Madhurima Raje : कोल्हापूरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस प्रचंड गाजला आणि चर्चेत राहिला त्याचं कारण ठरलं सतेज पाटील आणि शाहू महाराज यांच्यातला वाद. मधुरिमा राजेंनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने सतेज पाटील यांच्या संयमाचा कडेलोट झाला. कोल्हापूर उत्तर या जागेसाठी झालेला राडा महाराष्ट्राने पाहिला आहे. आपण जाणून घेऊ ज्यांच्यामुले सतेज पाटील ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे ( Madhurima Raje ) आहेत तरी कोण?

कोल्हापूरमध्ये काय घडलं?

पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे खमके नेते म्हणून ओळख असलेल्या सतेज पाटलांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि व्हिडीओ काही मिनिटात महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याआधी मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेताना झालेला राडाही महाराष्ट्राने पाहिला. मात्र ज्यांच्यामुळे घटनांची ही सर्व मालिका सुरू झाली त्या मधुरिमाराजे ( Madhurima Raje ) नेमक्या कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. काँग्रेस खासदार शाहू महाराज यांच्या त्या सूनबाई तर आहेतच, मात्र त्यांच्या माहेरकडूनही त्यांना राजकीय वारसा लाभला आहे.

Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : “दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना…”, काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सतेज पाटील संतापले
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe
Balasaheb Thorat : “…म्हणून ते चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रम होता”, बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर हल्लाबोल
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Madhureema Raje Chhatrapati
Shahu Chhatrapati : “…म्हणून मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे”, अखेर शाहू छत्रपतींनी सोडलं मौन; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Who is Madhurima Raje ?
मधुरिमा राजे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून घेतली माघार, सतेज पाटील संतापले. (फोटो-मधुरिमा राजे, इन्स्टाग्राम पेज)

कोण आहेत मधुरिमा राजे?

मधुरिमा राजे ( Madhurima Raje ) या कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या त्या सूनबाई आहेत. काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या सून आणि मालोजीराजे छत्रपती यांच्या त्या पत्नी आहेत. दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या त्या कन्या आहेत. दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या असल्याने राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. मधुरिमा राजे ( Madhurima Raje ) छत्रपती घराण्याच्या सून झाल्यानंतरही त्यांचा सामान्यांमध्ये चांगला वावर होता. मागच्या २० वर्षांपासून मधुरिमाराजे या कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. माहेर आणि सासरची राजकीय पार्श्वभूमी, राजघराणं आणि उत्तम जनसंपर्क यामुळे मधुरिमा राजे यांना काँग्रेसने कोल्हापूर उत्तरमधून तिकिट दिलं. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटं उरली असतांना त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोल्हापूर उत्तरचा राडा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला.

हे पण वाचा- “…म्हणून मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे”, अखेर शाहू छत्रपतींनी सोडलं मौन

कोल्हापूर उत्तरमध्ये नाराजीनाट्याचे दोन अंक

२७ ऑक्टोबरला काँग्रेसचे कार्यकर्ते राजेश लाटकर यांना कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत काही नगरसेवकांनी नाराजीचं पत्र दिलं. त्यामुळे त्यांचं नाव मागे घेऊन मधुरिमा राजे छत्रपती यांचं नाव उमेदवार म्हणून पुढे करण्यात आलं. नाराजीनाट्याचा खेळ इथेच सुरु झाला. आपल्याला विश्वासात न घेता उमेदवारी काढून घेतली म्हणून राजेश लाटकर यांनी अपक्ष अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ४ नोव्हेंबरला मधुरिमा राजेंनी अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतला. ज्यानंतर सतेज पाटील यांचा प्रचंड संताप झालेला पाहण्यास मिळाला.

Story img Loader