कराड : राम मंदिर, रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्यांसह हिंदुत्वाला आतंकवाद म्हणणाऱ्यांसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी प्रतारणा केली. वडिलांनी कमावले ते सारे सत्तेसाठी पणाला लावले अन् गमावलेही, काँग्रेस आणि सर्व विरोधकांसह विशेषतः उद्धव ठाकरे यांना राष्ट्रहितापेक्षा सत्ता, स्वार्थ अन् आपला मतगठ्ठा हवा असल्याचा हल्लाबोल केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांनी केला. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या तुलनेत तब्बल दहापट अधिकचा निधी मोदी सरकारने महाराष्ट्राला दिल्याचा दावा अमित शहांनी केला.

‘महायुती’तर्फे भाजपचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ विंग (ता. कराड) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, उमेदवार डॉ. अतुल भोसले, कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, विनायक भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, अशोकराव थोरात, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश प्रतिनिधी विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, राजेंद्र यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

हेही वाचा >>> ‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”

कराडची ग्रामदेवता कृष्णाबाई आणि माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांना वंदन करीत असल्याचे सांगत अमित शहा यांनी सभेला जोशात सुरुवात केली. शिवरायांच्या आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांच्या या भूमीबद्दल नितांत आदर असल्याचे ठळकपणे नमूद केले. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ‘कराड दक्षिण’चे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे सातारा जिल्ह्याचा अपेक्षित विकास झाला नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. आता डॉ. अतुल भोसले या उच्चशिक्षित भाजपच्या उमेदवाराला संधी द्या, ‘कराड दक्षिण’मध्ये राष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक आणू, हा मतदारसंघ झोपडपट्टीमुक्त करू, इथे सर्वांगीण विकास साधू आदी आश्वासने देताना, अतुल भोसलेंनी निवडून येताच वर्षभरात झोपडपट्टीमुक्तीचे मिशन पूर्ण करावे, असे शहा यांनी सूचित केले.

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांत कोणतेही नवे प्रकल्प हाती घेतले गेले नाहीत. कुठूनही गुंतवणूक नाही. पण, ‘महायुती’च्या सरकारने राज्याला प्रगतिपथावर ठेवताना, देशातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचा दावा शहा यांनी केला. परंतु, या संदर्भात शरद पवार या वयातही खोटे बोलतात; खोटे बोलणे सोडत नाहीत, शरद पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर अन्यायच केल्याचे कोरडे शहा यांनी ओढले.

हेही वाचा >>> ‘पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील १०० साखर कारखाने मृत्युपंथाला’, अमित शहा यांचा हल्लाबोल

गेल्या वेळी अतुल भोसलेंना केवळ नऊ हजार मते कमी मिळाल्याची सल मनात असल्याने मी या खेपेसही ठरवून सभेसाठी आलोय. पराभवाची ही कसर तुम्ही भरून काढत मोठे मताधिक्य द्या; अतुल भोसलेंना मोठे स्थान देण्याची जबाबदारी आपली असल्याची ग्वाही शहा यांनी दिली.

राहुल गांधींचा समाचार घेताना ते म्हणाले, की अग्निवीरांबाबत चुकीचे बोलणाऱ्या राहुल गांधींच्या भूलथापांना युवकांनी भुलू नये. त्यांच्याप्रमाणे खोटी आश्वासने आम्ही देत नसून, महाराष्ट्रातील सर्व अग्निवीरांना केंद्र व राज्य सरकारची पेन्शनची नोकरी देणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी ‘वन रँक वन पेन्शन’चे आश्वासन दिले; पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करून एक लाख ५५ हजार कोटी रुपये जवानांच्या बँक खात्यावर जमाही केलेत. तर, दुसरीकडे काँग्रसने केवळ भूलथापा दिल्या,  राहुल गांधी म्हणजे खोटे बोलण्याची कंपनीच असल्याची टीका शहा यांनी केली .

पृथ्वीराज चव्हाण कुटुंबाकडे ५० वर्षे सत्ता असून, पृथ्वीराज स्वतः केंद्रात आणि तेही पंतप्रधान कार्यालयात मंत्री, मुख्यमंत्री असतानाही त्यांनी आपल्या मतदारांसाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केले? शरद पवारांनीही काहीही ठोस केले नाही, अशी टीका अमित शहांनी केली. डॉ. अतुल भोसले यांनी कराडच्या एमआयडीसीला पंचतारांकित बनवावे, सहकारी सिंचन योजना पुनर्गठित कराव्यात, कराड दक्षिण झोपडपट्टीमुक्त करावा, आदी मागण्या करताना, मतदारसंघातील भाजपची कामगिरी, जनतेच्या अडचणीही या वेळी मांडल्या.

Story img Loader