कुंडली पाहून फुटबॉल संघ निवडप्रकरणी राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करा आणि या कामी ज्योतिषाला दिलेल्या १५ लाख रुपयांची नुकसान भरपाई फुटबॉल कोच आणि भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष यांच्याकडून वसूल करून घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली.

“भारतीय फुटबॉल संघाचे कोच इगोर स्टीमक यांनी आशिया कप पात्रता फेरीच्या सामन्याच्या दोन दिवस आधी भारतीय फुटबॉल संघाची संपूर्ण माहिती भूपेश शर्मा नावाच्या ज्योतिषाला दिली होती. प्रत्येक खेळाडूंच्या ग्रह स्थितीनुसार भूपेश शर्माने दिलेल्या सल्ल्यानुसार अंतिम संघात कोण खेळणार किंवा नाही हे ठरवले गेले होते,” असा आरोप अंनिसने केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

“अशास्त्रीय गोष्टी राष्ट्रीय संघ निवडताना वापर करणे हे अत्यंत चुकीचे”

अंनिसने म्हटलं, “ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्म विज्ञान आहे. ग्रह-गोल-ताऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ असे म्हणतात. खगोल शास्त्राच्या उपलब्ध अभ्यासनुसार ग्रह-गोल-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टी राष्ट्रीय संघ निवडताना वापर करणे हे अत्यंत चुकीचे आहे. जीवापाड मेहनत करणाऱ्या खेळाडूंच्या कर्तुत्वावर अविश्वास ठेवणारे आहे.”

“जगाच्या अंताविषयीच्या ४५ दाव्याचा फोलपण सिद्ध”

“डॉ. जयंत नारळीकर यांच्यापासून अनेक जेष्ठ खगोल वैज्ञानिकांनी ज्योतिषाला विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासून ते फोल असल्याचे सिद्ध केले आहे. जेष्ठ वैज्ञानिक जेम्स रेन्डी यांनी जगाच्या अंताच्या विषयी केलेल्या ४५ दाव्यांचा अभ्यास करून त्यांचा फोलपण सिद्ध केला होता. तसेच भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते व्ही. वेन्कटरामन यांनीही ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे. याचीही आठवण या निमित्ताने करू देण्यात आली आहे,” अंनिसने म्हटलं.

हेही वाचा : Asian Cup: ज्योतिष्याच्या सल्ल्यानं झाली भारतीय संघाची निवड! संघप्रशिक्षकानं दिली खेळाडूंची माहिती

“वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टींमुळे समाजात स्तोम माजते”

अंनिसने पुढे म्हटलं, “सध्याच्या शासनाने ज्योतिषासारख्या अवैज्ञानिक गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा जो प्रकार चालवला आहे त्यामुळेच अशा गोष्टींना एक प्रकारे शासनाची मान्यता असल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. जन्मवेळ, कुंडली अशा कोणत्याही वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टींमुळे समाजात स्तोम माजते. आपल्या कर्तृत्वापेक्षा ज्यांचा आपल्या वैयक्तिक कर्तृत्वाशी काहीही सबंध नाही अशा गोष्टींवर अवलंबून राहणारी मानसिकता यामधून निर्माण होते. ते समाजासाठी अत्यंत घातक आहे.”

“अन्यथा ज्योतिषाचा ग्राहक संरक्षण कायद्यात समावेश करा”

“एका बाजूला चांद्रयान -३ चंद्रावर पाठ्वाण्यातून विज्ञानवादी मानसिकता जोपासण्याचे महत्व अधोरेखित होत आहे. असं असताना अशा स्वरूपाच्या अशास्त्रीय गोष्टींना उत्तेजन देणे शासनाने टाळायला हवे. ज्योतिषाला कुठलाही वैज्ञानिक आधार नसून ते केवळ मनोरंजनाचे मध्यम आहे ही भूमिका शासनाने मान्य करावी. अन्यथा ज्योतिषाचा ग्राहक संरक्षण कायद्यात समावेश करून ग्राहकांना दिलेला सल्ला चुकल्यास नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा करावा,” अशी मागणी अंनिसने या पत्रकामार्फत केली.

हेही वाचा : VIDEO: अंगावर घोंगडे टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा; अंनिसची ‘त्या’ भोंदूबाबावर कारवाईची मागणी

तत्कालीन एआयएफएफचे पदाधिकारी कुशल दास यांनी ज्योतिषाची मदत घेतली होती. त्यासाठी १२ ते १५ लाख रुपये खर्च केला गेला असे मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस मार्फत डॉ हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव यांनी ही मागणी केली.

Story img Loader