Maharashtra Breaking News 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी प्रचारसभांना जोर आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल (७ मे) पार पडले. राज्यातील ११ मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. ४ जून रोजी याचा निकाल लागेल. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. तर, भाजपाकडून आज राज्यभरात सभांचा धडाका असणार आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Marathi News Live Today, 08 May 2024 : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

20:03 (IST) 8 May 2024
रेपियर यंत्रमागाची पेमेंटधारा आता 25 दिवसांची

कोल्हापूर : शुक्रवार,१० मे पासून रॅपिअर कारखानदारांनी नविन होणाऱ्या सौंद्यांची पेमेंटधारा ( बिले अदा करण्याचा कालावधी) २५ दिवसांची करणेचा निर्णय बुधवारी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये घेणेत आला. तसेच, रॅपिअर एटोलुम कारखानदारांच्या बेसिक मजुरी ठरविणेसाठी येत्या ८ ते १० दिवसांत ठरविणेचा निर्णय घेणेत आला.

रॅपिअर कारखानदारांची व्यवसायासंदर्भात चर्चा करणेसाठी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये मिटिंग झाली यावेळी निर्णय घेणेत आला. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे संचालक सतीश कोष्टी होते.

यावेळी उपस्थित रॅपिअर कारखानदारांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मंदीचे वातावरण राहिले आहे. कापड उत्पादनासाठी येणारा खर्च व मिळणारी मजुरी यामध्ये मोठी तफावत येत असल्यामुळे उत्पादनासाठी येणारा खर्चही मिळत नाही. नुकसानीत व्यवसाय करावा लागत आहे. यामुळे योग्य असा निर्णय सर्वानुमते घ्यावा असे सांगितले.

19:45 (IST) 8 May 2024
भरधाव टिप्परच्या धडकेत महिला ठार, एक जखमी….

भरधाव टिप्परच्या धडकेत महिला ठार तर  एक महिला  जखमी झाली. आज बुधवारी( दि ८) नांदुराजवळ ही दुर्घटना घडली. नांदुरा येथील  वनिता बोचरे,  सच्चिदानंद बोचरे हे दाम्पत्य आणि गीता श्रीकृष्ण ढगे हे रस्त्यावरून जात असताना (एमएच २८ बीबी. ४१३२ क्रमांकाच्या) टिप्परने त्यांना जबर धडक दिली. सविस्तर वाचा…

19:44 (IST) 8 May 2024
वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला, बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील घटना

बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमणामधील वनखंड क्रमांक ५७१ मध्ये वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली. मृत मादी बछडा अंदाजे एक वर्षाचा असून त्याचा मृत्यू मोठ्या वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविला आहे. सविस्तर वाचा…

19:44 (IST) 8 May 2024
लाचखोर दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षकाला पोलीस कोठडी; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील फरार

‘बिअर शॉपी’ परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (३४) व कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ (५३) या दोघांना १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

19:42 (IST) 8 May 2024
जमिनीच्या मोहापायी सख्ख्या भावाचा काढला काटा; भावासह दोन पुतणे गजाआड

चार गुंठे तिही अतिक्रमित जमिनीच्या वादातून लहान भावावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू  झाला. याप्रकरणी आता हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

19:39 (IST) 8 May 2024
जनतेकडून सहलीच्या रजा मंजुरीचा मंत्र्यांचा फंडा; हसन मुश्रीफ यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक परदेश दौऱ्यावर

वैद्यकीय शिक्षण, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे पंधरवड्याच्या परदेशी सहलीवर जात असताना जनतेकडून रजा मंजूर करून घातली आहे. फलक उभारून केलेल्या त्यांच्या या आगळ्या कृतीची चर्चा होत आहे. रजा मंजुरीबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी जनतेचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत. सविस्तर वाचा…

19:38 (IST) 8 May 2024
मतदानानंतर कोल्हापुरात आकडेमोड सुरू; टक्केवारीत वाढ, लाखाच्या विजयाचे दावे

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर बुधवारी प्रशासनाकडून अचूक आकडेवारीची तर उमेदवारांच्या समर्थकांना कडून मताधिक्याची आकडेमोड सुरू होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काल जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा मतदानाचा सुमारे सव्वा टक्का असा किंचित वाढला आहे. सविस्तर वाचा…

19:37 (IST) 8 May 2024
…आणि शिंदेच्या सेनेचे नरेश म्हस्के उबाठा गटाच्या शाखेत गेले

ठाणे लोकसभा मतदार संघात उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे विरुद्ध शिंदेंच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यात आरोप प्रत्यारोपाची लढाई रंगली असतानाच, नरेश म्हस्के यांनी बुधवारी ठाण्यातील प्रचार मिरवणूकी दरम्यान चंदनवाडी येथील उबाठा गटाच्या शाखेत गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सविस्तर वाचा…

17:36 (IST) 8 May 2024
आ. रवी राणांच्या बंगल्‍याच्‍या बांधकामासाठी मोफत ७० हजार विटा; वीटभट्टी व्‍यावसायिकांचा आरोप, म्हणाले,‘राणांनी.

आमदार रवी राणा यांच्‍या बंगल्‍याच्‍या बांधकामासाठी वीटभट्टी व्‍यावसायिकांनी मोफत ७० हजार विटा पुरविल्‍या, तरीही राणा यांच्‍या आदेशावरून महसूल प्रशासनाने वीटभट्टयांवर बुलडोझर फिरवून कारवाई केली. सविस्तर वाचा…

17:19 (IST) 8 May 2024
“औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगरच असेल, नामांतराविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली”, फडणवीसांची माहिती

अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तत्कालीन औरंगाबादचं नाव आमच्या सरकारने छत्रपती संभाजी नगर हे केलं होतं आणि मोदी सरकारने मान्य केलं होतं. याविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगरच असेल आणि उस्मानाबादचं धाराशिवचं असेल - देवेंद्र फडणवीस</p>

17:15 (IST) 8 May 2024
Video : मोकळ्या शेतात सापांचा प्रणय…

वाशीम : माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांचेही सुंदर आयुष्य आहे. मात्र साप दिसला की त्याची माणसाची भंबेरी उडते. असाच काहीसा प्रसंग मालेगाव तालुक्यातील मसला खुर्द येथे आज सकाळी घडला. मनोज भगत हे सकाळी घराबाहेर पडले असता घरासमोरील मोकळया शेतात साप प्रणय करताना दिसले.

वाचा सविस्तर...

17:13 (IST) 8 May 2024
वडेट्टीवार म्हणतात, ‘शरद पवार मूळचे गांधी विचारांचे’; सत्ता परिवर्तन होणार

नागपूर : सध्याचे सत्ताधारी पक्ष अवकाळी पावसासारखे जनसामान्यांना उदध्वस्त करणारे आहेत. काँग्रेस मात्र, नियमित होणाऱ्या पावसासारखे असून ते जनतेला सुखावणारे आहे. शरद पवार हे मूळचे गांधी विचारांचे असून अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या त्यांच्या विधानात तथ्य आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

वाचा सविस्तर...

17:11 (IST) 8 May 2024
म्हाडा पुनर्विकासात रहिवाशांना ७० टक्के अतिरिक्त क्षेत्रफळ शक्य! नियमावलीतील तरतुदीकडे दुर्लक्ष?

प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे तुणतुणे वाजवत ही बाब विकासकांकडून लपविली जात असून त्याचा फटका रहिवाशांना बसत आहे.

सविस्तर वाचा...

17:10 (IST) 8 May 2024
मुंबई: कुर्ल्यात नाकाबंदीदरम्यान पावणेदोन कोटींची रोकड सापडली

कुर्ला पश्चिम येथे मंगळवारी रात्री नाकाबंदीदरम्यान एटीएमसाठी रोकड घेऊन जाणारी एक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली.

