PM Narendra Modi Roadshow in Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. एकीकडे महायुती आणि दुसरकीडे महाविकास आघाडी अशी चुरस महाराष्ट्रात या लोकसभेच्या निवडणुकीत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज रोड-शो होणार आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमध्ये सभा आहे. २० मे रोजी कल्याण, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. सध्या या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाचा प्रचार सरू आहे. महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात कंबर कसली आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर चढवलेल्या जिरेटोपावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.

yogi adityanath and narendra modi
“बुलडोझर कुठे चालवायचा हे योगींकडून शिका”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना खोचक सल्ला
nagpur, Congress, Sandesh Singalkar, Congress Appoints Sandesh Singalkar as Inspector, Arki Vidhan Sabha, Shimla Lok Sabha seat, lok sabha 2024, election 2024, Nagpur news, congress news, marathi news,
निवडणूक व्यवस्थापनात तज्ज्ञ नागपूरकर नेत्यांकडे काँग्रेसने दिली नवी जबाबदारी
bjp bhiwandi lok sabha marathi news, bhiwandi lok sabha bjp marathi news
मराठा-कुणबी वादामुळे भिवंडीत भाजप चिंताग्रस्त
Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra News Today in Marathi
Lok Sabha Election 2024 : ब्रिजभूषण शरण सिंहांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश
sanjay raut modi adani ambani
“मोदींचे पहिल्यांदाच अदाणी, अंबानींवर थेट आरोप, ईडीने आता कारवाई करावी”, संजय राऊतांची मागणी
sharad pawar will join hand with says prakash ambedkar
लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार भाजपसोबत?; वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा दावा 
How did the existence of Congress decrease from Mumbai How many chances in the Lok Sabha elections
काँग्रेसच्या हातातून मुंबई कशी निसटली? लोकसभा निवडणुकीत किती संधी?
Lok Sabha Elections
Maharashtra News : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या
Live Updates

Lok Sabha Election 2024  Today

19:32 (IST) 15 May 2024
पिंपरी: पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात शरद पवार गटाचे आंदोलन

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातला होता.

सविस्तर वाचा...

19:21 (IST) 15 May 2024
मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड-शोला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड-शोला मुंबईत सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या माध्यमातून भाजपाने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. भाजपाच्या मुंबईतील उमेदवारांसाठी हा रोड शो आहे. या रोड शो ला भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. मुंबईतील घाटकोपर परिसरात या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

19:16 (IST) 15 May 2024
छबिना मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने तरूणावर खुनीहल्ला, करमाळ्याजवळील घटना

एका तरूणावर सातजणांनी मिळून सशस्त्र हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना करमाळा तालुक्यातील घोटी गावात घडली.

सविस्तर वाचा...

19:01 (IST) 15 May 2024
जोगन्नाचा मृत्यू नक्षलवाद्यांच्या जिव्हारी; ३० मे रोजी गडचिरोली बंदचे आवाहन

गडचिरोलीपासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील नारायणपूरच्या कांकेर सीमावर्ती भागात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला छत्तीसगड पोलीस व नक्षलवाद्यांत चकमक झाली होती.

सविस्तर वाचा...

18:19 (IST) 15 May 2024
गोंदिया : नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शोधा अन् ११०० रूपये मिळवा, जिल्हा युवा सेनेचे….

गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी कधी लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली तर कधी इतर कारणांनी नगर परिषदेत अनुपस्थित राहतात.

सविस्तर वाचा...

18:01 (IST) 15 May 2024
पत्नीला बाळ होत नाही म्हणून दुसऱ्या महिलेला केले गरोदर…

याचिकाकर्त्या महिलेच्या घरी २०१६ मध्ये आरोपी ‘सेट टॉप बॉक्स’ लावण्यासाठी आला होता.

सविस्तर वाचा...

18:00 (IST) 15 May 2024
बुलढाणा : जिल्हा मुख्यालयातील बहुतेक फलक अवैध

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील अनधिकृत होर्डिंग फलक हटवण्यास सुरुवात झाली आहे.

सविस्तर वाचा...

