सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचारामुळे राज्यातील २०० सहकारी साखर कारखान्यांपैकी १०१ साखर कारखाने मृत्युपंथाला लागले असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगलीत केला. भाजपचे उमेदवार आ. सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत गृहमंत्री शहा बोलत होते. या वेळी आमदार गाडगीळ यांच्यासह पालकमंत्री सुरेश खाडे, संजयकाका पाटील, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी मंत्री शहा म्हणाले, ‘सांगलीत आशिया खंडातील सर्वांत मोठा वसंतदादा सहकारी साखर कारखाना उभारला होता. मात्र, तोही विकण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या कारकिर्दीत झाला. सहकारातील संस्था कोणी आणि कशासाठी मोडल्या, याचे उत्तर पवार यांनी द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र सहकारी साखर कारखान्याच्या साखरेवरील प्राप्तिकर हटवून शेतकऱ्यांना १५ हजार कोटींचा फायदा दिला आहे.

Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा >>> काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर इच्छुक – अमित शहा

राज्यात २००४ ते २०१४ या कालावधीत आघाडीचे सरकार असताना केंद्रात मनमोहनसिंग यांचे सरकार होते. या १० वर्षांच्या कालावधीत केंद्राकडून राज्याला १ लाख ९१ हजार कोटी मिळाले. मात्र, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत राज्याला १० लाख १५ हजार ९०० कोटी रुपये देण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून पाचव्या स्थानी आली असून, २०२७ मध्ये ती तिसऱ्या स्थानी येईल. मोदी सरकारच्या काळात दहशतीवादी हल्ले कमी झाले असून, देशाच्या सीमा सुरक्षित हाती आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लाल कव्हरमध्ये संविधानाचे वाटप केले. मात्र, यामध्ये आत कोरी पानेच आहेत. यामुळे संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान त्यांनी केला आहे. कोणीही संविधान बदल करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी या वेळी दिला. तर एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण कोणत्याही स्थितीत हटवले जाणार नाही, असे सांगत त्यांनी सांगलीला लवकरच विमानतळ होईल, असे आश्वासन या वेळी दिले.

Story img Loader