Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अगदी १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात प्रचारसभांची रणधुमाळी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी ओवैसींना इशारा देत छत्रपती संभाजी नगर हेच नाव राहिल असं ठणकावून सांगितलं आहे. आजही घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Maharashtra News Live Today, 10 November 2024 | महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होणार, यासह महत्त्वाच्या घडामोडी
आदिवासीबहुल मेळघाट विधानसभा मतदारसंघात यावेळी दोन माजी आमदारपुत्रांची लढाई गाजत आहे. त्यातच काँग्रेसने नवीन उमेदवारावर डाव खेळला आहे.
जिल्हा निवडणूक शाखेच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २५ हजार ७४ अपंग मतदार आहेत तर ८५ वर्षावरील मतदारांची संख्या ६० हजार ५४६ इतकी आहे.
माझे म्हणणे आहे की गेल्या दहा वर्षात जर लोक सुरक्षित नसतील तर मोदींचे अपयश असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले.
भिवंडी पश्चिम मतदारसंघातून एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित केली होती.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्यावरही टीका केली.
ओवेसी आपल्या भाषणात पूर्वी शिवसेनेवर आगपाखड करायचे. पण आता त्यांचा जोरही भाजप नेत्यांवर असतो.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराइतांकडून चार पिस्तुले, तसेच काडतुसे जप्त केली.
ऐन निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये असंतोषाची दरी निर्माण झाली. वाशीम जिल्ह्यात दिग्गजांच्या बंडखोरीमुळे महायुतीत कुरबुरी वाढल्या आहेत.
डॉ. कदम म्हणाले, बंडखोरीमुळे विशाल पाटील यांची कोंडी झाली आहे. जे घडायला नको होते ते सांगलीत घडले.
हरियाणामधील आमदार गया लाल यांनी तर एका दिवसात तीन पक्ष बदलले होते. १९६७ मध्ये हा प्रकार झाला होता.
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी आंबेडकर सोलापुरात आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार आणि दाऊद यांच्या कथित भेटीचा संदर्भ देऊन सनसनाटी आरोप केला.
काँग्रेसच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यात हिंदुत्ववादी विचारसरणी रुजविण्यात आणि भाजपचे ‘कमळ’ फुलविण्यात दिवं. पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचा महत्त्वाचा वाटा राहिला.
ऊस उत्पादकांना दिवाळीला पैसे देऊ शकत नाही अशा नेतृत्वाला मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहण्याचा काय अधिकार, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता उपस्थित केला.
Ashok Pawar Rushiraj Pawar : अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराज यांचे अपहरण करुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे. तसंच विविध ठिकाणी प्रचारसभाही असणार आहे. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहेत.