राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांशी संवाद साधला. दरम्यान, या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी कोणी कितीही काहीजरी प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत जाणारच, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> “पुनर्जन्म असेल तर देवाने पुढील जन्मात मला…”; प्रदीप भिडेंनी ‘एवढीच त्याच्याकडे प्रार्थना’ म्हणत व्यक्त केलेली इच्छा

“२४ वर्षांनी निवडणुका होत आहेत. शेवटची निवडणूक कधी झाली हे आपल्याला आठवावं लागतं. एक परंपरा पाळायला हरकत नव्हती. खरंतर ही एक विचित्र गोष्ट आहे. सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी आहेत. मात्र राजकारणात संभ्यता पाळायला हरकत नव्हती,” असे उद्धव ठाकरे म्हणाले

हेही वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : संयुक्त राष्ट्राने दिली प्रतिक्रिया, केला सहिष्णुतेचा उल्लेख

या बैठकीनंतर महाविकास आघाडीमधील इतर नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, या बैठकीत वेगळं काही बोललं गेलं नाही. महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असल्यानं आपले चारही उमेदवार निवडून येणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच सत्तापिपासू लोकांना आपल्याला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपलं ऐक्य दाखवा, असं मुख्यमंत्री बैठकीत म्हणाल्याची माहिती अभिजीत वंजारी यांनी दिली आहे.

हेही वाचा >>महाविकास आघाडीची बैठक संपली; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

दरम्यान, या बैठकीत १२ अपक्ष आमदारांसह काँग्रेसचे ३२, शिवसेनेचे ४५, राष्ट्रवादीचे ४२ आमदार उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना निवडून आणा, ऐक्य दाखवा आणि मतदान करताना काळजी घ्या, असं शरद पवारांनी बैठकीत आमदारांना सांगितलं आहे.