महापुरामुळे महाड शहरात चिखल आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील कचरा उचलण्यासाठी मोहीम राबिविण्यात येत आहे. शनिवारपर्यंत तब्बल ६ हजार ७०० मेट्रीक टन कचरा उचलण्यात आला आहे. महाडमधून काढण्यात येत असलेला कचरा बघून नागरिकही अचंबित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापूरानंतर महाड शहरात दीड ते दोन फूट चिखलाचा थर जमा झाला होता. घरामधील अन्नधान्य भिजल्यानं कुजण्यास सुरवात झाली होती. बाजारपेठेतील मालही भिजून खराब झाला होता. हा सर्व कचरा शहरातील रस्त्यांवर पडला होता. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. शहराची स्वच्छता करणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. त्यामुळे मुंबई. नवी मुंबई, ठाणे, पनवेल अंबरनाथ आणि पुणे महानगर पालिकांची यांची स्वच्छता पथके यांत्रिक सामुग्रीसह महाड मध्ये दाखल झाली होती. या शिवाय रायगड जिल्ह्यातील सर्व नगर पालिकांचे स्वच्छता कर्मचारी महाड मध्ये बोलविण्यात आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahad flood updates cleaning work cleaning team bmc pmc bmh
First published on: 01-08-2021 at 16:53 IST