17:58 (IST) 15 May 2024
"काँग्रेसने फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण केलं", पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने कायमच हिंदू-मुस्लिमांचं राजकारण केलं. काँग्रेस कधीही विकासांचं राजकारण केलं नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

17:50 (IST) 15 May 2024
धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई

महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रक काढून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका भागातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे परिपत्रक काढले आहे.

सविस्तर वाचा...

17:40 (IST) 15 May 2024
पंतप्रधान मोदींची कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंसाठी सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याणमध्ये पार पडत आहे. त्यानंतर मुंबईत मोदींचा भव्य रोड शोही आयोजित करण्यात आलेला आहे.

17:08 (IST) 15 May 2024
वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खानगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. अंकुश खोब्रागडे (३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी बल्लारशाह वनपरिक्षेत्रात वाघाने एका इसमाचा बळी घेतला. जिल्ह्यातील ही लागोपाठ दुसरी घटना आहे.

सविस्तर वाचा

17:07 (IST) 15 May 2024
नागपूर: टेलिफोन एक्सचेंज चौकातील जाहिरात फलक खिळखिळा, कधीही अंगावर...

नागपूर : मुंबईच्या घाटकोपरमध्ये वादळामुळे कोसळलेल्या महाकाय जाहिरात फलकाखाली दबून १४ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच नागपुरातही अनेक अनधिकृत जाहिरात फलकांचा पाया खिळखिळा झाला आहे. ते हटवले जात नसल्याने कुणावर पडण्याची महापालिकेला प्रतिक्षा आहे काय? हा प्रश्न नागरिक विचारत आहे.

सविस्तर वाचा

17:06 (IST) 15 May 2024
घृणास्पद! जन्मदात्या वडिलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अमरावती : जन्मदात्या वडिलाने मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्याची धमकी दिल्‍याची संतापजनक घटना मंगळवारी मोर्शी ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा

16:30 (IST) 15 May 2024
म्हाडा वसाहतींच्या भाडेपट्ट्यातील वाढ कमी होणार? प्राधिकरणाकडून दरवाढीचा पुन्हा आढावा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) वसाहतींच्या भाडेपट्ट्यात सरसकट करण्यात आलेली वाढ कमी केली जाण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 15 May 2024
निवडणुकीत बंदोबस्त केलेल्या पोलिसांचा सत्कार

पनवेल ः नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानादिवशी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या परिसरातील विविध मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त नेमला होता. नवी मुंबईत अपुरे मनुष्यबळ असल्याने बाहेरील जिल्ह्यातून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून पनवेलमध्ये बंदोबस्ताला पोलीस नेमले होते. यामध्ये नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील ८७ पोलीस अंमलदार व कर्नाटक एसआरपीची एक तुकडी तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, येथील महिला व पुरुष १४० होमगार्ड तैनात केले होते. पोलीस यंत्रणेच्या चोख बंदोबस्तामुळे पनवेलमध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी केलेल्या चोख बंदोबस्तामुळे पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पोलिसांचा खास सत्कार केला. हा सत्कार स्वीकारल्यानंतर उपस्थित होमगार्डच्या निरीक्षकांनी ३२ वर्षांच्या सेवेमध्ये असा कुणीही सत्कार केला नसल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

16:21 (IST) 15 May 2024
घाटकोपर दुर्घटनेतील आरोपीचा पोलिसांना गुंगारा, लोणावळानंतर पुन्हा गायब

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश प्रभूदास भिंडे (५१) लोणावळा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सविस्तर वाचा...

16:20 (IST) 15 May 2024
१४५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी हैद्राबादमधून गजाआड; १७ वर्ष ओळख लपवून वास्तव्य

फरारी आरोपी गेली १७ वर्ष पुणे, मुंबई, तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा...

15:53 (IST) 15 May 2024
"नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील"; मोदींची टीका

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भाजपाच्या भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडत आहे. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका केली. "नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल. नकली शिवसेना जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल", अशी टीका मोदींनी केली.

