बच्चू कडू शिंदे सरकारवर नाराज? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिल्याने चर्चा; म्हणाले “व्यक्तिगत हितासाठी…”

मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानेच बच्चू कडू नाराज?

बच्चू कडू शिंदे सरकारवर नाराज? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिल्याने चर्चा; म्हणाले “व्यक्तिगत हितासाठी…”
मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानेच बच्चू कडू नाराज?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचं पहिलंच पावसाळी अधिवेशन पार पडत असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवरुन गद्दार अशा घोषणा दिल्याने संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान यावेळी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली होती. मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानेच बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र बच्चू कडू यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

“कामानिमित्त बाहेर असल्याने मी काल येऊ शकलो नव्हतो. नाराज आहे म्हणून न येण्याचं काही कारण नाही. नाराजी असली तरी ती सभागृहात दाखवण्यात अर्थ नाही. मी याआधीही बोललो आहे की, व्यक्तिगत हितासाठी आम्ही नाराज होणार नाही. महत्त्वाचे मुद्दे असून त्यासंबंधी लढा सुरु राहील”. १५ सप्टेंबरच्या आत मंत्रीमंडळ विस्तार होईल असं सांगताना बच्चू कडू यांनी आपल्याला शब्द दिला असल्याचा पुनरुच्चार केला.

“जेव्हा तुम्ही श्रेष्ठींसमोर आव्हान उभं करता…”, भाजपाने गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसंबंधी बोलताना ते म्हणाले “ईडीचा उपयोग देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी केला आणि तो सार्वत्रिक केला तर चांगलं होईल”. मोहित कंबोज यांच्या ट्वीटसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी हे उचित नाही असं स्पष्ट मत मांडलं. कोणातरी राजकीय नेत्यांना बोलावं, त्यानंतर कारवाई करावी हे योग्य नाही असं ते म्हणाले.

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? कंबोज म्हणाले, “अरे भावा, आज…”

भाजपाने निवडणूक समितीत नितीन गडकरींना वगळून फडणवीसांना स्थान दिल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले “तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे. फडणवीस आणि गडकरी यांना वेगळं करुन चालणार नाही. भाजपाची निती पाहता तिथे व्यक्तिगत पाहिलं जात नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly session mla bachchu kadu on eknath shinde devendra fadnavis ed ajit pawar sgy

Next Story
“हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांना शिवसेना विकली होती”, काँग्रेस सोडताच नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी