्या कुटुंबियांनी तिची आस्थेने चौकशी केली असता तिने चौघे जण वारंवार बलात्कार करीत असल्याची माहिती दिली.

सविस्तर वाचा…

17:21 (IST) 14 May 2024
सत्कारमूर्ती म्हणून मिरवणाऱ्या शेतकऱ्यास चोरी प्रकरणी अटक, कळंब तालुक्यातील शेतमाल चोरी प्रकरण

सचिन पाटील व वैभव दुदुरकर या दोघांनी शेतमाल कारंजा येथे विक्री केल्याची गोपनीय माहिती मिळाली.

सविस्तर वाचा…

17:07 (IST) 14 May 2024
“प्रफुल्ल पटेलांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान”, शरद पवार गटाचा दावा

16:21 (IST) 14 May 2024
लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशीच मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार! सभेसाठीही चाचपणी सुरू

उपोषण चार जूनपासून सुरू होणार. ८ जूनला सभा होणार आहे. उद्या १ वाजता नारायण गडावर पाहणी करायला जात आहोत. तिथली काय तयारी आहे, कशी तयारी आहे यासंदर्भात तपासणी करणार – मनोज जरांगे पाटील

15:05 (IST) 14 May 2024
घाटकोपरच्या घटनेनंतर नागपुरातही अवैध होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर

गेल्या काही दिवसात नागपूर शहरातील विविध भागात होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे. वादळांमुळे ते कोसळण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

15:05 (IST) 14 May 2024
नागपूर: मेट्रोत नोकरी देण्याचे आमिष, सुरक्षा रक्षकच निघाला आरोपी

या संपूर्ण प्रकरणाची नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आऊट सोर्सिंग एजन्सीला दिले.

सविस्तर वाचा…

15:04 (IST) 14 May 2024
अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, हे आहेत आजचे दर…

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहक सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात.

सविस्तर वाचा…

14:21 (IST) 14 May 2024
वर्धा : पशुधन विकास अधिकारी डॉ. वंजारी यांचे निलंबन

वर्धा : जिल्हा परिषदेत कार्यरत पशुधन विकास अधिकारी डॉ. भागचंद वंजारी यांना राज्य शासनाने गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे.

राज्याच्या कृषी व पशु संवर्धन विभागाचे मानसिंग पाटील यांनी हा आदेश बजावला आहे.त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या प्रशासकीय गैर वर्तणुकीच्या अनुषंगाने विभागीय चौकशीची कारवाई करण्याचे प्रस्तावित असल्याचे या आदेशात म्हटले आहे. आदेश अंमलात आल्यानंतरच्या कालावधीत डॉ. वंजारी यांचे मुख्यालय गडचिरोली जिल्हा पशु सर्वचिकित्सालय हे राहणार.

निलंबन काळात त्यांना कोणतीही खाजगी सेवा किंवा व्यवसाय करता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे.तसेच पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. पुढील आदेशापर्यंत हे निलंबन राहणार आहे. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळत खळबळ उडाली आहे.

14:13 (IST) 14 May 2024
सरकार आमचं, पालिका आमची; मग उद्धव ठाकरेंचा काय संबंध? भावेश भिंडेंप्रकरणी छगन भुजबळांचं विधान

सरकार आमचं, महानगरपालिकाही आमचीच आहे. यात उद्धव ठाकरेंचा काय संबंध? असे अनेक लोक धंदेवाईक नेहमी आमच्याकडेही पुष्पगुच्छ घेऊन येतात. माझ्याकडे कोणीही येतं आणि फोटो काढतं. सगळ्यांकडेच असे फोटो असतात. त्यामुळे यावरून कोणी अर्थ काढलेला योग्य नाही. यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. तो कितीही मोठा असला तरीही त्याच्यावर कारवाई होईल – छगन भुजबळ

13:34 (IST) 14 May 2024
कल्याण मध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा…मार्गात बदल…समजून घ्या…

नवी मुंबई : लोकसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून कल्याण डोंबिवलीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बुधवारी होणार आहे. सभा होणार असल्याने सुरक्षा कारणास्तव तसेच वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

13:33 (IST) 14 May 2024
गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात जाणे जीवावर बेतले

