Maharashtra Political News, 03 March 2023: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका विधानावरून वाद निर्माण झालेला असताना त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव आणण्यात आला आहे. त्यावर अध्यक्षांनी सर्वपक्षीय समिती नेमली असून त्यातील सदस्यांवरूनही वाद चालू आहे. त्यात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उत्तराच्या रुपात पुन्हा एकदा राजकीय टोलेबाजी विधानसभेत होण्याची शक्यता आहे.

Accused arrested from Pune who killed a BJP official in Karnataka pune news
कर्नाटकातील भाजप पदाधिकाऱ्याचा खून; पुण्यातून आरोपी अटकेत
There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
sharad pawar discussions with congress leaders on five to six disputed seats in maha vikas aghadi
महाविकास आघाडीत अद्याप पाच-सहा जागांवर पेच; शरद पवार, काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा; जागांबाबतचा वाद मिटविण्याचा प्रयत्न
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Live Updates

Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 Live Day 5 Updates

17:15 (IST) 3 Mar 2023
काही लोक स्वत: हल्ले करून घेतात - संजय राऊत

कुणावर हल्ला झाला हे मला माहिती नाही, मी काही पाहिलं नाही. अलिकडे अनेकांना अशा धमक्या दिल्या जात आहेत, हल्ले होत आहेत. पण राज्याचे गृहमंत्री या हल्यांना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. अशा लहान-सहान किरकोळ गोष्टींमध्ये शिवसेना कधी पडत नाही. आता कुणाला सनसनाटी निर्माण करायची असेल, तर काही लोक स्वत: हल्ले करून घेतात अशी माझी माहिती आहे. होऊ शकतं असं. पण जर कुणावर मुंबईत हल्ला झाला असेल आणि तो राजकीय कार्यकर्ता असेल तर पोलिसांनी ती बाब गांभीर्यानं घ्यायला हवी. आमची नावं घेऊन काय होणार? - संजय राऊत

16:57 (IST) 3 Mar 2023
चंद्रकांत पाटील पुण्यातून आता निवडणूक लढवणार का? - संजय राऊत

मी कोणत्याही जाती-धर्मावर टीका-टिप्पणी करणार नाही. पण उद्या कोथरूडमधून चंद्रकांत पाटील निवडणूक लढणार आहेत का हे त्यांना विचारा. कारण पुण्याची हवा बदललीये. चंद्रकांत पाटील अपनी टोपी संभालो - संजय राऊत

16:47 (IST) 3 Mar 2023
...तर कसब्यात भाजपाचा उमेदवार जिंकला असता - संजय राऊत

कसबा भाजपाचा बालेकिल्ला राहिला. त्यांना वाटलं तो त्यांचाच बालेकिल्ला आहे. पण तुमचा विजय शिवसेनेच्या मदतीने होतो हे कालच्या निकालानं स्पष्ट झालं. त्या मतदारसंघात शिवसेनेचं मोठं योगदान आहे. ४०-५० हजार शिवसेनेची मतं भाजपाला पडत होती. ज्यांना चिन्ह आणि पक्ष दिलंय, त्या गटाकडे शिवसेनेची मतं असती, तर भाजपाचा तिथला उमेदवार जिंकला असता. - संजय राऊत

16:44 (IST) 3 Mar 2023
इतकी वर्षं सांगली आम्ही आंदण दिली होती, पण आता... - संजय राऊत

मी सांगलीत प्रवेश केला, तिथून इथपर्यंत लोक रस्त्यावर, सभागृहात, चौकात जे स्वागत मिळालं.. हे शिवसेनेचं स्वागत आहे. लोक वाट पाहात होते. हे उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. सांगलीत शिवसेनेचं महत्त्व असताना इतकी वर्षं आम्ही भाजपाला हा भाग जणू आंदण दिला होता. जे काल कसब्यात झालं, तेच २०२४ला सांगलीत आणि मिरजेत होईल. इथे शिवसेना लढेल. जनता आमच्याबरोबर आहे. सांगली-कोल्हापूरचे सर्व जातीधर्माचे लोक आमच्याबरोबर आहेत - संजय राऊत

16:21 (IST) 3 Mar 2023
ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच देवस्थान लुटले ! घाटंजीतील उंबरझरा संस्थानात विश्वतांकडूनच ४३ लाखांचा अपहार

यवतमाळ- घाटंजी तालुक्यातील उंबरझरा (झंझाळा) येथे प्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती संस्थान आहे. या संस्थानचे कामकाज पाहणाऱ्या महाराजांच्या वृद्धत्वाचा फायदा घेत मंदिराच्या विश्वतांनीच मंदिराची मालमत्ता लुटल्याचा प्रकार घडला आहे. सविस्तर वाचा…

16:20 (IST) 3 Mar 2023
खळबळजनक! देशात जानेवारी व फेब्रुवारीत एकूण ३४ वाघांचा मृत्यू

देशात जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात  तब्बल ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात ८ वाघांचा मृत्यू हा महाराष्ट्रात झाला असून ६ वाघ हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. वाघाचे वाढते मृत्यू चिंतानजक असल्याने यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे झाले आहे.

सविस्तर वाचा…

16:19 (IST) 3 Mar 2023
‘कॅशबॅक’च्या लाभपोटी पावणेदोन लाख गमावले

पुणे : ‘कॅशबॅक’च्या लाभापोटी एका युवकाने पावणेदोन लाख गमावले. पैसे तर मिळाले नाहीच, पण त्याच्या बँक खात्यातून एक लाख ८८ हजार रुपये सायबर चोरट्यांनी लंपास केले.

16:19 (IST) 3 Mar 2023
बीडीडीतील रहिवाशांना आता एकत्रित ११ महिन्यांचे घरभाडे देणार; म्हाडाचा प्रस्ताव सरकार दरबारी सादर

संक्रमण शिबिरांमध्ये पुरेसे निवासी गाळे उपलब्ध नसल्यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाने बीडीडी चाळींतील रहिवाशांना आता ११ महिन्यांचे घरभाडे एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव मंडळाने राज्य सरकारला पाठविला आहे. सविस्तर वाचा…

16:17 (IST) 3 Mar 2023
मुंबई : मालवाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत मोठी भर; फेब्रुवारीत ७० लाख टन मालाची वाहतूक

देशभरात मध्य रेल्वेची माल वाहतूक सेवा सुरू असून अनेक अत्यावश्यक वस्तूंची जलदगतीने वाहतूक करण्यात येते. या माल वाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत भर पडत आहे. एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेने ७३.१६ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. सविस्तर वाचा…

16:07 (IST) 3 Mar 2023
महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात Foxconn करणार मोठी गुंतवणूक; १ लाख नोकऱ्यांची होणार निर्मिती

Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. ही कंपनीचे मुख्य कार्यालय हे यूएसमध्ये आहे. Apple चा भारतातील प्राथमिक पुरवठादार फॉक्सकॉन भारतात गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या Foxconn (फॉक्सकॉन) तेलंगणा राज्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. Foxconn ने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेटअप उभारण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत करार केला आहे. वाचा सविस्तर बातमी

15:50 (IST) 3 Mar 2023
पुण्यात भरदिवसा मोबाइल हिसकावून चोरणारा कर्नाटकमधील चोरटा गजाआड; साथीदार फरार

पुणे : शहरातील विविध भागांत जबरदस्तीने मोबाइल हिसकावणाऱ्या कर्नाटकातील चोरट्याला वानवडी पोलिसानी अटक केली. शरद मंजुनाथ (वय २२, रा. शिमोगा, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. तर त्याचे साथीदार फरार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

सविस्तर वाचा...

14:51 (IST) 3 Mar 2023
बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली? दोन पाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

पुणे : राज्य मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत शुक्रवारी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात पसरल्याचे निदर्शनास आले. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार झाल्याची माहिती असून, या प्रकाराची राज्य मंडळाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

14:31 (IST) 3 Mar 2023
पुणे : वन कर्मचऱ्यांना मारहाण प्रकरणी दोघांना शिक्षा

पुणे : राखीव वनात दुचाकी घेऊन गेल्याने हटकले म्हणून वनरक्षकास शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या दोघांना न्यायालयाने तीन महिने कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी हा निकाल दिला.

सविस्तर वाचा...

14:13 (IST) 3 Mar 2023
खारकोपर लोकल दुर्घटनेच्या अहवालास विलंब; मुंबई विभागाऐवजी मुख्यालयातील अधिकारी दुर्घटनेची चौकशी करणार

मध्य रेल्वेच्या खारकोपर स्थानकानजीक २८ फेब्रुवारी रोजी लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले होते.  मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने युद्धपातळीवर लोकलचे तीन डबे रुळावर आणून तब्बल ११ तासांनी लोकल सेवा पूर्ववत केली. या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सविस्तर वाचा…

14:12 (IST) 3 Mar 2023
सूरजागड लोह खाणीतील वाढीव उत्खननाला अनेक अटींसह पर्यावरण विभागाची परवानगी

बहुचर्चित सूरजागड लोहखाणीतील वाढीव उत्खननाला केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अनेक अटींसह मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या या खाणीतून वर्षाकाठी ३० लाख टन इतक्या लोहखनिज उत्खननाला परवानगी होती. आता ती वाढून १ कोटी टन इतकी होणार आहे. सविस्तर वाचा…

14:11 (IST) 3 Mar 2023
गोंदिया : अल्पवयीन मुलीचे लग्न लागणारच होते त्याचवेळी…

गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा होत असल्याची माहिती कळताच दामिनी पथक, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा बाल सरंक्षण कक्ष आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी दाखल होत १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे होत असलेले लग्न थांबवले. सविस्तर वाचा…

14:10 (IST) 3 Mar 2023
जनतेच्या मनातील आमदार मीच म्हणणाऱ्या बंडखोर राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त!

बंडखोर राहुल कलाटे यांचे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले आहे. राहुल कलाटे यांनी निवडणुकीपूर्वी १ लाख १२ हजारांचे जणमत माझ्या पाठीशी आहे, मी जनतेच्या मनातील आमदार आहे. असा दावा करणाऱ्या राहुल कलाटेंना डिपॉझिटही राखता आले नाही.

सविस्तर वाचा...

14:10 (IST) 3 Mar 2023
नागपूर ‘टायगर कॅपिटल’ की ‘संत्रानगरी’? जी-२० च्या निमिततानै ब्रॅण्डिंगवरून पेच

नागपूरमध्ये  २१ आणि २२ मार्च दरम्यान जी-२०  देशांच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक होत असून यानिमित्ताने नागपूरचे  ‘ टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ असे  ब्रॅण्डिंग केले जात आहे. वास्तविक नागपूरची ओळख ही या परिसरात उत्पादित होत असलेल्या व चवीमुळे देशविदेशात प्रसिद्ध पावलेल्या  संत्र्यामुळे संत्रानगरी अशी आहे. सविस्तर वाचा…

14:10 (IST) 3 Mar 2023
ChatGPT मुळे माणसांच्या नोकऱ्या जाणार का? इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचं मोठं विधान; म्हणाले…

OpenAI च्या chatgpt या चॅटबॉटची प्रसिद्धी जगभर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वत्र टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये AI चॅटबॉटची चर्चा सुरु आहे. याला प्रत्येकजण टेक्नॉलॉजी क्षेत्रातले भविष्य समजत आहे. पण हा चॅटबॉट नोकरी करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका असल्याचे अनेकांचे मत आहे. दरम्यान Infosys चे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी AI आणि ChatGPT च्या भवितव्याबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत. वाचा सविस्तर बातमी

13:51 (IST) 3 Mar 2023
महापालिका निवडणुकीत चिंचवडमध्ये भाजपसमोर आव्हान

मतदारसंघाच्या निमिर्तीपासून पहिल्यांदाच ‘घड्याळ’ चिन्हावर लाखभर मते मिळाल्याने राष्ट्रवादीचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारी आगामी महापालिका निवडणूक जिंकणे सोपे राहणार नाही.

सविस्तर वाचा...

13:20 (IST) 3 Mar 2023
रवींद्र धंगेकरांनी भाजपा खासदार गिरीश बापट यांची घेतली भेट

धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर त्यांनी मागील अनेक महिन्यांपासून आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

सविस्तर वाचा...

13:16 (IST) 3 Mar 2023
Maharashtra Budget Session 2023: अजित पवारांच्या प्रश्नावर विखे पाटलांचं उत्तर...

विरोधी पक्षनेत्यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केलाय. काही विशिष्ट भागात एक रॅकेट सर्रासपणे चालू आहे. राज्यसरकारनं कॉपीमुक्त अभियान या परीक्षेच्या निमित्ताने सुरू केलं होतं. तरी हे प्रकरण गंभीर आहे. तात्काळ त्या विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशीच्या सूचना देऊ. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत यावर निवेदन सादर करण्याची कार्यवाही करू. - विखे पाटील

13:15 (IST) 3 Mar 2023
नागपूरकरांची मते जिंकण्यासाठी भाजप काय जादू करणार ?

“मीच अर्थमंत्री आहे, त्यामुळे नागपूरच्या विकासाला निधी कमी पडणार नाही” असे पालकमंत्री म्हणून नागपूरकरांना आश्वस्त करणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्रीही आहेत. त्यामुळे ते सादर करणार असलेल्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात नागपूर-विदर्भासाठी काय घोषणा करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा....

13:14 (IST) 3 Mar 2023
बालेकिल्ल्यांमध्येच भाजपला पराभवांचे धक्के

गेल्या दोन ते तीन वर्षांत भाजपला बालेकिल्ल्यांमध्येच पराभवाचे धक्के सहन करावे लागले आहेत. नव्याने कसबा पेठ मतदारसंघाचा समावेश त्यात झाला आहे.

सविस्तर वाचा...

13:14 (IST) 3 Mar 2023
Maharashtra Budget Session 2023: बारावीचा गणिताचा पेपर फुटला, अजित पवार भडकले

उदय सामंत वगैरे सगळे सभागृहात आहेत. आत्ता सिंदखेडराजा परिसरात बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता फुटला. तो सगळीकडे प्रसिद्ध झालाय. ते रॅकेट आहे की काय आहे? अभ्यास करणाऱ्या मुलांचं किती वाटोळं आहे. सरकार काय करतंय मला काही कळत नाही. सरकार झोपलंय की काय? मग पुन्हा तुम्हा म्हणता दादा बोलतात, दादा बोलतात. हे बारावीच्या मुलांचं नुकसान आहे. मध्येही एका पेपरचं तसंच झालं - अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

13:10 (IST) 3 Mar 2023
नवी मुंबई महापालिकेच्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीसाठी १.६५ कोटी खर्चाच्या रस्त्याच्या पायघड्या? गरज नसताना निविदांचा घाट

नवी मुंबई – जगभरात निर्माण झालेल्या करोनाच्या स्थितीनंतर, तसेच नवी मुंबई महापालिकेत पालिका आयुक्तांचा प्रशासकाचा कारभार सुरू झाल्यापासून अनावश्यक कामे तात्काळ वेगाने काढण्याचा सपाटाच पालिका प्रशासनाच्यावतीने लावला जात असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.

सविस्तर वाचा...

13:07 (IST) 3 Mar 2023
कसब्याच्या निकालाने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार

कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर या निकालाने पुण्यातील पक्षीय राजकारणामध्ये आगामी काळात उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपमधील अंतर्गत धूसफूस यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्याने भविष्यातील महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार आहेत. सविस्तर वाचा

13:06 (IST) 3 Mar 2023
कल्याणमध्ये धावत्या लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा प्रवाशाच्या मारहाणीत मृत्यू

कल्याण-कल्याण ते टिटवाला रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गुरुवारी दुपारी एका प्रवाशाने धावत्या लोकलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला माल वाहतूक डब्यात बेदम मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. सविस्तर वाचा

12:49 (IST) 3 Mar 2023
Maharashtra Budget Session 2023: हक्कभंग समितीच्या बैठकीला सुरुवात

संजय राऊतांविरोधात हक्कभंग ठराव विधानसभेत आल्यानंतर आता त्यावर हक्कभंग समितीची स्थापना करण्यात आली आहे. या हक्कभंग समितीची बैठक सुरू झाली आहे.

12:24 (IST) 3 Mar 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या राजुल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल

कल्याण- येथील शिवगर्जना मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अर्वाच्च भाषेत शेरेबाजी करत त्यांना अर्वाच्च भाषेत भाषणातून शिवीगाळ करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला मुंबई संघटक राजुल पटेल यांच्या विरुध्द शिंदे गटाच्या समर्थक छाया वाघमारे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार केली आहे. सविस्तर वाचा…

12:16 (IST) 3 Mar 2023
Elon Musk यांची दोन दिवसांतच श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर घसरण

एलॉन मस्क हे टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख आहेत. एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मध्यंतरी त्यांच्या या स्थानामध्ये घसरण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. मात्र एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत असण्याचा मान गमावला आहे. वाचा सविस्तर बातमी

12:15 (IST) 3 Mar 2023
Vodafone-Idea Recharge Plan: वोडाफोन-आयडियाने लॉन्च केला ३० दिवसांचा प्रीपेड प्लॅन, २५ जीबी डेटा आणि…

Vodafone Idea Mobile Recharge Plan: देशात सध्या Reliance jio , Airtel आणि Vodafone-Idea या आघाडीच्या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. VI कंपनी जिओ आणि एअरटेल प्रमाणे देशामध्ये ५ जी सर्व्हिस देत नाही. मात्र व्हीआय कंपनी आपल्या प्रीपेड सेगमेंटमध्ये काही बदल करत आहे. जिओ आणि एअरटेलच्या मानाने Vi चे वापरकर्त्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात नाही आहे. त्यामुळे वोडाफोन-आयडियाची आपल्या ग्राहकांची संख्या वाढावी म्हणून ३० दिवस वैधता असणारा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. वाचा सविस्तर बातमी

12:14 (IST) 3 Mar 2023
नव्या अवतारामध्ये लॉन्च झाली देशातील सर्वात सुरक्षित SUV, २५ हजार रुपयांमध्ये मिळणार ‘हे’ जबरदस्त फिचर

भारतामध्ये फोर व्हिलर खरेदी करण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. तसेच मध्यम आकाराच्या SUV कारची देशभरात मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कंपन्या नवनवीन फिचर आणि टेक्नॉलॉजी असलेल्या आपल्या एसयूव्ही आणि इतर मॉडेलचे लॉन्चिंग भारतीय बाजारपेठेमध्ये करत आहेत. आता जर्मन कार निर्माता कंपनी Volkswagen ने त्यांची एक एसयूव्ही अपडेट केली आहे. तर या एसयूव्हीला अपडेट केल्याने कोणकोणते नवीन फीचर्स आणि फायदे मिळणार आहेत हे जाणून घेऊयात. वाचा सविस्तर बातमी

12:14 (IST) 3 Mar 2023
वाघांचे कृत्रिम स्थलांतरण लवकरच; महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

नागपूर : येत्या दहा दिवसांत वाघाच्या कृत्रिम स्थलांतरणाचा प्रकल्प मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातून पाच वाघांचे स्थलांतरण करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात दोन वाघ स्थलांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून, तयारी अंतिम टप्प्यात आहे.

सविस्तर वाचा..

12:13 (IST) 3 Mar 2023
Toyota Innova HyCross Price Hike: लोकप्रिय इनोव्हा हायक्रॉसच्या किंमतीत वाढ

Toyota Price Hike: भारतात फोर व्हिलर खरेदी करण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. अनेक वाहन कंपन्या आपले नवीन मॉडेल्स अनेक नवीन फीचर्ससह आणि टेक्नॉलॉजीसह लॉन्च करत असतात. Toyota या कंपनीने काही दिवसांपूर्वी नवीन MPV Innova HyCross भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती. वाचा सविस्तर बातमी

11:59 (IST) 3 Mar 2023
Maharashtra Budget Session 2023: विरोधकांचा सभात्याग!

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर विधानसभेत गोंधळ, विरोधकांनी केला सभात्याग

11:49 (IST) 3 Mar 2023
मुंबईत एअरटेल ‘५ जी’ ग्राहक संख्या १० लाखांवर

खासगी क्षेत्रातील अग्रणी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने मुंबईत नवीन युगाच्या ‘५ जी’ सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकसंख्येने दहा लाखांचा टप्पा ओलंडला आहे. सध्या कंपनीने ठरावीक शहरांमध्ये ‘५ जी’सेवेला सुरुवात केली आहे . सविस्तर वाचा…

11:48 (IST) 3 Mar 2023
पुलांखाली वाहनतळाची सुविधा उपलब्ध करा; उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह MMRDA मधील महापालिकांना नोटीस

वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा म्हणून मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) पुलांखाली आवश्यक त्या सुरक्षा नियमांचे पालन करून वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे गुरूवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 3 Mar 2023
वर्धा : घुबड अपशकुनी? ते तर आमच्यासाठी…

एकीकडे अपशकुनी म्हणून तिरस्कार केल्या जाणाऱ्या घुबडाला लक्ष्मीचे वाहन म्हणून पूजल्याही जाते. मात्र, पशुप्रेमींना अशा गोष्टींचे सोयरसुतक नसतेच. निसर्गाची संपदा म्हणून ते या मुक्या प्राण्यांचा सांभाळ करतात. सविस्तर वाचा…

11:45 (IST) 3 Mar 2023
Kasba Bypoll Election: आता माझी पाळी आली, मी सगळ्यांना व्यवस्थित करतो - धंगेकर

माफ करणं हा माझा धंदा आहे. राजकारणात कायम मैत्री पाळायला लागते. आज माझी पाळी आली आहे. ज्यांनी ज्यांनी गैरप्रकार केले त्यांना व्यवस्थित करतो. १०० टक्के गुडघे टेकायला लावतो - रवींद्र धंगेकर, मविआचे विजयी उमेदवार

