राहाता : तालुक्यातील ममदापूर येथिल कत्तलखान्यावर लोणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छाा टाकून २.२५ लाखांचे गोवंशाचे मांस जप्त केले. ममदापूर येथिल कत्तलखान्यावर पोलिसांनी अनेकवेळा छापे टाकले मात्र तेथील गोवंशीय जनावरांची कत्तल व गोमांस विक्री मनाई असतानाही, ती थांबलेली नाही. याबद्दल हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. लोणी पोलिसांनी ममदापूर येथील घटनेसंदर्भात ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना ममदापूर येथे जनावरांची कत्तल चालू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस शिपाई निलेश संजय सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इमरान अब्दुलहल शेख (वय २२), मतीन सलीम शेख (वय २२) वसीम हनीफ कुरेशी व नाझीम बशीर पठाण ( दोघेही फरार, सर्व रा. ममदापुर, राहाता) या ४ जणांविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत लोणी पोलिस ठाण्याचे अंमलदार जॉन साळवे, सचिन शेवाळे, निलेश सातपुते यांच्या पथकाने सहभाग घेतला.