|| विश्वास पवार

वाई : महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे तापमानाचा पारा या आठवड्यात एकदम कमी झाला आहे. मागील महिनाभरात पहाटे कडाक्याची थंडी असून पाचगणीचा पाराही घसरला आहे. थंडी वाढल्याने गवतावर पडलेले दर्वंबदू काही प्रमाणात गोठले. वाईला तसेच पाचगणी महाबळेश्वरला थंडीचा मोठा कडाका आहे. दररोज पहाटेपासून सर्वत्र धुक्याची चादर पसरत आहे. यातून ज्वारीसह पिकांना मोठा फटका बसला आहे.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसून येतोय. थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात कालच्या तुलनेत आज पारा चांगलाच घसरलाय. वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद झालेली आहे. तर सकाळी सहा वाजता वेण्णा लेकवर एक अंश तापमानाची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत वेण्णालेकवर तापमान तब्बल चार अंशांनी घसरलं आहे. तापमान शून्य अंशांवर आल्याने महाबळेश्वरात दर्वंबदू गोठले होते. त्यामुळे महाबळेश्वरात काश्मीरसारखा आभास होत होता. पर्यटकही गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसले.

दरवर्षी डिसेंबर महिन्यात महाबळेश्वर येथील वेण्णा लेकवरील दर्वंबदू गोठत असतात. यंदा मात्र जानेवारीमध्ये गुलाबी थंडी पडली असल्याने दर्वंबदू गोठण्यास सुरुवात झाली आहे. करोनामुळे पर्यटनस्थळं बंद होती, यामुळे पर्यटकांना मात्र याचा आनंद घेता येत नसल्याची खंत व्यक्त करत आहे.

पाचगणी व परिसरात ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले असून हवामान बदलामुळे ढग पाचगणीच्या निसर्गात एकरूप झाल्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आणि स्थानिकांना पाहायला मिळाले. पाचगणी शहर व परिसरावर ढगांचे लोट पसरले असल्याने आज सकाळच्या सुमारास जम्मू-काश्मीरसारखा नजारा पाहायला मिळाला.

अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून त्याभोवती नागरिक शेकत बसल्याचे चित्र दिसत आहे. ६ जानेवारी २०२० रोजी महाबळेश्वरातील कमाल तापमान २३.७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ७ जानेवारीला थंडीचा जोर आणखीच वाढला होता. त्यामुळे प्रसिद्ध वेण्णा तलावावर सहा-सात जानेवारीला भल्या पहाटेपासून धुके मोठ्या प्रमाणात दिसत होते. त्यामुळे जणू धुक्याची चादरच पसरल्याचे दृश्य सध्या पाहायला मिळते आहे. सकाळी वेण्णा तलावावर गेलेले नागरिक मनमुरादपणे याचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे महाबळेश्वरमधील थंडी अनुभवण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम स्थिती निर्माण झाली आहे.

वाढत्या थंडी आणि धुक्याचा सामना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना दूध विक्रेत्यांना, तसंच औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. या धुक्यामुळे ज्वारीसह, भाजीपाला, फळबागांना, पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर,खंडाळा, फलटणसह माण, खटावमध्येही धुक्याची झालर पसरलेली होती.

हवामान विभागाकडून राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. महाबळेश्वर-पाचगणी येथे मागील काही दिवसांत हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवामानात बदल झाला आहे.

रात्रीच्या वेळी महाबळेश्वरचा पारा एकदम खाली घसरला असतो. अशा कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी महाबळेश्वर आणि नजीकच्या परिसरात गावकरी शेकोटी पेटवून उब घेताना दिसत आहेत.

संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात भागात सध्या असंच चित्र पाहायला मिळतं आहे. महाबळेश्वर शहरात सोमवारी सकाळी ६.५ अंश या नीच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. वाई शहर, कृष्णा नदीपात्र आणि गणपती घाट धुक्यात हरवत आहे.

सकाळच्या वेळेत कोवळं ऊन पडल्यानंतरही महाबळेश्वर पट्ट्यात थंडी आणि गार वाऱ्यांचा प्रभाव कायम पाहायला मिळतो आहे. दर्वंबदू गोठून गाड्यांच्या टपावर बर्फ जमा झालेला पाहायला मिळाला.सध्या करोनामुळे महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक आणि नजीकच्या परिसरात पर्यटन बंद असल्यामुळे इथे शुकशुकाट पाहायला मिळतो आहे.आज पहाटे महाबळेश्वरच्या वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातला तापमानाचा पारा शून्य अंशाच्या जवळ गेलेला पाहायला मिळाला यामुळे महाबळेश्वरात दर्वंबदू गोठतील, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

पिके, फळबागांना फटका

थंडीचा कडाका असाच राहिला तर पुन्हा एकदा पर्यटकांसह स्थानिकांना हिमकणांची नजाकत (पर्वणी) अनुभवायास मिळेल. वाढत्या थंडी आणि धुक्यांचा सामना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना, दूध विक्रेत्यांना, औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. या धुक्यामुळे ज्वारीसह, भाजीपाला, फळबागांना, पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर, खंडाळा, फलटणसह माण, खटावलाही धुक्याची झालर पसरलेली होती. कडाक्याच्या थंडीमुळे दिवसभर पर्यटक स्वेटर, शोल्स, मफलर, कानटोपी अशी गरम वस्त्रे परिधान करून गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत असून मुख्य बाजारपेठेतदेखील उबदार शाल, स्वेटर, मफलर, ब्लँकेट्स आदींच्या खरेदी करताना पर्यटक दिसत आहे.