Maharashtra SSC Supplementary Exam Date 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकालातच १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थ्यी उर्तीर्ण झाले आहे, त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्के ९४.१० टक्के इतकी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाात १.७१ टक्के घट झाली. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे.

अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती?

यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यातील २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त आणि ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवून ४ लाख ९७ हजार २७७ जण उतीर्ण झाले आहेत. राज्यात ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत म्हणजे ४५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पण ६० टक्यांपेक्षा कमी गुण मिळवून उत्तीर्ण झाले. तर एकूण ८६ हजार ६४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा कधी? (Maharashtra SSC 10th Re-Examination Exam 2025)

या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. यंदा दहावीच्या फेरपरीक्षेसाठी १५ मे २०२५ पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल, तर परीक्षा २४ जून ते १ जुलै यादरम्यान घेण्यात येईल, असे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. बोर्ड लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर फेर परीक्षांचे विषयवार तपशीलवार वेळापत्रक प्रसिद्ध करेल. या वेळापत्रकात प्रत्येक विषयाच्या अचूक तारखा समाविष्ट असतील, जेणेकरून विद्यार्थी त्यानुसार नियोजन करू शकतील. फेरपरीक्षांना बसण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी mahahsscboard.in वर ऑनलाइन नोंदणी करू शकतील.

दहावीचे विद्यार्थी निकालानंतर गुणपडताळणीसाठी कधीपर्यंत देऊ शकतात? (Maharashtra Board SSC 10th Result 2025)

महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करतानाच निकालावर समाधानी नसलेले विद्यार्थी गुणांच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीच्या निकालाचे पुनर्मूल्यांकन ऑनलाईन केले जाईल. महा एसएससी 2024 च्या निकालाच्या पुनर्मूल्यांकनाची मुदत १४ मे २०२५ ते २८ मे २०२५ दरम्यान असेल. विद्यार्थी https://mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन गुणपडताळणीसाठी अर्ज करु शकतात.

विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकन करण्यासाठी एका विषयाच्या पेपरच्या फोटो कॉपीसाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागेल.

तर एका विषयातील गुणपडताळणीसाठी ५० रुपये शुल्क भरावे लागेल.

तसेच एका विषयाची फोटो कॉपी घेतल्यानंतर त्याचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ३०० रुपये भरावे लागतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी खास सुविधा

ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले आहेत किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांच्या मनात काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तर देण्यासाठी काही समुपदेशकांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येईल.