वाई: शाळेला लागलेल्या सुट्टय़ा आणि राज्यभर अंग भाजून काढणाऱ्या उन्हाळय़ामुळे थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी उन्हाळी हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या वेण्णालेकसह सर्व पॉईंट आणि मुख्य बाजारपेठ पर्यटकांनी फुलून गेली आहे.गेल्या काही दिवसात राज्यभर कमालीचा उकाडा वाढला आहे. शाळांना लागलेल्या सुट्टय़ा आणि या उकाडय़ामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी महाबळेश्वरकडे आपली पावले वळवली आहेत. सध्या येथे दिवसभर आल्हाददायक वातावरण आणि सायंकाळपासून सकाळपर्यंत थोडीशी थंड हवेची अनुभूती आहे. या बदललेल्या वातावरणामुळं पर्यटक खूश आहेत.

महाबळेश्वरचे आकर्षण असलेल्या ऑर्थरसीट पॉईंटसह पौराणिकदृष्टय़ा महत्त्वाचे असलेले श्रीक्षेत्र महाबळेश्वर, केट्स पॉईंट तसेच पश्चिम घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध लॉडविक व एलिफंट हेड सोबतच सायंकाळी मुंबई पॉईंट येथे सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. ऐतिहासिक किल्ले प्रतापगड, शिवकालीन खेडेगाव, मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत. नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला तर चौपाटीचे स्वरूप आले असून पाणीपातळी घटली तरी नौकाविहाराचा मनमुराद आनंद पर्यटक लुटत आहेत. सोबतच गरमागरम कणीस, पावभाजी, पाणीपुरी, भेळ तर येथील चविष्ट स्ट्रॉबेरी विथ क्रीम, विविध रंगी आईस गोळासारख्या थंड पदार्थावर देखील पर्यटक ताव मारताना पाहावयास मिळत आहेत. अनेक हौशी पर्यटक वेण्णालेक परिसरात घोडेसवारीचा आनंद घेत आहेत. येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरीची चव चाखताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत. पर्यटक प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर खरेदीसाठी येथील मुख्य बाजारपेठेत पर्यटक गर्दी करत आहेत. येथील चणा, चिक्की, जाम सोबतच प्रसिद्ध चप्पलची खरेदी पर्यटकांकडून केली जात आहे.

dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
heavy rain in Isapur dam area water level increased 7 gates opend alert issued
इसापूर धरणाचे सात दरवाजे उघडले; विदर्भ -मराठवाडा सीमेवरील गावांना सतर्कतेचा इशारा
Heavy rains in Buldhana district cause severe damage to crops
अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
Pavana dam is 100 percent full
पिंपरी : शहरवासीयांची वर्षभराची चिंता मिटली, पवना धरण भरले शंभर टक्के
Nepal bus accident, indian bus plunges in river, Nepal, tourists, Jalgaon, Bhusawal, Pokhara, Kathmandu,
नेपाळ बस अपघातातील मृतांमध्ये जळगावच्या काही भाविकांचा समावेश
Tadoba Tiger Safari and Tourism become Expensive
चंद्रपूर : पर्यटकांच्या खिशाला कात्री! ताडोबा व्याघ्र सफारी व पर्यटन महागले…