11:45 (IST) 3 Mar 2023
एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ

एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी - अलेंगा मार्गावरील दामिया नाल्याजवळ नक्षलवाद्यांकडून बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात देखील रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 3 Mar 2023
Kasba Bypoll Election: अत्यंत किळसवाणा प्रकार झाला - धंगेकर

कुरघोडीचं राजकारण, पोलीस यंत्रणा, निवडणूक यंत्रणा, गुंडांच्या मार्फत केलेला प्रचार किळसवाणा होता. मीही गिरीश बापटांविरोधात निवडणूक लढवली आहे. पण त्यांनी कधी असं केलं नाही. यावेळी जिवाशी खेळण्यापर्यंत ही निवडणूक गेली. पोलिसांकडून दमदाटी करणं, गुंडांमार्फत धमकी देणं असे प्रकार झाले - धंगेकर

11:44 (IST) 3 Mar 2023
Kasba Bypoll Election: पैसा हरला, कार्यकर्ता जिंकला - धंगेकर

मी ज्या दिवशी फॉर्म भरला, त्याच दिवशी सांगितलं की माझा विजय नक्की आहे. करोडोंचा पाऊस पडल्यानंतरही जनतेनं ते पैसे स्वीकारले नाहीत. शेवटी पैसा हरला आणि कार्यकर्ता जिंकला. जनशक्ती जिंकली आणि धनशक्ती हरली. माझ्या अनेक निवडणुका धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा झाल्यात - रवींद्र धंगेकर

11:44 (IST) 3 Mar 2023
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्चला लाईनमन दिवस ; देशभरात सर्वत्र साजरा होणार

देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मार्च रोजी महावितरणमध्ये सर्वत्र लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे चंद्रपूर परिमंडळात आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

11:43 (IST) 3 Mar 2023
विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येऊ नये म्हणून मुस्लीम बांधवांकडून मशिदीवरील ध्वनिक्षेपक बंद

सध्या राज्यभरात बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. याकालावधीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण उद्भवू नये यासाठी मुस्लीम बांधवांनी  समाजभान जपत मशिदीवरील ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सविस्तर वाचा…

11:42 (IST) 3 Mar 2023
तापमानात चढउताराचा आरोग्याला फटका ; सहा ते सात मार्चदरम्यान पावसाचा इशारा

तापमानातील चढउतार आणि हवामानातील अचानक होणारा बदल यामुळे उपराजधानीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळा तापत आहे असे वाटत असतानाच हवामान खात्याने पावसाचाही इशारा दिला आहे. सविस्तर वाचा…

11:42 (IST) 3 Mar 2023
Sandeep Deshpande : या हल्ल्यामागे कोण आहे? मनसे नेते संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "यामध्ये..."

Sandeep Deshpande Attack : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला आले असताना हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांना अज्ञात आरोपींनी स्टम्पच्या साहाय्याने मारहाण केली. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना आरामासाठी घरी सोडण्यात आलं. यावेळी त्यांनी या हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा...

11:41 (IST) 3 Mar 2023
प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपा-शिंदे गटाचा कसब्यात पराभव, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "कार्यकर्त्यांनी..."

पुण्यातील बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाने प्रतिष्ठा पणाला लावूनही अखेर पराभवाचा सामना केला. महविकासआघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला. महाविकासआघाडीने भाजपाच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.

सविस्तर वाचा...

11:41 (IST) 3 Mar 2023
नागपूर : मारहाण करून प्रेयसीवर बलात्कार

नोकरी लागल्याचे सांगून घरून निघून गेलेल्या प्रेयसीला प्रियकराने मारहाण करून बलात्कार केला. तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली. सविस्तर वाचा…

11:40 (IST) 3 Mar 2023
विश्लेषण : विधिमंडळ हक्कभंग म्हणजे काय? त्याबद्दल कोणत्या शिक्षेची तरतूद आहे?

शिवसेना (उद्धव बा‌ळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध सत्ताधारी पक्ष सदस्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर विचार करण्यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय विधानसभा हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. हक्कभंग म्हणजे काय, भंग करणाऱ्यास कोणती शिक्षा होऊ शकते, याविषयी ऊहापोह.

सविस्तर वाचा...

Maharashtra Live GIF

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 Live Day 5 Updates