खलिस्तान समर्थक ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग सध्या फरार आहे. काही दिवसांपूर्वी जलंधरमध्ये पोलिसांनी त्याचा काही किलोमीटरपर्यंत पाठलागही केला होता. मात्र, पंजाब पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात तो यशस्वी झाला. मात्र, तेव्हापासून त्याला फरार घोषित केलं असून पंजाब पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. एकीकडे या सर्व घडामोडी चालू असताना दुसरीकडे अमृतपाल सिंगमुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. पंजाबच्या आयजीपींनी अमृतपालला शोधून काढण्यासाठी लुकआऊट नोटीस काढल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनीही नांदेड आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये देखरेख वाढवली आहे!

अमृतपाल सिंग नांदेडमध्ये?

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिसांनी तपास वाढवला आहे. जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवण्यात येत असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. पंजाबमधून पोबारा केलेला अमृतपाल सिंग थेट नांदेडमध्ये आश्रयाला आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संशयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कतेची पावलं उचलण्यात आली आहेत. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं यासंदर्भात स्थानिक पातळीवर देखरेख वाढवली आहे.

uddhav thackeray latest marathi news
“महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत

अमृतपाल सिंगचे ७ लुक!

फरार अमृतपाल सिंगचे सात वेगवेगळे लुक पंजाब पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. शिवाय, आताही त्यानं आपली वेशभूषा आणि लुक बदलला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमृतपाल सिंगला अटक करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचं स्पष्टीकरण पंजाबचे आयजीपी सुखचेनसिंग गिल यांनी दिलं आहे.

अमृतपाल सिंगचे सात लुक; पंजाब पोलीसही चक्रावले, पुन्हा रुप बदलल्याचा व्यक्त केला संशय!

“अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. त्याला आम्ही लवकरच पकडू असा आम्हाला विश्वास आहे. आत्तापर्यंत वारिस पंजाब दे आणि अमृतपाल सिंगशी संबंधित १५४ लोकांना अटक करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग याच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे”, अशी माहिती सुखचेनसिंग गिल यांनी दिली.