Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 Updates : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन महाविकासआघाडी सरकारने भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी हे आरोप झाल्याने याचे पडसाद अधिवेशनातही पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनासह राज्यातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर…

Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
indian constitution to
संविधानभान: एकलव्याच्या अंगठय़ाचे रक्षण
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
Maharashtra News : गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
Live Updates

Maharashtra Budget Session 2023-2024 Updates, 27 February 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेसनासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर...

22:36 (IST) 27 Feb 2023
"...म्हणून मी आज तुरुंगाबाहेर आहे", गिरीश महाजन यांचं वक्तव्य

गिरीश महाजन म्हणाले, "माझ्यावर आजही मोक्का लागलेला आहे. न्यायालयाने मला सवलत दिली आहे म्हणून मी तुरुंगाबाहेर आहे. तीन वर्षे १२ दिवसांपूर्वी एक घटना घडली आणि गिरीश महाजन यांनी तू माझ्या नादी लागू नको अशी कोणाला तरी धमकी दिल्याचा आरोप करून माझ्यावर मोक्का लावण्यात आला. मी सहा टर्म आमदार आहे, मागे मंत्री होतो. माझ्याविरोधात कोणाला शिवी दिल्याची किंवा चापट मारण्याची राज्यात एकही तक्रार दाखल नाही. असं असूनही माझ्यावर थेट मोक्का लावण्यात आला."

सविस्तर वाचा...

20:57 (IST) 27 Feb 2023
"आता सगळ्यांना पटायला लागलंय की, २०२४ ची निवडणूक कदाचित...", उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

निवडणुक आयोग बोगस! त्याला चुना लावणारा आयोग म्हणायला हवे. सगळं भाजपाच्या सोयीने सुरु आहे. आता सगळ्यांना पटायला लागलंय की, २०२४ ची निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक असेल. कपिल सिब्बल जे म्हणाले ते योग्य आहे. घटना स्पष्ट आणि स्वच्छ आहे. मध्येच निवडणुक आयोगाने चोमडेपणा करण्याची गरज नव्हती.

- उद्धव ठाकरे

20:43 (IST) 27 Feb 2023
दुसऱ्याचे आई-वडील चोरणाऱ्याला काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आई वडील जे संस्कार देतात ते झाले नाहीत, की मग दुसऱ्यांची गोष्ट चोरण्याची वेळ येते. त्यामुळे मी चोरांवर जास्त बोलणार नाही. त्यांना लाज-लज्जा नसेल, पण दिवारमध्ये जसा हातावर शिक्का होता, तसाच हे जेव्हा छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा त्यांच्या कपाळावर शिक्का असेल की, तू स्वतः चोर आहेस. हे चोरलेलं धनुष्यबाण आहे.

- उद्धव ठाकरे

20:38 (IST) 27 Feb 2023
"चोरीचा मामला, जोरजोरात बोंबला", उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल, म्हणाले...

चोरीचा मामला, जोरजोरात बोंबला, अशी शिंदे गटाची अवस्था; सर्वकाही चोराल, पण ठाकरे कसे चोराल, ठाकरे म्हणजे मी एकटा नाही, माझ्यासमोर असलेली जनता म्हणजे ठाकरे, काहीही चोरता येतं, पण संस्कार चोरता येत नाहीत, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

20:22 (IST) 27 Feb 2023
"...म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता", उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

मी आणीबाणीचा काळही पाहिला आहे. त्यावेळी देशात बेधुंदी माजेल की काय अशी परिस्थिती होती. म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. मात्र, याचा अर्थ नंतर आणीबाणीत जे झालं त्याला शिवसेनाप्रमुखांचा पाठिंबा होता असं नाही. आणीबाणीत मार्मिकवरही बंधनं होती. मार्मिक छापण्यासाठी बंदी नाही, मात्र मार्मिकच्या छापखान्यावर बंदी अशी विचित्र बंदी असायची. इतर कोणी छापून द्यायला तयार व्हायचे नाही.

- उद्धव ठाकरे

20:05 (IST) 27 Feb 2023
मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात निदर्शने

कोल्हापूर : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटके विरोधात सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी निदर्शने केली.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेचे पडसाद कोल्हापुरात सायंकाळी उमटले. छ. शिवाजी चौक येथे आपने निदर्शने केली.

सिसोदिया अटकेचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. खोट्या आरोपांमध्ये अडकवून तुरुंगामध्ये टाकण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केला. जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजीत कांबळे, सुरज सुर्वे, अमरजा पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिरोळ तालुक्यात निदर्शने

जयसिंगपूर मध्ये क्रांती चौकात मागणी पक्षाच्यावतीने याच प्रश्नावर आपने निदर्शने केली. केंद्रीय यंत्रणा व मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तालुका संघटक शंकर जाधव, आदम मुजावर, सुदर्शन कदम, जयंतीलाल पटेल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

18:32 (IST) 27 Feb 2023
"त्यांना वाटतं आयोगाप्रमाणे कोर्टही खिशात घेऊन फिरू शकतो, आता...", संजय राऊतांचा हल्लाबोल

व्हिप न बजावण्याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं नव्हतं, तर त्यांच्या वकिलांनी तसं आश्वासित केलं होतं. याचा अर्थ ते कोर्टाला जुमानत नाहीत. त्यांना वाटतं निवडणूक आयोगाप्रमाणे कोर्टही आम्ही खिशात घेऊन फिरू शकतो. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.

- संजय राऊत

18:14 (IST) 27 Feb 2023
गोंदिया जिल्ह्यातील आठ गावांची मध्यप्रदेशात विलीनीकरणाची मागणी

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, बनगाव, किडंगीपार, माल्ही, पदमपुर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा या आठ गावांनी मध्यप्रदेशात विलीनीकरणाची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा....

18:09 (IST) 27 Feb 2023
जातपंचायतीमुळे पीडितांच्या व्यथा आता आंतरराष्ट्रीय महिला आयोगात; नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

नाशिक – जातपंचायतीच्या सर्वच घटनांमध्ये महिलांवर अन्याय, अत्याचार झाल्याचे दिसून येत आहे. महिलांच्या इतर प्रश्नांसह जातपंचायतीकडून झालेल्या अन्यायाच्या व्यथा आता संयुक्त राष्ट्रसंघ पुरस्कृत आंतरराष्ट्रीय महिला आयोगात मांडल्या जाणार आहेत.

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 27 Feb 2023
पुणे : लोहगावमध्ये बोगस डॉक्टरला पकडले, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई

पुणे : महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे नोंदणी न करता होमिओपॅथी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोहगाव परिसरातील बाेगस डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी (२५ फेब्रुवारी) कारवाई केली. या प्रकरणी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 27 Feb 2023
ठाण्याच्या स्थावर मालमत्ता विभागातून महेश आहेर यांना हटवले

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याकडे असलेला स्थावर मालमत्ता विभागाचा पदभार पालिका प्रशासनाने काढून घेतला असून, हा पदभार लोकमान्य-सावकरनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

18:07 (IST) 27 Feb 2023
उच्चभ्रू भागातील महिलांशी अश्लील संभाषण; दिल्लीतून महिलेसह दोघे अटकेत

पुणे : शहरातील उच्चभ्रू भागातील महिलांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या दिल्लीतील एकासह महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा...

18:06 (IST) 27 Feb 2023
मातोश्री आणि खोके हे वेगळे आहे का? शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

ठाणे : तुम्ही काचेच्या घरात राहत असल्यामुळे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरताना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

सविस्तर वाचा...

17:53 (IST) 27 Feb 2023
तुम्हाला आणि देवेंद्र फडणवीसांना कोणत्या अधिकाऱ्याने संपवण्याचा प्रयत्न केला? गिरीश महाजन नाव घेत म्हणाले...

आमचं हे प्रकरण जनतेसमोर आहे. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही जेव्हा पेन ड्राईव्हच्या स्वरुपात हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांना सांगितलं तेव्हा ते संपूर्ण राज्याने पाहिलं. प्रविण चव्हाण हे 'स्पेशल पीपी' आहेत. मविआ सरकारच्या काळात त्यांच्याकडे सर्व महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या होत्या. त्यामागे कोणाचा काय हेतू होता हे मला माहिती नाही. परंतु, प्रविण चव्हाण यांच्यावर एक कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे सर्व पुरावे देण्यात आले आहेत.