गडचिरोली : तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने झडप घालून हल्ला केला. यात महिला जागीच ठार झाली. पार्वताबाई बालाजी पाल (६५) रा. आंबेशिवणी ता. गडचिरोली असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

वाचा सविस्तर…

13:33 (IST) 14 May 2024
सुक्या मासळीच्या दरात वाढ, कोळंबीचे सोडे १३०० रुपये किलोवर

उरण : पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असल्याने या काळात सुक्या मासळीवर अवलंबून राहावे लागते. मात्र आवक घटल्याने सुक्या मासळीचे दर वाढू लागले आहेत. या वर्षी कोळंबीच्या सोड्याचे दर हे किलोला १ हजार ३०० रुपयांवर पोहोचले आहेत.

सविस्तर वाचा…

13:31 (IST) 14 May 2024
चंद्रपूर : उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

चंद्रपूर : बियर शॉपी परवान्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारणारे दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.

वाचा सविस्तर…

13:30 (IST) 14 May 2024
अंजनगावच्‍या केळीला दुबईकरांची पसंती, वीस टन केळीचा कंटेनर…

अमरावती : सध्‍या स्‍थानिक बाजारपेठेत केळीला ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्‍याने केळी उत्‍पादक शेतकरी चिंतेत असताना अंजनगाव सुर्जी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी नवा मार्ग निवडला आहे.

वाचा सविस्तर…

13:30 (IST) 14 May 2024
शस्त्राच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण, सिनेस्टाईल घटनेमुळे अकोल्यात खळबळ

अकोला : शहरातील रायलीजीन भागातून एका व्यावसायिकाचे शस्त्राच्या धाकावर चारचाकीमध्ये डांबून तीन ते चार अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या सिनेस्टाईल घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अरुण वोरा असे अपहरण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

वाचा सविस्तर…

12:56 (IST) 14 May 2024
एपीएमसीत लिचीच्या हंगामाला सुरुवात

नवी मुंबई : हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून इतर फळांच्या हंगामाला सुरुवात होत आहे. बाजारात आता लिचीची आवक होण्यास सुरुवात झाली आहे.

वाचा सविस्तर…

12:48 (IST) 14 May 2024
महायुती-मविआ यांच्यात सिडकोत संघर्ष, मुकेश शहाणेविरुध्द गुन्हा

नाशिक : सिडकोत सोमवारी महायुतीच्या प्रचार फेरीदरम्यान महाविकास आघाडीशी वाद उदभवला. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे विरोधात तक्रारीनंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 14 May 2024
नाशिकमध्ये पावसाने ५१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नाशिक : जिल्ह्यात आठ ते ११ मे या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेल्या वळिवाच्या पावसाचा ४१ गावांतील ५१३ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसला. यात सर्वाधिक ४७५ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 14 May 2024
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत जबाबदार असलेले भावेश भिंडे कोण? बेकायदेशीर बोर्डची लिम्का बुकमध्ये का झाली होती नोंद?

भावेश भिंडे यांच्यासह अन्य काही जणांवर ३०४,३३८,३३७, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पंतनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भावेश भिंडे सध्या बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर भावेश भिंडे कोण हे पाहुयात.

सविस्तर वृत्त वाचा

12:09 (IST) 14 May 2024
पुणे : जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळली; उत्तर प्रदेशातील भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भोंदूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वाचा सविस्तर…

11:55 (IST) 14 May 2024
घाटकोपर होर्डिंगप्रकरणातील जबाबदार भावेश भिडे बेपत्ता, फोनही स्वीच ऑफ

घाटकोपर होर्डिंगप्रकरणी भावेश भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पुढील चौकशीकरता पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. तसंच त्यांचा मोबाईलही स्वीच ऑफ असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं.

11:54 (IST) 14 May 2024
नागपूर : ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेटधारकांविरुद्ध मोहीम, मॅकेनिकवरही पोलीस कारवाई

नागपूर : वाहतूक पोलीस सुरुवातीला ध्वनिप्रदूषण करणाऱ्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई करीत होते. मात्र, त्याचा हवा तेवढा परिणाम दिसत नव्हता. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी दुचाकींचे आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्याची कारवाई सुरू केली.

वाचा सविस्तर…

Marathi News Live Today, 14 May 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा