Maharashtra Vidhan Sabha Election विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लवकरच महाराष्ट्रात प्रचारासाठी सक्रिय होणार आहेत. तसेच प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारकही जोरदारपणे प्रचाराच्या कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या बंडखोरांना शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकजण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाने ४० बंडखोरांवर कारवाई केली असून त्यांची हकालपट्टी केली आहे. प्रचारामध्ये कोणते नवीन मुद्दे येणार? ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविली जाणार की राजकारणाच्या मुद्द्यावर? हे या प्रचारातून दिसेल.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 06 November 2024 | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या

17:37 (IST) 6 Nov 2024
Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : जळगावमध्ये बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव; माजी खासदारास अभय

विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने जिल्ह्यात स्वपक्षाविरोधात बंड पुकारणाऱ्यांविरोधात भाजपने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु, अशा कारवाईत सर्व बंडखोरांना समान न्याय देण्याऐवजी माजी खासदारासह काही जणांना मोकळीक देण्यात आल्याने कारवाईवरून संशय बळावला आहे. सविस्तर वाचा

17:37 (IST) 6 Nov 2024
Constituencies In Yavatmal District : यवतमाळ जिल्ह्यात जातीय समीकरणेच ठरणार निर्णायक

जिल्ह्यात पारंपरिक प्रचारापलिकडे सर्वच उमेदवारांनी मतदारसंघातील जातीय समीकरणांवर जोर दिला आहे. कुणबी, आदिवासी, बंजारा, बौद्ध आणि ओबीसी समाजाची मते सर्वाधिक असलेल्या या जिल्ह्यात जातीय धृवीकरण कसे होते, यावर निवडणुकीतील यशापयश अवलंबून आहे. सविस्तर वाचा

16:32 (IST) 6 Nov 2024
'मनसेवर बोलणार नाही, आम्ही मर्यादा पाळतो', आदित्य ठाकरेंचा टोमणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी होती, असे विधान केले होते. त्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी मनसेवर बोलणार नाही. आम्ही आमची मर्यादा पाळतो. मुळात मनसेची नेमकी भूमिका काय? हेच कळायला मार्ग नाही. त्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला आहे. पण महायुतीने त्यांना जागा सोडलेल्या नाहीत. महाराष्ट्रातून उद्योग गेलेले आहेत, त्याला मनसेचा पाठिंबा आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी प्रश्न विचारला.

16:15 (IST) 6 Nov 2024

राहुल गांधी हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विरोधी…

नागपूर : राहुल गांधी स्वतःच बोलले की या देशात आरक्षणाची गरज नाही. बाबासाहेबांचा संविधान ८० वेळा बदलण्याचे काम काँग्रेसने केला आहे.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 6 Nov 2024
चंद्रपूर : बंडखोर पाझारे, अली, वारजूकर, गायकवाड यांची भाजपातून हकालपट्टी

चंद्रपूर : माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली, वसंत वारजूकर व राजू गायकवाड या चौघांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या चौघांचेही सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आहे.

सविस्तर वाचा...

15:20 (IST) 6 Nov 2024
अमरावती : काँग्रेससमोर लोकसभा निवडणुकीतील मताधिक्‍य टिकविण्‍याचे आव्‍हान

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून लोकसभा निवडणुकीत मिळालेल्‍या यशामुळे काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साह असला, तरी चार मतदारसंघांमध्‍ये मिळालेले मताधिक्‍य टिकवून ठेवण्‍याचे आव्‍हान काँग्रेससमोर आहे. सविस्तर वाचा…

15:19 (IST) 6 Nov 2024
Deoli Assembly Constituency : देवळीच्या जागेबाबत भाजप अधिक दक्ष

विधानसभा निवडणुकीत काही जागा विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. साम, दाम, दंड, भेद असे अस्त्र सरसकट वापरणारे नेते, उमेदवार दिसून येत असल्याचे चित्र नवे नाही. जिल्ह्यात चारही जागा निवडून आणण्याचा संकल्प भाजप नेत्यांनी २०१४ मध्येच सोडला. पण तो पूर्ण झाला नाही.  सविस्तर वाचा…

15:19 (IST) 6 Nov 2024
अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार

विधानसभेच्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये तुलबळ लढती होत आहे. अकोला पूर्व, मूर्तिजापूर, अकोट व बाळापूर मतदारसंघात तिरंगी सामने होतील. अकोला पश्चिममध्ये भाजपपुढे बंडखोरांनी मोठे आव्हान निर्माण केले. सविस्तर वाचा…

14:45 (IST) 6 Nov 2024
राहुल गांधी म्हणाले संविधान नसते तर, निवडणूक आयोग नसते …

नागपूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये झालेले संविधान सन्मान संमेलन सर्वार्थाने गाजले. यात राहुल गांधी यांनी दिलेले भाषण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू शकते.

सविस्तर वाचा...

14:31 (IST) 6 Nov 2024
उमेदवारी मागे घेण्यासाठी अपक्ष उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी पत्र देवून ….

