खलिस्तान समर्थक ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग सध्या फरार आहे. काही दिवसांपूर्वी जलंधरमध्ये पोलिसांनी त्याचा काही किलोमीटरपर्यंत पाठलागही केला होता. मात्र, पंजाब पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात तो यशस्वी झाला. मात्र, तेव्हापासून त्याला फरार घोषित केलं असून पंजाब पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. एकीकडे या सर्व घडामोडी चालू असताना दुसरीकडे अमृतपाल सिंगमुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. पंजाबच्या आयजीपींनी अमृतपालला शोधून काढण्यासाठी लुकआऊट नोटीस काढल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनीही नांदेड आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये देखरेख वाढवली आहे!

अमृतपाल सिंग नांदेडमध्ये?

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिसांनी तपास वाढवला आहे. जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवण्यात येत असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. पंजाबमधून पोबारा केलेला अमृतपाल सिंग थेट नांदेडमध्ये आश्रयाला आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संशयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कतेची पावलं उचलण्यात आली आहेत. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं यासंदर्भात स्थानिक पातळीवर देखरेख वाढवली आहे.

Patanbori, gambling, social clubs, Yavatmal, Maharashtra, Telangana, illegal activities, rummy, police complicity, border areas, yavatmal news, latest news,
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पाटणबोरी आंतराराज्य जुगाराचे केंद्र; ‘सोशल क्लब’च्या नावाखाली…
hotel politics in maharashtra
पुन्हा काय झाडी, काय डोंगर? महाराष्ट्रात ‘हॉटेल पॉलिटिक्स’ परतण्यामागे काय आहे कारण?
maharashtra navnirman kamgaar Sena,
मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर भरदुपारी गोळीबार, चंद्रपूरच्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील घटना; जखमी अवस्थेत…
wardha, Sharad Pawar, amar kale,
शरद पवारांची ‘ती’ ऑफर ‘या’ खासदाराने नाकारली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या
IT hub, Satara Shirwal,
सातारा शिरवळ येथे आयटी हब, तर पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत – उदय सामंत
Yeoor, noise, environmentalists,
ठाणे : येऊरमध्ये क्रिकेटप्रेमींचा धिंगाणा; गोंगाटाविरोधात आदिवासी, पर्यावरणवाद्यांचे आंदोलन
job opportunities in banking sector career in banking bank jobs in india zws
नोकरीची संधी : बँकेतील भरतीसुहास पाटील
ghatkopar hoarding case
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित

अमृतपाल सिंगचे ७ लुक!

फरार अमृतपाल सिंगचे सात वेगवेगळे लुक पंजाब पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. शिवाय, आताही त्यानं आपली वेशभूषा आणि लुक बदलला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमृतपाल सिंगला अटक करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचं स्पष्टीकरण पंजाबचे आयजीपी सुखचेनसिंग गिल यांनी दिलं आहे.

अमृतपाल सिंगचे सात लुक; पंजाब पोलीसही चक्रावले, पुन्हा रुप बदलल्याचा व्यक्त केला संशय!

“अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. त्याला आम्ही लवकरच पकडू असा आम्हाला विश्वास आहे. आत्तापर्यंत वारिस पंजाब दे आणि अमृतपाल सिंगशी संबंधित १५४ लोकांना अटक करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग याच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे”, अशी माहिती सुखचेनसिंग गिल यांनी दिली.