राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहे. या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज (११ जानेवारी) महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत शिक्षक मतदारसंघाची निवडणूकी शिवसेना, (ठाकरे गट) राष्ट्रवादी तसेच काँग्रेस यांनी एकत्रितपणे लढण्याचा संकल्प केला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार, आता पुढे काय? ठाकरे गटाचे नेते म्हणाले…

Amravati , ok sabha election 2024, Constituency Overview, navneet rana, bacchu kadu, BJP
मतदारसंघाचा आढावा : अमरावती; जनतेच्या न्यायालयातील लढाई नवनीत राणांसाठी अग्निदिव्य ठरणार
chandrapur lok-sabha-constituency-review-2024 challenge for Sudhir Mungantiwar
मतदारसंघाचा आढावा : चंद्रपूर- काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांची कसोटी
Vanchit, Ramtek
वंचितच्या उमेदवाराचे भाजप कनेक्शन, अपक्षाला पाठिंबा, काय आहे रामटेकचे राजकारण ?
Teach lesson to BJP to protect democracy and constitution says Praniti Shinde
लोकशाही व संविधान रक्षणासाठी भाजपला धडा शिकवा- प्रणिती शिंदे

राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आज (११ जानेवारी) बैठक पार पाडली. या बैठकीत सध्या सुरू असलेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या महाविकास आघाडीच्या भूमिकेविषयी सविस्तर माहिती दिली. “आम्ही सर्वांनी एकत्रितपणे चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच इतर घटकपक्ष ही निवडणूक एकत्र लढवणार आहोत. आमच्यासोबत अन्य पक्षदेखील आहेत. काही ठिकाणी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी अर्ज भरणे बाकी आहे. सर्व पक्षांत समन्वय साधण्याची भूमिका आज आम्ही एकमताने घेतलेली आहे. यामध्ये अमरावती आणि नाशिक मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. शेतकरी कामगार पक्ष कोकणात निवडणूक लढवले. मराठवाड्यात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. नागपूर मतदासंघातून शिवसेनाचा उमेदवार असेल,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीचे काम म्हणजे ‘वर्क फ्रॉम जेल’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

“उद्या आमचा अमरावतीचा उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. तर मराठवाड्याच्या उमेदवाराने आजच अर्ज दाखल केलेला आहे. आम्ही आराखडा ठरवलेला आहे. नागपूरच्या जागेसाठी एकमत करून एकास-एक उमेदवारी कशी होईल, यावर आमचे एकमत झालेले आहे. नागपूर मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराने आज अर्ज भरलेला आहे. या मतदारसंघातून ज्या इतर उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत, त्यांच्याशी सल्लामसलत केली जाईल. ही निवडणूक महाविकास आघाडी एकमताने, एकत्रितपणे लढवणार आहे,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले.