आजचा कार्यक्रम हा पंकजा मुंडे यांच्या भक्ती आणि शक्तीचा कार्यक्रम आहे. ज्या गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची फळी बांधली त्याला बळ देण्याचे काम पंकजा मुंडे करत आहेत. त्यांच्या मागे आपण उभं राहील पाहीजे, ही माझी विनंती आहे, असे आवाहन राकप नेते महादेव जानकर यांनी केले. भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे, यावेळी जानकर बोलत होते.
जानकर म्हणाले, “सावरगाची निर्मिती पंकजा मुंडे यांनी केली. पंकजा मुंडेचं हेलिकॉप्टर नाही फिरलं तर कोणी आमदार खासदार होत नाही. पक्ष येतील आणि जातील मानूस जिवंत राहीला पाहीजे. आमची औलाद नाही. आम्ही आमच्या मानच्या हिंमतीने उभं राहण्याचा प्रयत्न करु. गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात ३१ मे ला सांगितल होतं. पंकजाताई, प्रितमताई हा महादेव जानकर मेला तरी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही काळजी करु नका.”
हेही वाचा- आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर दिल्लीपर्यंत पोहचतो – प्रीतम मुंडे
“नेता हा बनवता येत नाही, नाटक करता येत नाही. तो खरा पाहीजे, त्याला रक्तातून बनाव लागतं आणि रक्ताचं असावं लागतं, हे लक्षात ठेवा. गोपीनाथ मुंडे नसते तर मी मेंढरं हाकत बसलो असतो,” असे महादेव जानकर म्हणाले.
हेही वाचा – “…कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी नाही,” पंकजा मुंडेंचं भगवानगडावर तुफान भाषण
पंकजा ताई तुम्ही काळजी करु नका माझा पक्ष उत्तर प्रदेशात देखील चांगल काम करत आहे. तुम्ही त्याठीकाणी आमदार, खासदार व्हाल, असे जानकर म्हणाले. यावेळी त्यांनी ओबीसी जनगणना प्रश्नावरुन सरकारवर टीका केली.