scorecardresearch

सर्वसान्यांना दिलासा! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा महानगर गॅसचा निर्णय; ‘हे’ असतील नवे दर

महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

cng and png price
संग्रहित

महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी प्रति किलो ६ रुपये, तर पीएनजीच्या दरात ४ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या सर्वसामांन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – “आम्ही राजकीय बळी ठरलो”; बिल्किस बानो प्रकरणातील आरोपीने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिली प्रतिक्रिया

महानगर गॅसने दिलेल्या माहितीनुसार, सीएनजी प्रति किलो ६ रुपये, तर पीएनजीच्या दरात ४ रुपयांची घट करण्यात आली आहे. हे नवे दर १७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. हा निर्णय मुंबई आणि आसपासच्या परिसरात लागू होणार आहे. त्यामुळे मुंबईत आता सीएनजी ८० रुपये, तर पीएनजी ४८ रुपये ५० पैसे असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-08-2022 at 23:09 IST