- गिरीश महाजन (एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया)

16:10 (IST) 27 Feb 2023
“राज्यातील सरकार कसाबी प्रवृत्तीचं, या सरकारला लाज, लज्जा...”; हिरकणी कक्षातील दुरावस्थेवरून अमोल मिटकरी आक्रमक

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी जवळपास सर्वच आमदारांनी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यादेखील आपल्या लहान बाळाला घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या होत्या. मात्र, बाळाला ठेवण्यासाठी हिरकणी कक्षात सोयी-सुविधा नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांना अश्रूही अनावर झाले होते. दरम्यान, हिरकणी कक्षाच्या या दुरावस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

16:03 (IST) 27 Feb 2023
“उद्धव ठाकरेंना बंडाची कल्पना होती, त्यांनी महिनाभरापूर्वीच शिंदेंना बोलावून घेतले आणि…”, चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

गडचिरोली : एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याबद्दल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माहिती होती. म्हणूनच बंडखोरीच्या महिन्याभरापूर्वी उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना बोलावून घेतले व तुला मुख्यमंत्री व्हायचे आहे काय, अशी विचारणा केली होती.

हेही वाचा...

15:30 (IST) 27 Feb 2023
ठाण्यात पाणी पुरवठा पूर्ववत, पण टंचाई मात्र कायम; ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागातून पाणी टंचाईच्या तक्रारी

ठाणे : गेले चार दिवस सुरू असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करत पालिका प्रशासनाने शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला असला तरी, ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागातून पाणी टंचाईच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत.

सविस्तर वाचा...

15:05 (IST) 27 Feb 2023
राज्यपालांचं लांबलचक भाषण सुरू असताना भाजपा नेते आशिष शेलार झोपले होते - अमोल मिटकरी

काय ते राज्यपालांचं लांबलचक भाषण, त्यांचं भाषण सुरू असताना भाजपा नेते आशिष शेलार झोपले होते. इतकं लांबलचक आणि कंटाळवाणं राज्यपालांचं भाषण होतं. या भाषणात केवळ विकासाच्या गप्पा होत्या.

- अमोल मिटकर (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)

14:58 (IST) 27 Feb 2023
सिसोदियांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत आपचं आंदोलन, पोलिसांकडून कारवाई

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आपचं मुंबईत आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात, देशभरात ठिकठिकाणी आपचे कार्यकर्ते रस्त्यावर

14:58 (IST) 27 Feb 2023
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “यासंदर्भात लवकरच…”

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, यासंदर्भात बोलताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

सविस्तर वाचा -

14:36 (IST) 27 Feb 2023
“अमित शाह उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात,” चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “त्यांनी यासाठी..”

गडचिरोली : भाजपाला देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे. यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह स्वतः उपग्रहाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ नियंत्रित करत आहेत. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली असून त्यातीलच एकाने मला ही गोपनीय माहिती दिली, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

सविस्तर वाचा...

14:03 (IST) 27 Feb 2023
नवी मुंबई : नेरूळ येथून ५० हजार रुपयांची गावठी दारू जप्त

नेरूळ येथून ५० हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. एक महिला पाण्याच्या पाच लिटरच्या दोन बाटल्यांत गावठी दारू विकताना आढळून आली. तिला विचारणा केली असता तिने ही गुळाने बनवलेले गावठी दारू असल्याची कबुली दिली.

सविस्तर वाचा...

14:01 (IST) 27 Feb 2023
नीलगायींच्या उपद्रवाने ठाणे जिल्ह्यातील शेतकरी हैराण, भरपाई मिळत नसल्याने आंदोलनाचा इशारा

कल्याण – ऑक्टोबरपासून खरीप हंगामात लागवड केलेल्या हरभरा, भेंडी, वाल, गवार, वांगी, टोमॅटो, तूर अशी अनेक पिके नीलगायींचे कळप फस्त आणि नासाडी करत असल्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे.

सविस्तर वाचा...

