अलिबाग : क्रुरतेचा कळस गाठणारे हत्याकांड रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे समोर आले आहे. बाविस वर्षीय तरुणीची लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, नंतर तीचे हातपाय बांधून निर्घूण हत्या केल्याची बाब समोर आली आहे.  या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या तपासासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. 

 माणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी बावीस वर्षीय तरुणी रविवारी सकाळी 11 वाजता कामावर जाते असे सांगून बाहेर पडली होती. ती घरी परतली नसल्याने, घरचे चिंतातूर होते. या तरुणीची  बहीण दिवसभर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. पण फोन उचचलाल जात नव्हता. सोमवारी दुपारी लोणेरे येथील ओमकार रेसिडेंसी या लाॅज वर तीचा मृतदेह आढळून आला.

 रूम नंबर 101 चा दरवाजा कुणी उघडत नसल्याचे लक्षात लॉज चालकांनी गोरेगाव पोलीसांना बोलावले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यशवंत चव्हाण, पांडुरंग सानप, अभिषेक कदम, दिलीप बेंदुगडे हि टिम लाॅजिंग वरती पोहचले दरवाजा उघडल्यानंतर आत मधील जे दृष्य होतं ते काळजाचा थरकाप उडविणारे होते विवस्त्र अवस्थेतील एक तरूणी पाय बांधलेल्या स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्यात आला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली. सुरूवातीला मृतदेहाची ओळख पटविणे आव्हानात्मक असताना गोरेगाव पोलीसांनी कमी वेळात हे सोपस्कार पार पाडले आणि तो मृतदेह बेपत्ता तरुणीचा असल्याची खात्री पटली. फोरेन्सिक टिम  आणि  डाॅग स्काॅडना पाचारण करण्यात आले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

आधारकार्ड वरती रत्नागिरी येथील पत्ता असलेल्या युवकांनी ही रूम बुक केली होती आणि या ठिकाणाहून पसार झाला. घटनास्थळाची पहाणी करून शवविच्छेदनानंतर जे समोर आले ते भयानक होते आधी लाॅजिंग वरती तिला बोलावले गेले मग लैंगिक अत्याचार झाला नंतर तिचे दोन्ही पाय बांधून कोयत्याने दोन्ही हातांवर, डोक्यावर आणि पायावरती वार करून अत्यंत क्रूर पद्धतीने तिला संपविण्यात आले. अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांनी दिली तर याप्रकरणात लैंगिक अत्याचार, खुन आणि अनुचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नातेवाईकांचा आक्रोश 

मंगळवारी सकाळी 11 वाजता मृत तरुणीचा मृतदेह  तिच्या गावी आणण्यात आला यावेळी तिच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते ज्या क्रुरतेने व निर्दयतेने तिची अमानुष हत्या करण्यात आली त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कुटुंबा कडून करण्यात आली यावेळेस विकास दादा गायकवाड, चंद्रमणी साळवी, प्रकाश नावजी साळवी, विजय जाधव, रविंद्र मोरे, उदय गायकवाड, रोहन साळवी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर उग्र आंदोलन करू ……

तरुणीच्या  हत्येचा सर्वच स्तरांवरून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येत असून स्थानिक पातळीवर देखील संताप व्यक्त होत आहे चार दिवसात आरोपीला अटक करण्यात आली नाही तर संपूर्ण माणगाव तालुक्यात बंद पाळण्यात येऊन रास्ता रोको केला जाईल असा इशारा यावेळी स्थानिक संघटनेने दिला आहे