धुक्याची चादर अन् ढगांचा भारी खेळ ; निसर्गाचा अद्भुत नजारा
विश्वास पवार
वाई:महाबळेश्वर मध्ये मागील चार पाच दिवसात सकाळ पासून चार वाजेपर्यत उन्हाळा आणि सायंकाळ पासून पहाटे पर्यंत धुक्याची चादर पसरत आहे.निसर्गाचा अद्भुत नजारा पर्यटक अनुभवत आहेत. तप्त उन्हामुळं अंगाची लाही लाही होतानाचे चित्र अनेक ठिकाणी आहे.मात्र मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर मध्ये परिस्थिती काही वेगळीच आहे.नेहमी महाबळेश्वर मधला निसर्गातील बदल मात्र सर्वांनाच अचंबित आणि अवाक करणारा असतो.महाबळेश्वरातील दुपारचे तापमान जास्त असते.
दिवसभर कडक उन्हाळा आणि सायंकाळ ते पहाटे पर्यंत सकाळी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये धुके आणि ढगांचे लोट पाहायला मिळालेमात्र सुर्यास्तानंतर महाबळेश्वर फिरायला आलेल्या पर्यटकांना थंडीचा सामना करावा लागतोय.या परिसरातील दऱ्याखोऱ्यातील अनेक डोंगर तर या ढगांच्या खेळात लुप्त झाले होते.सायंकाळच्या वेळेस पर्यटकांना स्वेटर, कानटोपीचा आधार घ्यावा लागत आहे राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर मात्र महाबळेश्वर थंडगार धुक्याची चादर अन् ढगांचा भारीच खेळ!
राज्यात तापमान वाढत असताना महाबळेश्वरमध्ये मात्र हिवाळ्याचा फिल येत आहे.महाबळेश्वर मध्ये मे महिन्याच्या हंगामास सुरूवात झाल्याने पर्यटकांची मोठी गर्दी आहे. निसर्गाची विविध रूपे पाहण्यासाठी लाखो पर्यटक महाबळेश्वर मध्ये दाखल होऊ लागले आहेत.