13:21 (IST) 27 Feb 2023
"भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का?", देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले, "सगळ्यांना..."

महाराष्ट्राच्या २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी 'पॉईंट ऑफ प्रोसिजर'च्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकी देत असल्याचा आरोप केला. ते सोमवारी (२७ फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.

सविस्तर वाचा...

12:48 (IST) 27 Feb 2023
विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

शोकसभेनंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित, उद्या सकाळी ११ वाजल्यानंतर सभागृह सुरू होणार, विधानपरिषदेचंही कामकाज स्थगित, उद्या दुपारी १२ वाजेनंतर सभागृह सुरू होणार

12:36 (IST) 27 Feb 2023
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार - एकनाथ शिंदे

https://twitter.com/MahaDGIPR/status/1630101249562386433

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

12:33 (IST) 27 Feb 2023
भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? देवेंद्र फडणवीस आक्रमक

भास्कर जाधव यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही असा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. तसेच काय चाललं आहे असा प्रश्न विचारला.

यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. ते म्हणाले, "भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही. हे योग्य नाही. सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल."

12:14 (IST) 27 Feb 2023
भाजपा उमेदवार रासनेंनंतर मविआचे रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाती पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कारवाई सुरू केली आहे.

सविस्तर वाचा...

11:54 (IST) 27 Feb 2023
Maharashtra Budget Session 2023 : “अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही”, भास्कर जाधवांचं शिंदे गटावर टीकास्र; म्हणाले, “असे कित्येक…”

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते. मात्र, तरीही आज प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. विधिमंडळाच्या बाहेर पत्राकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा -

11:41 (IST) 27 Feb 2023
डिप्लोमा आणि इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून अभ्यास करण्याचा पर्याय - राज्यपाल

माझ्या सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार डिप्लोमा आणि इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून अभ्यास करण्याचा पर्याय दिला आहे. यासाठी मराठीतून अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

- रमेश बैस (राज्यपाल, महाराष्ट्र)

11:35 (IST) 27 Feb 2023
अधिवेशनासाठी राज्यपाल रमेश बैस यांना पोलीस पथकाकडून मानवंदना

https://twitter.com/MahaDGIPR/status/1630084516906778627

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राज्यपाल रमेश बैस यांचे विधानभवनात आगमन झाल्यावर पोलीस पथकाने त्यांना मानवंदना दिली.

11:22 (IST) 27 Feb 2023
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे आणि मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे आणि मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, धंगेकरांवर उपोषण करत आचार संहिता उल्लंघनाचा आरोप, तर रुपाली ठोंबरेंवर गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप, दरम्यान, भाजपाचे उमेदवार रासनेंवरही भाजपाचं निवडणूक चिन्ह कमळाचं उपरणं घालून मतदान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

11:14 (IST) 27 Feb 2023
शिंदे-फडणवीसांकडून विधिमंडळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन

विधिमंडळाच्या सन २०२३-२४ चं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन, यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री आदी मान्यवरही उपस्थित

11:10 (IST) 27 Feb 2023
फडणवीसांनी स्वतःच्या सरकारमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना राजकारणातून संपवलं - भास्कर जाधव

देवेंद्र फडणवीसांवर कोणाचाही विश्वास नाही. महाराष्ट्राचं अतिशय सुसंस्कृत, वैचारिक राजकारण देवेंद्र फडणवीसांना खराब केलं. फडणवीसांनी स्वतःच्या सरकारमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना राजकारणातून संपवलं. त्यांनी आपल्याच सरकारला पाठिंबा देणाऱ्यांचं फोन टॅपिंग केलं. त्यामुळे फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राची उच्च परंपरा डागाळली गेली, महाराष्ट्राची वैचारिक बैठक विस्कळीत झाली. त्यामुळे त्यांनी कितीही उसणं अवसान आणून वक्तव्ये केली, तरी महाराष्ट्र फडणवीसांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यांचा पक्षही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही.

- भास्कर जाधव (आमदार, ठाकरे गट)

11:05 (IST) 27 Feb 2023
"त्यांच्या व्हिपला भीक घालत नाही", भास्कर जाधव आक्रमक, फडणवीसांचं नाव घेत म्हणाले...

