विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारवर उत्तर नसल्याने पहिलाच प्रश्न राखीव ठेवण्याची नामुष्की ओढवली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात प्रश्न विचारला होता. पण याची उत्तरं आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने, आपल्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली. सोमवारी या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली होती. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही आणि प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला.

बच्चू कडू शिंदे सरकारवर नाराज? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिल्याने चर्चा; म्हणाले “व्यक्तिगत हितासाठी…”

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या ८० बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील २९ बालकांना या रोगाची लागण झाली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डासांमुळे पसरणारा हत्तीरोग गंभीर असून त्यामुळे शरीर विद्रुप व अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. याकडे लक्ष वेधलं.

“जेव्हा तुम्ही श्रेष्ठींसमोर आव्हान उभं करता…”, भाजपाने गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. हत्तीरोग नियंत्रण यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, त्यापैकी भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिंबंक उपाययोजनांसाठी पालघर जिल्ह्यासाठी मंजूर निधी व वर्षभरात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता आली नाहीत. त्यामुळे हा प्रश्न उत्तरासाठी सोमवापर्यंत पुढे ढकलण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly session ncp ajit pawar maharashtra government palghar health minister tanaji sawant sgy
First published on: 18-08-2022 at 12:51 IST