15:53 (IST) 15 May 2024
देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भाजपाच्या भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडत आहे. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या रॅलीत मतांच्या लाचारीकरता जर पाकिस्तानचा झेंडा तर सर्व देशभक्त मोदींच्या पाठीशी उभे राहतील, असं फडणवीस म्हणाले.

15:46 (IST) 15 May 2024
पिंपरी : मतदानाला गेले आणि चोरट्याने घर फोडले

उद्यमनगर मधील श्रुती एन्क्लेव्ह या गृहनिर्माण संस्थेत राहणारे दीपक मुरलीधर वाघमारे हे सोमवारी दुपारी सदनिकेला कुलूप लावून मतदान करण्यासाठी गेले.

सविस्तर वाचा...

15:45 (IST) 15 May 2024
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शाळा, जागांची आकडेवारी जाहीर… आता किती शाळांमध्ये होणार प्रवेश?

वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो.

सविस्तर वाचा...

15:38 (IST) 15 May 2024
हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ मोदींची नाशिकमध्ये सभा

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भाजपाच्या भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सेभेला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत.

14:17 (IST) 15 May 2024
“राज्यातील नेते फुसका बार, तर पंतप्रधान मोदी…”; नाशिकमधील सभेपूर्वी कांदा उत्पादकांना नोटीस देण्यावरून रोहित पवारांचं टीकास्र!

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज ( बुधवारी) नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेपूर्वी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे पुढे आलं आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वृत्त

14:16 (IST) 15 May 2024
मुंबईतील रोडशोवरून संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका

घाटकोपरमध्ये ज्या ठिकाणी होर्डिंग पडल्याची दुर्घटना घडली, त्याची ठिकाणी पंतप्रधान मोदी यांचा रोड शो होतो आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींना थोडीतरी संवेदना हवी होती, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

14:02 (IST) 15 May 2024
अकोला जिल्ह्यात उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके; ७० टक्के उपाययोजना कागदावरच, पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाच्या तीव्र झळांसोबतच भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ प्रस्तावित उपाययोजनांपैकी ७० टक्के कामे अद्यापही कागदावरच आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सविस्तर वाचा

13:55 (IST) 15 May 2024
मी काही पवारसाहेबाच्या किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो नाही : रविंद्र धंगेकर

पुणे : पुणे लोकसभेच्या निवडणुकीच मतदान दोन दिवसांपूर्वी झाले. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात होते.

वाचा सविस्तर...

13:53 (IST) 15 May 2024
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २०० हून अधिक बेकायदा फलक

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २०० हून अधिक बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या नाहीत. बहुतांशी बेकायदा फलक माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने लावण्यात येत आहेत.

वाचा सविस्तर...

13:53 (IST) 15 May 2024
उरण- पनवेल मार्गावर चार वाहनांचा एकत्रित अपघात

उरण : बुधवारी १०.३० वाजता उरण- पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानका नजीक एका चारचाकीसह,रिक्षा,आणि दोन दुचाकी आशा चार वाहनांचा एकत्रित अपघात झाला आहे. यामध्ये चार जण जखमी आहेत. या अपघातात दोन दुचाकी, क्रेटा चारचाकी वाहन व रिक्षाचे नुकसान झाले आहे.

वाचा सविस्तर...

13:20 (IST) 15 May 2024
सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या - जामनेरमधील घटना

जळगाव - प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने बुधवारी पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सविस्तर वाचा

12:52 (IST) 15 May 2024
तुम्ही शेतात सोयाबीन पेरलीये...? ‘अमरवेल’मुळे १०० टक्के नुकसान........

अकोला: सोयाबीनसह अन्य पिकांना अमरवेल तणाचा मोठा धोका असतो. या तणाचे वेळीच निर्मूलन न केल्यास १०० टक्के नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. विदर्भातील सोयाबीनवर त्याचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. बिजोत्पादन अवस्थेपूर्वी वेळीच प्रतिबंधात्मक व निवारणात्मक उपाय करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय तण व्यवस्थापन संधोधन प्रकल्पाचे व्ही.व्ही. गौड यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा

Prithviraj Chavan

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला ३५ पर्यंत जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूतीचा फायदा होईल, असं भाष्यही त्यांनी केलं आहे.