शिंदे गटाच्या व्हिपला भीक घालत नाही. मुख्यमंत्रीपद गेलं, ४० आमदार गेले, १३ खासदार गेले, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची सुरक्षा व्यवस्था काढली तरी आम्ही घाबरलो नाही. या व्हिपचं काय घेऊन बसला. असे अनेक व्हिप आम्ही बघितले, ते आले आणि गेले - भास्कर जाधव

10:48 (IST) 27 Feb 2023
विरोधी पक्षनेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1630073922304757760

विरोधी पक्षनेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला, अजित पवार, अंबादास दानवेंसह अनेक नेते उपस्थित, विधिमंडळात ठाकरे गटाला कार्यालय देण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने व्हिपबाबत दिलेल्या निर्देशांवरही चर्चा

10:44 (IST) 27 Feb 2023
शिवसेना नाव आणि चिन्ह मिळताच ठाण्यात शिंदेगटाकडून शाखा ताब्यात घेण्यास सुरुवात, लोकमान्यनगर शाखेच्या वादातून राडा

ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी रात्री शिंदे गटाने लोकमान्यनगर येथील शाखेतील उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र काढल्याचे कळते आहे.

सविस्तर वाचा...

10:43 (IST) 27 Feb 2023
ठाण्यातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ

ठाणे : ठाणे येथील कारागृहाजवळील तलावात सोमवारी सकाळी ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला असून त्याची अद्याप ओळख पटली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

सविस्तर वाचा...

10:43 (IST) 27 Feb 2023
“अजित पवारांनी चहापाण्याचा खर्च काढून चूक केली”, शिंदेंनीही उद्धव ठाकरेंच्या काळातला हिशेब मांडला; म्हणाले, “फेसबुकवर बसून…”

“वर्षा गेले अडीच वर्ष बंद होतं. सहा सात महिन्यांपासून लोक वर्षावर येत आहेत. वर्षावर आल्यानंतर लोकांना चहा-पाणी द्यायचं नाही का? आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालत नाही. पण चहापाणी देऊ शकत नाही का? आज अजित पवार यांनी चहापाण्याचा हिशेब काढला. मग आम्हाला सांगा तुम्ही ७० हजार कोटी सिंचनासाठी पाण्यात घातले. तरीही शून्य पॉईंट जमीन सिंचनाखाली आली नाही. हे मी म्हणत नाही, तर पृथ्वीराज चव्हाण आणि कॅगनेच म्हटले आहे. शेवटी त्याचाही हिशेब द्यावा लागेल. कुठे घसरता याचा विचार करा? सात महिन्यात महिन्याला चाळीस लाखांचा खर्च झाला. ज्यावेळी फेसबुक लाईव्ह सुरु होतं, तेव्हा वर्षा बंगल्याचा महिन्याचा खर्च तीस ते पस्तीस लाख होता. ही माहिती अजित पवारांनी घ्यायला हवी होती. आता तर प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहोत. याचे साक्षीदार माध्यमातील लोक आहेत, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली.

सविस्तर वाचा...

10:42 (IST) 27 Feb 2023
गणेश बिडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा, कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटपाच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेले भाजपचे दुसरे माजी नगरसेवक

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सविस्तर वाचा..

10:42 (IST) 27 Feb 2023
“राष्ट्रद्रोह्यांबरोबर चहा पिण्याची वेळ टळली”, म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून ( २७ फेब्रुवारी ) सुरुवात झाली. करोनानंतर पहिल्यांदाच सर्वाधिक काळ महिनाभर हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. चहापानाला गेलो असतो, तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर केली होती.

सविस्तर वाचा...

10:42 (IST) 27 Feb 2023
शिंदे गटानं शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना बजावला व्हीप; ठाकरे गट काय भूमिका घेणार?

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमुळे शिवसेनेचा व्हीप चर्चेचा विषय ठरला होता. एकीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे व्हीपचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना दुसरीकडे त्याच व्हीपच्या आधारावर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. मात्र, आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्हीपचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

Maharashtra-Budget-session-Live gif

महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३-२०२४ लाइव्ह