Maharashtra Legislative Assembly Session : राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस. चौथ्या दिवशी कोणत्या मुद्द्यांवर सभागृहात खडाजंगी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आर्थिक पाहणी अहवालात राज्य सरकारने अनेक घोषणांची खैरात केली आहे. त्यामुळे यावरूनही चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. आत्महत्या रोखून त्यांना तत्काळ कर्जमुक्ती व्हावी यासाठी विरोधकांकडून मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तसंच, आज विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तर, दुसरीकडे राज्यात लहरी हवामान निर्माण झालं आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा देऊनही पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे, राज्यातील राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी आणि पावसाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.