Madhuri Dixit अभिनेत्री माधुरी दीक्षितची मिसेस देशपांडे ही सीरिज १९ डिसेंबरला प्रदर्शित होते आहे. दोन दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितने ANI या वृत्तसंस्थेला एक मुलाखतही दिली. या मुलाखतीत तिने तिच्या काळातले चित्रपट, त्यावेळचं शुटिंग अशा सगळ्या गोष्टींवर तिने भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर राजकारणात जाणार नाही कलाक्षेत्रातच काम करायचं आहे असंही माधुरी दीक्षितने स्पष्ट केलं. पण माधुरी दीक्षितने अनिस इब्राहिमने दुबईला बोलवलं होतं. त्याने काही अटीही घातल्या होत्या. पण माधुरी दीक्षित त्याच्यापुढे झुकली नाही. ती दुबईला गेली नाही. त्यानंतर अनिस इब्राहिम भडकला होता. त्याने माधुरी दीक्षितला ठार मारण्याचा निर्णय घेतला होता. हे सगळं प्रकरण काय? आपण जाणून घेऊ.

माधुरी दीक्षितला आलेल्या धमकीचा किस्सा

माधुरी दीक्षित एकेकाळी टॉपची अभिनेत्री होती यात काही शंकाच नाही. त्या काळात तिचे चित्रपटही चर्चेत होते. ९० च्या दशकात अंडरवर्ल्ड आणि हिंदी सिनेसृष्टी यांचं अलिखित नातं होतं. काळा पैसा पांढरा करण्यासाठी दाऊद इब्राहीम, अनिस इब्राहीम, छोटा राजन हे सगळेच चित्रपटांमध्ये पैसे गुंतवत असत. मात्र काही सेलिब्रिटी असे होते जे अंडरवर्ल्डच्या दबावापुढे झुकले नाहीत. ज्यापैकी एक नाव आहे माधुरी दीक्षितचं ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी ‘आवारा मुसाफिर’ नावाच्या पॉडकास्टमध्ये माधुरी दीक्षितच्या हत्येचा कट अनिस इब्राहीमने कसा रचला होता आणि त्यापासून तिला पोलिसांनी कसं वाचवलं याबाबतची माहिती दिली आहे.

माधुरी दीक्षित बाबत काय म्हणाले जितेंद्र दीक्षित?

माधुरी दीक्षितचा जीव पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी एक प्रकारे वाचवला होता. अनिस इब्राहिम माधुरी दीक्षितवर दुबईला येण्यासाठी दबाव टाकत होता. त्याचा हेतू अर्थातच चांगला नव्हता. कारण अनिस इब्राहिम ९० च्या दशकात अनेक अभिनेत्रींना दुबईला बोलवत असे. त्यांना गिफ्टही द्यायचा आणि त्याला जे काही करायचं आहे ते करायचा. माधुरी दीक्षितवरही त्याची नजर होती. मात्र माधुरी दीक्षितने त्याच्या मागण्यांसमोर गुडघे टेकले नाहीत. तिने दुबईला जाण्यास नकार दिला. ज्यामुळे अनिस इब्राहिम भडकला होता. त्याने अनिस इब्राहिमने ठरवलं होतं की माधुरी दीक्षितची हत्या केली जाईल. या सगळ्याची माहिती त्यावेळी मुंबईतल्या गुन्हे शाखेकडे आली. अविनाश धर्माधिकारी यांना ही माहिती मिळाली होती. ज्यानंतर गुन्हे शाखेने मग माधुरी दीक्षितला सुरक्षा पुरवली होती. तसंच माधुरी दीक्षितच्या विरोधात कारवाया करु शकतील अशांवर वॉचही ठेवला होता. त्यानंतर काही वर्षांसाठी माधुरी दीक्षित भारताबाहेर निघून गेली. तिला त्यावेळी बरीच मोठी धमकी आली होती. पण त्यापुढे तिने गुडघे टेकले नाहीत. असं जितेंद्र दीक्षित यांनी म्हटलं आहे.

Madhuri Dixit News
माधुरी दीक्षितची नवी वेब सीरिज १९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

शाहरुख खान, आमिर खान कधीही अंडरवर्ल्डच्या पार्ट्यांना गेले नाहीत

माधुरी दीक्षितप्रमाणेच इतरही स्टार्स होते ज्यांनी अंडरवर्ल्डशी संबंध ठेवले नाहीत. शाहरुख खान कधीच अंडरवर्ल्डच्या पार्ट्यांना गेला नाही. कधीही फोटो काढले नाहीत. आमिर खानही कधीच अशा अंडरवर्ल्डच्या पार्ट्यांना गेला नाही. अमिताभ बच्चन हे देखील कधी दाऊद किंवा अनिसच्या पार्टीत गेले नाहीत. अमिताभ बच्चन हाजी मस्तान, करीमलाला, शशी कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहे. त्यावेळी राजकीय नेत्यांबरोबरही हाजी मस्तान, करीमलाला असायचे. हिंदी चित्रपटसृष्टी आणि अंडरवर्ल्ड यांचं कनेक्शन अनेक वर्षांपासून होतंच. याचं मुख्य कारण पैसाच होतं. कारण अंडरवर्ल्डमध्ये बराच पैसा होता. काळा पैसा पांढरा करण्यासाठी सिनेव्यवसाय हे मोठं साधन अंडरवर्ल्डकडे होतं अशी माहिती जितेंद्र दीक्षित यांनी दिली.