भंडारा : निवडणूक जिंकण्यासाठी काही अती महत्वाकांशी उमेदवारांनी आता साम, दाम, दंड, भेद वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अन्य उमेदवारांना निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची धमकी सुध्दा दिली जात आहे.

सविस्तर वाचा...

14:21 (IST) 6 Nov 2024
Maharashtra News Live: 'मी आमदार झाल्यावर सर्व पोरांची लग्न लावणार', शरद पवारांच्या उमेदवाराचे अजब आश्वासन

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. अजित पवारांच्या पक्षाकडून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे मैदानात आहेत, तर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून राजासाहेब देशमुख मैदानात उतरले आहेत. "एका प्रचार सभेत बोलत असताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की, मी आमदार झालो तर सर्व पोरांची लग्न लावून देऊ, सर्व मुलांनाकमधंदा मिळवून देऊ",

14:06 (IST) 6 Nov 2024
राहूल गांधींचे नागपुरात जल्लोषात स्वागत, दीक्षाभूमीला अभिवादन, निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा संविधान विषय

नागपूर : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने बुधवारी नागपुरात आले.

सविस्तर वाचा...

14:03 (IST) 6 Nov 2024
कारवाईची कुऱ्हाड, अमरावती जिल्ह्यातील बंडखोर उमेदवारांची भाजपातून हकालपट्टी

पक्षशिस्‍त मोडल्‍याचा ठपका ठेवून जिल्‍ह्यातील भाजपच्‍या तीन बंडखोर उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्‍यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कारवाई केली आहे. सविस्तर वाचा…

14:02 (IST) 6 Nov 2024
Chhatrapati Sambhajinagar Assembly Constituency: जरांगे यांच्या ‘मराठा- मुस्लिम व दलित’ मतपेढीसाठी ओवेसी यांची सहमती

Muslim Dalit and Maratha Vote in Chhatrapati Sambhaji Nagar प्रक्षोभक भाषणामुळे दहा वर्षापूर्वीपासून प्रसिद्धी झोतात असणाऱ्या अकबरोद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये ‘ मुस्लिम- दलित आणि मराठा’ ही मतपेढी पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सांगत प्रतिमा मवाळ करण्याचा प्रयत्न औरंगाबाद येथील सभेतून केला. सविस्तर वाचा…

14:01 (IST) 6 Nov 2024
Sangli Vidhan Sabha Election 2024 : सागंलीत दादा घराणे पुन्हा ताकद दाखविणार ?

Sangli Assembly Election 2024 संपूर्ण देशात एकमेव अपक्ष निवडून आलेले सांगलीचे खासदार नेमके कुणाचे असा प्रश्‍न सध्या अख्ख्या मतदार संघाला पडला आहे. काँग्रेसकडून वसंतदादा घराण्याची सातत्याने फसवणूक होत असल्याचा आरोप करत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा तथा वसंतदादा पाटील यांच्या नात सून जयश्री पाटील यांच्या बंडखोरीला पाठबळ देण्याचे त्यांनी जाहीर केले. सविस्तर वाचा…

14:00 (IST) 6 Nov 2024
‘लाडक्या भावा’साठी खासदार बहिणीची राजकीय प्रतिष्ठा पणाला; वरोऱ्यात चुरशीची लढत

वरोरा विधानसभा मतदारसंघात धनोजे कुणबी समाजाचे पाच उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजन अटळ मानले जात आहे. काँग्रेस उमेदवार ‘लाडके भाऊ’ प्रवीण काकडे यांच्यासाठी खासदार बहीण प्रतिभा धानोरकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे,

सविस्तर वाचा…

13:57 (IST) 6 Nov 2024
काँग्रेससमोर लोकसभा निवडणुकीतील मताधिक्‍य टिकविण्‍याचे आव्‍हान

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून लोकसभा निवडणुकीत मिळालेल्‍या यशामुळे काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साह असला, तरी चार मतदारसंघांमध्‍ये मिळालेले मताधिक्‍य टिकवून ठेवण्‍याचे आव्‍हान काँग्रेससमोर आहे. सविस्तर वाचा…

13:43 (IST) 6 Nov 2024
रॅप गीताने मनसेच्या योगेश चिलेंचा प्रचार

पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार योगेश चिले यांचा प्रचार करण्यासाठी रॅप गाणे तयार केले असून या गीतामध्ये भाऊ विरुद्ध शेठ असा निवडणुकीतील राजकीय संघर्ष दाखविला आहे. पहिल्यांदा उमेदवाराचा या पद्धतीचा रॅप गीतावर आधुनिक प्रचार होताना दिसत आहे.

13:43 (IST) 6 Nov 2024
पनवेलमध्ये नऊ हजार मतदारवाढ

पनवेल : राज्यातील दुसºया क्रमांकाचा सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतदार संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २३ ऑक्टोबरला या मतदारसंघात ६ लाख ४२ हजार ४४० मतदार नोंदविले गेले होते. मात्र सोमवारी या मतदारसंघात ६ लाख ५२ हजार ६२ मतदार संख्या असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. राज्यातील झपाट्याने वाढणारा मतदारसंघ म्हणून पनवेलकडे पाहिले जात आहे.

13:39 (IST) 6 Nov 2024
ठाणे जिल्ह्याच्या निवडणुक रिंगणात जुनेच चेहरे

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये २०१४, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुक लढविलेल्या जुन्याच चेहऱ्यांना राजकीय पक्षांनी पुन्हा संधी दिल्याचे दिसून येते. यामुळे पाच वर्षांपुर्वीप्रमाणेच मतदार संघांमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती होणार असल्याचे बोलले जात आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात उमेदवार जुनेच, लढत मात्र नवीन असे चित्र आहे.

वाचा सविस्तर...

13:38 (IST) 6 Nov 2024
काँग्रेसचा उमेदवार असतानाही बाळ्या मामा समाजवादीच्या व्यासपीठावर

ठाणे : भिवंडी पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे दयानंत चोरघे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. असे असतानाही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज आझमी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे याठिकाणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार आहे.

वाचा सविस्तर...

12:54 (IST) 6 Nov 2024
Maharashtra News Live: "हिंदू विरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय...", खा. नारायण राणे यांचा एमआयएमच्या उमेदवाराला इशारा

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे खासदार नारायण राणे यांनी एक्सवरील पोस्ट द्वारे एमआयएमचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासीर सिद्दिकी यांना इशारा दिला आहे. नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी जाहीर भाषणातून नासीर सद्दिकी यांनी जाहीर भाषणातून दिली होती, या धमकीला प्रत्युत्तर देत असताना नारायण राणे यांनी एमआयएमला इशारा दिला.

https://twitter.com/MeNarayanRane/status/1854054249279455298

12:40 (IST) 6 Nov 2024
संघभूमी नागपुरात राहुल गांधींचे संविधान सन्मान संमेलन, राजकीय वर्तुळाचे लक्ष

नागपूर : संघभूमी नागपूरमध्ये बुधवारी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन होत आहे.

सविस्तर वाचा...

12:02 (IST) 6 Nov 2024
"शरद पवार राजकारणातले भीष्म पितामह, त्यांनी निवृत्ती...", संजय राऊतांचे आवाहन

विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "शरद पवार संसदीय राजकारणातले महामेरू आहेत. ६० वर्षांपासून जास्त काळ ते संसदीय राजकारणात आहते. विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा अशा सर्व संसदीय सभागृहात ते काम करत आहेत. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अशा विविध पदावर त्यांनी काम केले. त्यांच्या इतका अनुभव असलेला नेता देशाच्या राजकारणात नाही. गेल्या काही काळापासून त्यांच्या मनात निवृत्तीचे विचार आहेत. आम्ही त्यांची समजूत घालत आहोत. काल शरद पवार यांनी पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पण त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नव्या पिढीला मिळत राहिला पाहिजे. "

11:52 (IST) 6 Nov 2024
जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ, २० दिवसांत ७३ हजार मतदारांची भर

ठाणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मागील २० दिवसांत जिल्ह्यात ७३ हजार ६११ मतदारांची नवीन नोंद झाली आहे. तर लोकसभा निवडणूकीपासून आतापर्यंत ४ लाख २८ हजार ९५ मतदारांची वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा...

11:36 (IST) 6 Nov 2024
मालेगाव बाह्य, बागलाण, इगतपुरीत दोन मतदान यंत्रांची गरज

नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात एकूण १९६ उमेदवार रिंगणात असून मालेगाव बाह्य, बागलाण आणि इगतपुरी मतदारसंघात प्रत्येकी १७ उमेदवार रिंगणात असल्याने या ठिकाणी दोन मतदान यंत्रे लागणार आहेत.

सविस्तर वाचा...

11:26 (IST) 6 Nov 2024
‘पूर्व’ आणि ‘पश्चिम’ पुण्याचा वाद जुनाच

पुण्यात काही वाद हे पूर्वीपासून चालत आले आहेत. त्यांपैकी ‘पूर्व पुणे’ आणि ‘पश्चिम पुणे’ हा वाद तर अगदी जुनाच. पश्चिम पुण्याचे पुढारी पूर्व पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने कोणतीही नवीन योजना आली, की पहिल्यांदा ती पश्चिमेकडे राबवली जाते. सविस्तर वाचा…

11:26 (IST) 6 Nov 2024
पुण्यात या दिवशी होणार ‘राज गर्जना ‘

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे)  अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पुणे दौऱ्यामध्ये ठाकरे यांच्या पुण्यात सभा होणार आहेत. सविस्तर वाचा

11:25 (IST) 6 Nov 2024
प्रकाश आंबेडकर यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका, म्हणाले, निवडणुकीतून..!

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन घरंदाज मराठ्यांच्या दबावातून रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. सविस्तर वाचा…

11:24 (IST) 6 Nov 2024
काँग्रेसला बंडखोरी रोखता आली नाही ही शोकांकिका कोणी केली ही टीका !

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आपला प्रचार सुरू केला आहे. राजकीय पक्षांचे नेते राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा…

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. (फोटो - लोकसत्ता टीम)

Story img Loader