महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एनसीईआरटीच्या दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचे विज्ञान सांगणारा भाग वगळल्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. तसेच या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन विकसित होण्यात अडथळा येईल, असं म्हणत एका अभियानाची घोषणा केली आहे. यानुसार अंनिस राज्यभर ‘चला उत्क्रांती समजून घेवूया’ हे अभियान राबवणार आहे. “दहावीच्या अभ्यासक्रमात अनुवांशिकता आणि उत्क्रांती असे दोन भाग होते. आता त्यातील उत्क्रांती हा भाग वगळून त्या जागी केवळ अनुवांशिकता एवढाच भाग ठेवण्यात आला आहे. अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याच्या निर्णयाचा आम्ही कृतीतून निषेध व्यक्त करणार आहोत,” असं अंनिसने सांगितलं. याबाबत महाराष्ट्र अंनिसकडून डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव आणि श्रीपाल लालवाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

अंनिसने म्हटलं, “पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पती कशी झाली याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे केली जाते. टप्प्याटप्प्याने एक पेशीय प्राणी त्यानंतर बहुपेशीय प्राणी, आधीच्या टप्प्यात माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांमधून मानवी उत्क्रांती कशी झाली याची शास्त्रीय माहिती यामध्ये दिली जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यामागे कोणतीही विशिष्ट शक्ती नसून उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे.”

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

“उत्क्रांती सिद्धांतामुळे विद्यार्थ्यांची विज्ञानवादी भूमिकेशी तोंडओळख”

“ही माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून होते. मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अंधश्रद्धांची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला याची योग्य माहिती नसल्याने होते. त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय अभ्यासक्रमातून शिकवल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्प्पतीमागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंडओळख होते,” अशी भूमिका अंनिसने मांडली.

“उत्क्रांती सिद्धांत वगळल्यामुळे विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा”

अंनिसने पुढे म्हटलं, “प्रत्यक्षात सहावी सातवीच्या विद्यार्थ्याला याविषयी प्रश्न पडू लागतात. त्यामुळे तेव्हापासून टप्प्याटप्प्याने याविषयी माहिती शालेय अभ्यासक्रमातून येणे आवश्यक आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय पुस्तकांमधून वगळल्यामुळे मुलांमध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे.”

“देशभरातील १८०० वैज्ञानिकांचा या निर्णयाला विरोध”

“भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये हा उत्क्रांती सिद्धांत जीव शास्त्रातील मुलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांती या विषयी विशेष कोर्सही शिकवले जातात. अशा पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे जे विद्यार्थी दहावीनंतर विज्ञान शाखा घेणार नाहीत त्यांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही. देशभरातील १८०० वैज्ञानिकांनी या निर्णयाला विरोध नोंदवला आहे. त्याला महाराष्ट्र अंनिस पाठिंबा देत आहे,” असेही अंनिसने आपल्या पत्रात नमूद केले.

हेही वाचा : “त्र्यंबकेश्वरमध्ये अजूनही जातिभेद, गावजेवणात जातीनुसार वेगवेगळ्या पंगती”, अंनिसचा गंभीर आरोप, म्हणाले…

अंनिस ‘चला उत्क्रांती समजून घेवूया’ अभियानात नेमकं काय करणार?

१. उत्क्रांती विषयावर शालेय मुलांसाठी पुस्तिका प्रकाशन

२. विज्ञान शिक्षकांसाठी उत्क्रांती विषयावर कार्यशाळा

३. NCERT ला उक्रांती विषय शिक्षणत समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिण्याची मोहीम

४. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उत्क्रांती विषयावर मांडणी करणाऱ्या प्रशिक्षित वक्त्यांचे नेटवर्क उभे करणे