सविस्तर वाचा...

16:59 (IST) 8 May 2024
म्हाडा पुनर्विकासात रहिवाशांना ७० टक्के अतिरिक्त क्षेत्रफळ शक्य! नियमावलीतील तरतुदीकडे दुर्लक्ष?

प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे तुणतुणे वाजवत ही बाब विकासकांकडून लपविली जात असून त्याचा फटका रहिवाशांना बसत आहे.

सविस्तर वाचा...

16:55 (IST) 8 May 2024
"प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील", शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या पक्षासंदर्भात त्यांनी काय मत व्यक्त करावं हा त्यांचा अधिकार आहे. निवडणुकासुरू झाल्यात तसं राष्ट्रीय पातळीवरील आणि राज्य पातळीवरील पक्ष आहेत. साऊथमधील राज्यापुरते राज्यपक्ष जास्त ताकदवान आहेत - अजित पवार</p>

16:19 (IST) 8 May 2024
अजित पवार म्हणाले, ‘नथुराम गोडसेंची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हेंना…’

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केल्यामुळेच मागील निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना मते मिळाली होती. पण, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसे यांची भूमिकाही कोल्हे यांनी केली.

सविस्तर वाचा...

15:24 (IST) 8 May 2024
डोंबिवलीतील सुयोग हाॅल गल्लीतील बेकायदा बांधकाम निवडणुकीनंतर भुईसपाट, सहा महिन्यांपूर्वीच बांधकाम अनधिकृत घोषित

जगदीश खेडेकर या भूमाफियाने ही इमारत उभारली असल्याचे फ प्रभाग कार्यालयातील अभिलेखावरून स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा...

15:15 (IST) 8 May 2024
चाकण एमआयडीसीत चाललंय तरी काय? पहिल्या कंपनीने दुसऱ्या कंपनीला प्लॅट देऊन केला कोट्यवधींचा भ्रष्टाचार!

पुण्याच्या चाकण एमआयडीसीमध्ये चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पहिल्या कंपनीनं दुसऱ्या कंपनीच्या नावावर ४५ एकर जमिनीचा करार करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. सविस्तर वाचा…

14:06 (IST) 8 May 2024
नवी मुंबई : युवतीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर चार महिन्यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नवी मुंबई : कोपरखैरणेत एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. अखेर आयुक्तांपर्यंत प्रकरण गेल्यावर मात्र आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश जाधव आणि हर्ष जाधव अशी यातील आरोपींची नावे आहेत.

वाचा सविस्तर...

13:55 (IST) 8 May 2024
“ती वादग्रस्त जाहिरात”; आचारसंहिता भंग गुन्हा दाखल

"तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे? भारतात कि पाकिस्तानात? फिर एक बार मोदी सरकार", भारतीय जनता पक्षाची ही जाहिरात वादग्रस्त ठरत आहे.

सविस्तर वाचा...

13:54 (IST) 8 May 2024
नवी मुंबई: एपीएमसीत सामायिक जागेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई

एपीएमसी फळ बाजारात सामायिक जागेचा अतिरिक्त वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

सविस्तर वाचा...

13:51 (IST) 8 May 2024
नोकरी टिकवायचीय? मग विद्यार्थी आणा… संचालकांचा आदेश अन् शिक्षकांची दारोदार भटकंती; पालकांना विविध आमिषे…

चंद्रपूर : कॉन्व्हेंट व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकेच्या शाळांसोबतच खासगी मराठी माध्यमांच्या शाळांनाही विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. अशाप्रसंगी शिक्षक स्वत:ची नोकरी टिकवण्यासाठी विद्यार्थी शोधमोहिमेवर निघाले आहेत.

वाचा सविस्तर...

13:47 (IST) 8 May 2024
"प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील", शरद पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले...

शरद पवार म्हणत आहेत २०२४ नंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. पवारांसारखे मोठे नेते जेव्हा बोलतात तेव्हा ते फार दूरवरचा विचार करून बोलतात. त्यामुळे २०२४ मध्ये सत्तापरिवर्तन होणार आहे - विजय वडेट्टीवार

13:31 (IST) 8 May 2024
कोणी रडलं, काही झालं तरी सुनेत्रा पवार पाच हजारांच्या मताधिक्याने जिंकतील – महादेव जानकर

मेलो तरी चालेल पण बाण, हाथ अन् कमळ चिन्हावर लढणार नाही, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

13:17 (IST) 8 May 2024
उरण मार्गावरील स्थानकांत गैरसोयी; चार महिन्यांपासून विविध रेल्वे स्थानकांत पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही सुविधांचा अभाव

ऐन उन्हाळ्यात घामाघूम झालेल्या हजारो प्रवाशांवर पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

सविस्तर वाचा...

13:16 (IST) 8 May 2024
मुंबई म्हाडा मंडळाकडे घराच्या योजनेसाठी एक लाख ११ हजार गिरणी कामगारांची कागदपत्रे जमा, ९६ हजार कामगार पात्र

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे पावणेदोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी घराच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत.

सविस्तर वाचा...

13:11 (IST) 8 May 2024
अवैध वाहतूक करणाऱ्या खासगी बसवर ‘आरटीओ’ची करडी नजर

नवी मुंबई : अनेकदा खासगी बसमधून प्रवासी वाहतुकीबरोबर व्यावसायिक मालवाहतूकही केली जाते. हे नियमबाह्य असल्याने आरटीओकडून वर्षभर यावर कारवाई सुरूच असते. सोमवारी नवी मुंबई शहरातील महामार्गावर अवैध वाहतूक करणाऱ्या १० बसगाड्यांवर कारवाई करण्यात आली. या बसमधून अनधिकृतपणे आंब्याची, कांद्याची वाहतूक केली जात होती.

सध्या आंब्याचा हंगाम सुरू असून त्याला मागणी ही आहे. त्यामुळे एपीएमसी व्यतिरिक्तही आंब्यांसाठी इतरत्र बाजारपेठ खुली आहे. त्यामुळे आंब्याच्या व्यावसायिक वाहतुकीबरोबर खासगी बसमधूनही वाहतूक होताना दिसत आहे. मे महिन्यात चाकरमान्यांची गावाकडे ये-जा सुरू असते, अशातच चाकरमानी आपल्याबरोबर गावाकडील खाद्या वस्तू देखील आणतात. त्याच अनुषंगाने नवी मुंबई आरटीओकडून खासगी बसवर करडी नजर ठेवली जात असून सोमवारी १० बसगाड्यांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती आरटीओ उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.

12:54 (IST) 8 May 2024
पुणे : खाणाखुणांद्वारे दिलेली साक्ष ठरली टर्निंग पॉईंट, आरोपीला झाली १० वर्षे शिक्षा

पुणे : विशेष मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मुलीने खाणाखुणांनी न्यायालयात साक्ष दिली. पीडित मुलीची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

वाचा सविस्तर...

12:52 (IST) 8 May 2024
मतदार जनजागृतीत ‘एनएमएमटी’चा पुढाकार

नवी मुंबई : मुंबई व परिसरात २० मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत मतदार जनजागृती करण्यात येत असून नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमानेही पुढाकार घेतला असून नवी मुंबई महापालिकेच्या बसगाड्यांमधील चालक, वाहक यांच्याप्रमाणेच एनएमएमटी अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी यांना ‘माझे मत माझा अधिकार’ आणि ‘मी मतदान करणारच’ असे संदेश दोन्ही बाजूने छपाई केलेल्या गांधी टोप्या वितरित करण्यात आल्या आहेत.

 

Marathi News Live Today, 08 May 2024 : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर