सांगली : लोकसभा निवडणुकीत रंग दाखविणाऱ्या नेत्यांचा व्याजासाहित हिशेब चुकता करणार असा इशारा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिला. लोकसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच खा.पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गत तीन महिन्यापूर्वी भाजप कोअर समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपची केंद्रीय व राज्य निवड समिती सांगली मतदारसंघातून जो कोणी उमेदवार देईल, त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही सांगली जिल्ह्यातील सर्वच भाजप नेत्यांनी दिली होती. मात्र कोअर समितीमधीलच काही प्रमुख नेत्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत आपला खरा रंग दाखविला. त्यात माजी राज्यमंत्री अजित घोरपडे व माजी आमदार विलासराव जगताप यांच्याबाबत प्रथमपासूनच शंका होती, ती निवडणूक काळात सर्वांसमोर उघड झाली. त्यामुळे आपण या दोघांनाही निवडणूक प्रचारात सहभागी होण्याची विनंती करायला गेलो नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा