आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंवरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी भागातील स्थिती पाहता लाज वाटली पाहिजे असं म्हणताच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. यानंतर जयंत पाटील यांनी त्यांना विधानाचा नेमका अर्थ समजावून सांगत सरकारच्या कारभारावर टीका केली. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी ‘लाज वाटली पाहिजे’ हे वाक्य असंसंदीय असल्यास कामकाजातून काढलं जाईल स्पष्ट केलं.

आदित्य ठाकरे काय म्हणाले –

“आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली असून, आपल्या राष्ट्रपती आदिवसी समाजाच्या आहेत. यावर्षी तरी आम्हाला असं उत्तर अपेक्षित नव्हतं. हे कार्य, पाप आमचं, तुमचं नाही. जेव्हा आपण आदिवासी ठिकाणी जातो, तेव्हा तिथे गेल्यानंतर राजकारणी म्हणून आपल्याला तेथील स्थिती पाहून लाज वाटली पाहिजे. ७५ वर्षांपासून ही स्थिती आहे. प्रश्न राखीव ठेवलेला असतानाही कुपोषणामुळे मृत्यू होत नाहीत, असं उत्तर मिळत आहे,” असा आक्षेप आदित्य ठाकरेंनी घेतला.

rashtrasant tukdoji maharaj marathi news, rashtrasant tukdoji maharaj voter appeal
मतदान राजा, तुकडोजी महाराज म्हणतात, नीट विचार करून मत दे…!
chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट
bjp royal family members ticket
Video: ‘घराणेशाही’वरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपाकडून राजघराण्यांतील १० सदस्यांना लोकसभेची उमेदवारी
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

“महाराष्ट्राचे प पू…,” ‘युवराजांची ‘दिशा’ चुकली’, शिंदे गटातील आमदारांची आदित्य ठाकरेंवर टीका

“करोनाचा काळ सुरु असताना देशात काही राज्यांमध्ये, रुग्णालयात करोना झाला तरी सर्दीमुळे, ह्रदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगत होते. महाविकास आघाडी सरकार असताना मृत्यूचं निमित्त काही असलं तरी कारण करोना असल्याने तो दाखवला पाहिजे असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं. करोनाची आकडेवारी कमी करु नका असे निर्देश होते. त्यामुळे कुपोषण नाही असं म्हणणं खोटं आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

“सर्वपक्षीय समिती तयार करुन आदिवासी समाजाला न्याय देणार आहोत की नाही. कुपोषणासारख्या विषयात काही सुधारणा करणार आहोत का?,” अशी विचारणाही आदित्य ठाकरेंनी मंत्र्यांना केली.

सुधीर मुनगंटीवार संतापले –

यानंतर सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि लाज वाटली पाहिजे वाक्यावर संताप व्यक्त केला. “सदस्यांनी संसदीय शब्दांचा वापर करुन आपलं मत, भावना मांडता येतात. लाज वाटली पाहिजे म्हणजे काय? हे आकडे कुठले आहेत याची त्यांनी माहिती आहे. आपल्याच पित्याबद्दल लाज वाटली पाहिजे असे शब्द ते कसे काय बोलू शकतात? हे आकडे तीन वर्षांचे आहेत, आपले वडील मुख्यमंत्री होते,”

जयंत पाटील यांची मध्यस्थी

यानंतर जयंत पाटील उभे राहिले आणि मुनगंटीवार यांनी गैरसमज करुन घेतला असल्याचं म्हटलं. “आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांनी ज्यापद्धतीने असंवेदनशील वक्तव्य केलं, त्याबद्दल म्हटलं आहे. सरकारमध्ये गोंधळ सुरु आहे. आरोग्यमंत्र्यांचे आकडे आदिवासी मंत्री बोलून दाखवत आहेत. वनमंत्री आदिवासी मंत्र्यांचं संरक्षण करत आहेत. वनमंत्री, आरोग्यमंत्री यांची नव्हे तर आदिवासी विभागाची जबाबदारी आहे. आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते वक्तव्य मागे घ्या,” असं जयंत पाटील म्हणाले.

आधी मुख्यमंत्र्यांना ऑफर, मग पंतप्रधानपदाचा उल्लेख करत फडणवीसांना चिमटा, जयंत पाटलांची विधानसभेत टोलेबाजी!

यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लाज वाटली पाहिजे’ असंसदीय शब्दांच्या यादीत असल्याचं सांगत सदस्यांना ताकीद देण्याची मागणी केली. आदित्य ठाकरेंनी यावर स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा गैरसमज करुन घेतला असल्याचं सांगत पुन्हा आपलं वक्तव्य पुन्हा बोलून दाखवलं. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा असंसदीय शब्द असल्यास कामकाजातून काढला जाईल असं स्पष्ट केलं.