Winter Session Of Maharashtra Assembly, 28 December 2022 : महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधारी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. शिवाय, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही राजकारण तापलं असताना आता अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

maharashtra prantik tailik mahasabha , demands, check vijay wadettiwar caste certificate, prakash devtale, sudhir mungantiwar, pratibha dhanorkar, chandrapur lok sabha seat,
“विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासा,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची मागणी; खोट्या स्वाक्षऱ्या करून काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा आरोप
BJP star campaigners drops eknath shinde ajit pawar
भाजपाने स्टार प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदे, अजित पवार यांना वगळले; कारण काय?
Hasan Mushrif On Sanjay Mandalik
“…तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात ईश्वरालाही शक्य होणार नाही”, हसन मुश्रीफ यांचे विधान चर्चेत
Vijay Wadettiwar
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?
Live Updates

Assembly Winter Session 2022 Live Updates, 28 December 2022 : विधिमंडळ अधिवेशनातील महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर

18:07 (IST) 28 Dec 2022
नागपूर : गद्दारांचे घोटाळे, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके – आदित्य ठाकरे

राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे. सरकारमध्ये गद्दार नेते बनले आहेत. गद्दारांचे घोटाळे बघता स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, असे चित्र राज्यात दिसत आहे, अशी टीका शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारमधील गद्दार मंत्र्यांवर केवळ भ्रष्टाचाराचे आरोपच नव्हे तर पुरावे सुद्धा आहे. सर्व कागदपत्र जनतेसमोर आहे. सविस्तर वाचा…

17:00 (IST) 28 Dec 2022
..त्या दिवशी तुम्हाला बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा अधिकार राहिला नाही - मुख्यमंत्री

तुम्ही निवडून आलात, तेव्हा यांचीच मदत लागली तुम्हाला. ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात, त्या दिवशी बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचाही अधिकार तुम्हाला राहिला नाही. तो अधिकार आम्हाला आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

16:58 (IST) 28 Dec 2022
फक्त एकच हात जोडून विनंती आहे, की... - अनिल परब

आपण कर्तृत्वावान आहात. आपण ५० लोक घेऊन गेलात आणि सरकार स्थापन केलं. त्यातला एक जरी पडला, तरी राजीनामा देईन, हे तुमचं वाक्य आहे. आपल्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. फक्त एकच हात जोडून विनंती आहे, की बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा की पुढच्या वेळी भाजपाच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही. याच्यातले किती लोक भाजपाच्या तिकिटावर लढणार आहेत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही तुमच्या जिवावर आम्हाला हरवलंत, तर आम्ही तुमचं स्वागत करू. आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. पण भाजपाच्या मदतीने आम्हाला हरवणार, याचं आम्हाला वाईट वाटेल - अनिल परब

16:52 (IST) 28 Dec 2022
..तरी हा एकनाथ शिंदे फिल्डवर उतरला - मुख्यमंत्री

समृद्धी महामार्गाला कुणी-कुणी विरोध केला हे सगळ्यांना माहिती आहे. तरी एकनाथ शिंदे फिल्डवर उतरला. शेतकऱ्यांना समजावलं. पंतप्रधानांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन झालं. त्याला योगायोग, शुद्ध इच्छा, पुण्याई असं सगळंच लागतं - एकनाथ शिंदे

16:51 (IST) 28 Dec 2022
आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून कारभार करतोय - एकनाथ शिंदे

आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही राज्याचा कारभार करत आहोत. एकेक निर्णय घेत आहोत. लोकांच्या मनातले निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आमच्या पाठिशी आहेत. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही पाठिंबा आहे.

16:43 (IST) 28 Dec 2022
सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी योजनांची मुख्यमंत्र्यांची घोषणा

स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणेच दरमहा १० हजार रुपये मिळत होते, ते आम्ही २० हजार केले. त्यानंतर १३ लाभार्थ्यांना आपण निवृत्तीवेतनही देत आहोत. सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाप्रमाणे १५ वर्षं जे महाराष्ट्रात राहतात, तसं तिथे १५ वर्षं वास्तव्याचा दाखला असणाऱ्यांनाही या योजना लागू आहेत. गृहनिर्माण मंडळातर्फे गाळे वाटपासाठीचा अर्ज करताना सीमाभागातील १५ वर्षं वास्तव्य हे महाराष्ट्रातील १५ वर्षं वास्तव्य असल्याचं ग्राह्य धरण्यात येईल. - एकनाथ शिंदे

16:39 (IST) 28 Dec 2022
एक इंचही जागा सोडणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एक इंचही जागा आम्ही सोडणार नाही. त्यासाठी वाट्टेल ते करू. आमच्या मराठी भाषिक लोकांवर अन्याय होता कामा नये, यासाठी आम्ही शक्य ते सर्व करू - एकनाथ शिंदे

16:37 (IST) 28 Dec 2022
आम्ही बोलत नाही, करून दाखवतो - एकनाथ शिंदे

आमचा संयम म्हणजे आमची हतबलता नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बोलत नाही, करून दाखवतो - एकनाथ शिंदे

16:34 (IST) 28 Dec 2022
कोण काय काय बोललं, हेही आम्हाला माहिती आहे - एकनाथ शिंदे

या एकनाथ शिंदेनं संघटनेसाठी आयुष्य घालवलं. तेव्हा कुठे होते हे? सीमाप्रश्न, पूर, कोविड, संकट अशा सर्व वेळी पूर्ण राज्यानं पाहिलंय ते. त्यामुळे बोलताना विचार करून बोला. आम्हीही बोलू शकतो. कोण काय काय बोललं, हेही आम्हाला माहिती आहे. पण ते आम्ही आता बोलत नाही. जेव्हा काही लोक सीमा ओलांडतात, तेव्हा मलाही थोडं बोलायला लागतं - एकनाथ शिंदे

16:33 (IST) 28 Dec 2022
जो शीशे के घर में रहता हे, वो... - मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत शायरी

वाट्टेल ते बोललं जातंय. एक सहनशक्ती असते. पण आम्ही वेडंवाकडं काही सहन करणार नाही. मंत्री जेलमध्ये गेले तरी त्यांचे राजीनामे घेतले नव्हते तुम्ही. जो शीशे के घर में रहता हे, वो दुसरों के घरों पर पत्थर नहीं फेका करते. शीशे में रहने वालों को कपडे बदलने की आवश्यकता नही होती, फिर भी बदलते है वो - एकनाथ शिंदेंचा टोला

16:31 (IST) 28 Dec 2022
काही पोपट पिंजऱ्यातून बाहेर येतात आणि... - एकनाथ शिंदे

काही लोक येऊन नवीन नवीन काहीतरी सांगतायत. काही पोपट पिंजऱ्यातून बाहेर येतात आणि सुरू होतायत. काही लोक सकाळी साडेनऊपर्यंत टीव्ही लावत नाहीत. कंटाळलेत लोक. वाट्टेल ते बोलणं चाललंय. निर्लज्ज सरकार आहे वगैरे. अरे निर्लज्जपणाचा कळस तर तुम्ही गाठला. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात. बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचा फोटो लावून मतं मागितली. मग सरकार कुणासोबत यायला हवं होतं? मग चुकलं कोण? निर्लज्जपणा कुणी केला? आम्ही तर उघडपणे केलं सगळं. काही लपवलं नाही. - एकनाथ शिंदे

16:28 (IST) 28 Dec 2022
'उद्धव ठाकरेंची अडकलेली कॅसेट...' - प्रसाद लाड

उद्धव ठाकरेंनी मुंबईला काय दिलं?; प्रसाद लाड यांचा सवाल

पाहा व्हिडीओ

16:27 (IST) 28 Dec 2022
'सत्तारांच्या मुलीला नोकरी मिळालेली नाही' - देवेंद्र फडणवीस

टीईटी घोटाळ्याच्या मुद्द्यावर फडणवीस आक्रमक, विधानसभेत अब्दुल सत्तारांचं केलं समर्थन

पाहा व्हिडीओ

16:22 (IST) 28 Dec 2022
नागपूर : नक्षलवाद्यांचा बिमोड करून मी सुरजागड प्रकल्प सुरू केला ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सुरजागड प्रकल्प सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला. त्यामुळे मला धमक्या देखील आल्या. नक्षलवाद्यांचा बिमोड करून मी सुरजागड प्रकल्प सुरू केला. आता या प्रकल्पामुळे या भागातील नक्षलवाद कमी झाला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदे केला. सविस्तर वाचा…

16:21 (IST) 28 Dec 2022
महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवातच कमकुवत झाली - एकनाथ शिंदे

सीमावाद प्रकरणी महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवात कमकुवक मानसिकतेतून झाली. त्यावेळी झालेल्या ठरावावरून हे स्पष्ट होतंय. तेव्हापासून ५० वर्ष कुणाचं सरकार होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. १०७ हुतात्मांवर गोळीबाल झाला, तेव्हा त्यांच्याच पक्षातल्या सी. डी. देशमुखांनी टीका केली होती - एकनाथ शिंदे

16:16 (IST) 28 Dec 2022

सीमाभागात जेवढी गावं आहेत, त्यातली एक इंचही जमीन त्यांना मिळणार नाही, ही गावंही तिकडे जाणार नाहीत याची सगळी जबाबदारी आमची आहे - एकनाथ शिंदे

16:15 (IST) 28 Dec 2022
मला दु:ख एवढंच आहे की... - एकनाथ शिंदे

दु:ख एवढंच आहे की आपल्या राज्यातल्या माणसांना कर्नाटकमध्ये जाण्यासाठी फितवलं जात आहे. त्यांना प्रोव्होक केलं जातंय. त्याच्या पाठिशी कोण आहे, हे माहिती आहे आम्हाला. मला कुणाचं नाव घ्यायचं नाहीये. पण हे वाईट आहे. आपल्या राज्याबद्दल प्रत्येकाला प्रेम असायला हवं - एकनाथ शिंदे

16:14 (IST) 28 Dec 2022

जतमधल्या ४८ गावांचा पाण्याचा प्रश्न होता. त्यासाठी २ हजार कोटी देऊन त्या प्रकल्पाला मान्यता दिली. त्या भागातले लोक उठाव करतात, ठराव करतात. त्याचा सगळा रिपोर्ट आमच्याकडे आहे. कोण त्याच्या पाठिशी आहे. आपल्या राज्याबद्दल प्रत्येकाला प्रेम असायला हवं. आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जावं ही वृत्ती कशाचं द्योतक आहे? - एकनाथ शिंदे

16:13 (IST) 28 Dec 2022
जयंत पाटलांना कुणी थांबवलं होतं? - एकनाथ शिंदे

जयंत पाटील म्हणतात, मी ११ अर्थसंकल्प मांडले. जत तालुका त्यांचाच आहे. सांगली त्यांचा जिल्हा आहे. मग त्यांना या तालुक्यातल्या गावांचा विकास करण्यापासून कुणी थांबवलं होतं? - एकनाथ शिंदे

16:12 (IST) 28 Dec 2022
फळं असणाऱ्या झाडाला लोक दगडं मारतात - एकनाथ शिंदे

काही लोक टीका करत होते. ठीक आहे. आरोप-प्रत्यारोप होत असतात. ज्या झाडाला फळं असतात, त्या झाडाला लोक दगडं मारत असतात. कामाने आम्ही उत्तर देऊ - एकनाथ शिंदे

16:11 (IST) 28 Dec 2022
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!

घराबाहेर न पडणारे आज रस्त्यावर आले. रस्त्यावरून पायरीवर आले. यातच आमचा विजय आहे - एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला!

16:11 (IST) 28 Dec 2022
आजही मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे - एकनाथ शिंदे

जे लोक आमच्या आंदोलनावर संशय घेण्याचं काम करत आहेत. काहीजण म्हणतात लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा आमच्याकडे होते. आजही मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे. मी एक शिवसैनिक आहे. आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्री नाही - एकनाथ शिंदे

16:10 (IST) 28 Dec 2022

तुम्ही जो विश्वास दाखवताय, त्याचं आम्हाला समाधान आहे. निवडणुकीवेळी राजकारण करू. पण आता अजिबात राजकारण करायचं नाही. खऱ्या अर्थाने आपण आमच्या क्षमतेवर एक प्रकारे विश्वास दाखवला त्याचा आम्हाला आनंद आहे. ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याची संधी आपल्याला आली आहे - एकनाथ शिंदे

16:09 (IST) 28 Dec 2022

आम्हीही सीमाभागात संघर्ष केला. बेल्लारीच्या जेलमध्ये आम्हाला तुरुंगवासही झाला. अनेकांनी त्यावेळी आंदोलनं केली. काहींना तुरुंगवासही भोगावा लागला. तेव्हापासून आपण पाहातोय की ६६ वर्षांत सर्वच पक्षांनी प्रयत्न केले. पण ६६ वर्षांचा हा प्रश्न ६ महिन्यांत आम्ही सोडवावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल तर आमची काही हरकत नाही - एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

16:07 (IST) 28 Dec 2022
सीमाभाग आपला अविभाज्य भाग - एकनाथ शिंदे

आपल्या हक्काची ती ८६५ गावं आहेत. बेळगाव, कारवार, निराणी, भालकी, बिदर या शहरांसह ही सगळी गावं आपली आहेत. सीमाभाग हा महाराष्ट्राचाच अविभाज्य घटक आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. आत्तापर्यंतचा संघर्ष आहेच, पण दुर्दैवाने काही चुकाही आहेत - एकनाथ शिंदे

16:06 (IST) 28 Dec 2022

आज सगळेच जण सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. आपल्या एकजुटीमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना आधार मिळणार आहे - एकनाथ शिंदे

16:05 (IST) 28 Dec 2022
सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत निवेदन

सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत निवेदन

16:05 (IST) 28 Dec 2022

कर्नाटक सरकारची मराठी माणसाविरुद्ध कारवाई सुरू झाली, तेव्हा मुंबईतले कानडी लोक मला भेटले. आम्ही इथे राहतो, आम्ही अशा प्रकारच्या कृत्याचं समर्थन करणार नाही असं ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या नागरिकांना तिथे त्रास सहन करावा लागतो, हे असं होता कामा नये - मुख्यमंत्री

15:44 (IST) 28 Dec 2022
सत्ताधारी-विरोधकांनी सोबत या विषयावर काम करायला हवं - गोपीचंद पडळकर

सरकार आणि विरोधी पक्षांनी हातात हात घालून हा विषय पुढे घेऊन गेलं पाहिजे. शिंदे सरकार आल्यापासून सीमावाद निर्माण झालाय, असं वातावरण तयार केलं जातंय. ते योग्य नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतायत, याकडे न बघता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय ताकदीने बाजू मांडतायत हे बघायला हवं - गोपीचंद पडळकर

15:43 (IST) 28 Dec 2022

एखाद्या भूभागावरचा हक्का रेटून नेणं, व्यक्तीगत भूमिका विस्तारवादाची असेल, तर काळ बदलूनही ती भूमिका गेलेली नाही. जेव्हा मैसूर राज्याची भाषिक आधारावर निर्मिती झाली, तेव्हा सीमाभागातील मराठी भाषिकांचा जबरदस्तीने मैसूर भागात समावेश केला. तेव्हापासून आत्तापर्यंत सीमाप्रश्न वारंवार चर्चेला येतो - गोपीचंद पडळकर

15:32 (IST) 28 Dec 2022
नितीन देशमुखांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

याबाबत मी माहिती घेतो. कुणावरही अन्याय होणार नाही. नितीन देशमुखांना कुणी अटक करणार नाही, अशा सूचना मी देतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

15:31 (IST) 28 Dec 2022
३५३ अ चा गैरवापर केला जातोय - अनिल परब

३५३ अ चा गैरवापर केला जातो. आज नितीन देशमुखांवर लावलेला गुन्हा रद्द करण्यात यावा. भविष्यात या कायद्याच्या आधारे अशा प्रकारे कारवाई होऊन कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं गेलं, तर गैरवापर वाढेल. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने पावलं उचलावीत आणि नितीन देशमुख यांना दिलासा द्यावा - अनिल परब

15:30 (IST) 28 Dec 2022

जर एक पोलीस अधिकारीही भीती दाखवायला लागला, तर आमदारकी करायची काय आहे? - अनिल परब यांचा संतप्त सवाल

15:29 (IST) 28 Dec 2022
नितीन देशमुखांविरोधातील गुन्हा प्रकरणी अनिल परब संतप्त...

नितीन देशमुख पहिल्या वेळेचे आमदार आहेत. त्यांना व्यवस्था माहिती नाही. त्यांना पास मागितला, ते म्हणाले आणतो. नंतर त्यांना समजलं की पासची गरज नाही. जर आमदार विरोधी पक्षनेत्याच्या घरी कार्यकर्त्यांना घेऊन जात असेल आणि तिथे पास घेऊन जावं लागतं असं म्हणून वाद घातला तर कुणाला राग येणार नाही. एका विशिष्ट पक्षाच्या आमदाराला अडवलं जातं. तिथे तू तू मै मै झाली, म्हणून रात्री ३५३ अ गुन्हा दाखल झाला आणि आज त्या आमदाराला सांगितलं जातं की तुम्हाला आतमध्ये टाकू. कोण हे हा अधिकारी? - अनिल परब

15:27 (IST) 28 Dec 2022

इथे बसलेला कोणताही आमदार इथपर्यंत सहज आलेला नाही. हा संघर्ष करूनच आला आहे. प्रत्येकाला कधी ना कधी या यंत्रणांशी संघर्ष करावाच लागतो. त्यावेळी समजा एखादी छोटी घटना घडली, उद्या हे पेपर मी पोलीस अधिकाऱ्यासमोर आपटले आणि माझ्याविरोधात ३५३ अ दाखल करून मला पोलीस अटक करणार असतील, तर हा कायद्याचा गैरवापर आहे - अनिल परब

14:56 (IST) 28 Dec 2022
नागपूर: हा तर सीमावासीयांच्या लढ्याचा अपमान- लाड

"ड्रॉईंगरूम" मधून बसून बातम्या ऐकून आम्हालाही बेळगावचा लढा माहिती आहे, असे म्हणणे म्हणजे सीमावासीयांच्या लढ्याचा अपमान असल्याचा टोला भाजपचे  प्रसाद लाड यांनी अप्रत्यक्षपणेपणे शिवसेनेचे (ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना हाणला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना लाड म्हणाले, म्हैसूर, कर्नाटक, बेळगाववरून सत्ताधाऱ्यांना "टार्गेट" करणे सोडा. सविस्तर वाचा…

14:53 (IST) 28 Dec 2022
Phone Tapping Case : “माझा फोन ६८ दिवस टॅप केला गेला,” एकनाथ खडसेंचं विधानपरिषदेत विधान!

मुंबई पोलिसांकडे तसेच सायबर पोलिसांकडे दाखल असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात शासनाने परवानगी नाकारल्याने शुक्ला यांना दिलासा मिळाला होता. पण पुणे पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत मात्र न्यायालयानेच पुन:तपासाचे आदेश दिल्याने शुक्ला यांची तूर्तास पंचाईत झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. वाचा सविस्तर बातमी...

14:42 (IST) 28 Dec 2022
Maharashtra Assembly Session: नागपूरची संत्री- भ्रष्ट आहे मंत्री.., संत्रा आहे गोल, सरकारचा वाजवा ढोल...; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

'दिल मांगे मोर, सत्ताधारी चोर..', 'नागपूरची संत्री भ्रष्टाचारी मंत्री..', 'संत्रा आहे गोल, सरकारचा वाजवा ढोल..' अशा घोषणांनी विरोधकांनी विभान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. हातात संत्री घेऊन जोरदार घोषणाबाजी करत  विरोधकांनी आजही आंदोलनाचा तीव्र सूर विधान भवन परिसरात आवळला. सविस्तर वाचा…

14:16 (IST) 28 Dec 2022
नागपूर: २०२४ मध्ये अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम; काय म्हणाले बावनकुळे

बारामतीतील माझ्या एका दौ-यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रमाची भाशा बोलत आहे. प्रत्यक्षात कुणाचा कार्यक्रम करायचा हे जनता २०२४ मध्ये ठरवेल. २०२४ च्या निवडणुकीत अजित दादांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे दावाभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. विधानभवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते. सविस्तर वाचा…

14:04 (IST) 28 Dec 2022
“…अशा बोलघेवड्या लोकांना तंबी द्या”, फडणवीस अमित शाहांना पाठवणार पत्र, म्हणाले “हे पूर्णपणे चुकीचे”

कर्नाटकच्या कायदामंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करावी अशी मागणी तेथील विधानपरिषदेत केली आहे. तसंच मुंबईत २० टक्के कन्नडभाषिक राहतात असा दावा केला असून त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत संताप व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कडक शब्दांत निषेध व्यक्त केला. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असल्याचंही सांगितलं आहे.

सविस्तर बातमी

13:56 (IST) 28 Dec 2022
फडणवीस स्पायडरमॅनसारखे काम करतात - बावनकुळे

अजित पवारांनी आपल्या पक्षातलं बघितलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस स्पायडर मॅनसारखे काम करत आहेत. त्यांच्या कामाला अजित पवार एक टक्काही नाहीयेत.त्यामुळे अजित पवारांनी तोंडाच्या वाफा कमी केल्या पाहिजेत. - चंद्रशेखर बावनकुळे

13:22 (IST) 28 Dec 2022
कूपर हॉस्पिटलमधील कथित घोटाळ्याची चौकशी होणार!

मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये २०० कोटींचा घोटाळा? मुख्यमंत्र्यांनी दिले आरोपांच्या चौकशीचे आदेश!

12:47 (IST) 28 Dec 2022
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर

12:47 (IST) 28 Dec 2022
Maharashtra Assembly Session: ‘मुंबईत २० टक्के कन्नडभाषिक राहतात’ म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्यावर फडणवीस संतापले, म्हणाले “कोणाच्या बापाची…”

कर्नाटक सरकारच्या मराठीविरोधी भूमिकेचा तीव्र निषेध करीत बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील इंचन्इंच जमीन महाराष्ट्राचीच असल्याचा ठराव मंगळवारी विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला. यानंतर कर्नाटकच्या कायदामंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करावी अशी मागणी तेथील विधानपरिषदेत केली आहे. तसंच मुंबईत २० टक्के कन्नडभाषिक राहतात असा जावईशोध लावला असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्राची असून, कोणाच्याही बापाची नसल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी

12:36 (IST) 28 Dec 2022
मी कडू जरी असलो, तरी कधीकधी गोड असतो - बच्चू कडूंची मिश्किल टिप्पणी

मी या सभागृहात जेव्हा आलो, तेव्हा लक्ष दिलं आणि दोन शासन निर्णय काढले. आपण एकूण ८२ शासन निर्णय काढले. देशातलं हे पहिलं मंत्रालय आहे. देशातलं हे पहिलं सराकर आहे ज्यानं दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं. म्हणून आम्ही आपले आयुष्यभर ऋणी राहू. तुम्ही म्हणाल, तशा पद्धतीने आम्ही वागू. मी कडू जरी असलो, तरी कधीकधी गोड असतो, हे लक्षात ठेवा. सर्व दिव्यांग बांधवांकडून आशीर्वाद मिळोत, अशी प्रार्थना करतो - बच्चू कडू

12:27 (IST) 28 Dec 2022
Abdul Sattar: गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर अब्दुल सत्तारांचं निवेदन

उच्च न्यायालय या प्रकरणी जो निर्णय देईल, तो मला मान्य असेल - अब्दुल सत्तार

12:24 (IST) 28 Dec 2022
Abdul Sattar: गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर अब्दुल सत्तारांचं निवेदन

मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत गायरान जमीन घोटाळ्यासंदर्भात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर निवेदन सादर केलं. नियमांनुसारच जमिनींचं वाटप करण्यात आलं असून कोणताही घोटाळा झालेला नसल्याचा दावा आपल्या निवेदनात अब्दुल सत्तार यांनी केला.

12:16 (IST) 28 Dec 2022
Devendra Fadnavis: पहिला विरोधी पक्ष असेल, की जो...

मला आश्चर्य वाटतं की हा पहिला विरोधी पक्ष असेल, की जो स्वत:च्या सत्ताकाळातल्याच गोष्टी घोटाळे म्हणून बाहेर काढतोय. असा विरोधी पक्षच पाहिला नाही. त्यांनी बॉम्ब म्हटलं आणि लवंगी फटाकेही सापडत नाहीयेत. त्यासंदर्भात वरून आदेश असतील. त्यांनी पहिल्यांदा उत्तर दिलं पाहिजे की टीईटीचा घोटाळा का झाला? अपात्र कंपन्यांना पात्र कुणी केलं? त्यांच्यावतीने परीक्षा कुणी घेतली? सत्तारांच्या मुलींना नोकरी मिळालेली नाही - देवेंद्र फडणवीस

12:14 (IST) 28 Dec 2022
Devendra Fadnavis: "टीईटीचा घोटाळा कुणाच्या काळात झाला?"

टीईटीचा घोटाळा कुणाच्या काळात झाला? तेव्हा सरकार काय करत होतं? राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा यांच्या सत्ताकाळात झाला. सनदी अधिकाऱ्यांपासून सगळे लोक टीईटीच्या घोटाळ्यात लिप्त होते. यांच्या काळात झालेल्या टीईटी घोटाळ्याचे तार मंत्रालयात गेले. तिथले अधिकारी त्यात अटक झाले. अब्दुल सत्तारांवर जो आरोप लावला जातोय, त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईटीच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही. याउलट प्रशासनाने खुलासा करून त्याच वेळी त्यांना अपात्र ठरवल्याचा खुलासाही केला आहे. पण एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. कोणत्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करायचे आणि निघून जायचं. त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ. आम्ही सोडणार नाही. - देवेंद्र फडणवीस

12:12 (IST) 28 Dec 2022
अब्दुल सत्तारांवरील कारवाईवरून विरोधक आक्रमक

मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनी जमिनीच्या, टीईटीच्या अनेक प्रकरणांत भ्रष्टाचार केला असल्यामुळे आणि सरकार त्यांना पाठिशी घालत असल्यामुळे, त्यांच्यावर कारवाई करत नसल्यामुळे आम्ही सभात्याग करत आहोत - दिलीप वळसे पाटील

Maharashtra Assembly Winter Session 2022 Live Updates

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन नागपूर लाईव्ह

Assembly Winter Session 2022 Live Updates, 28 December 2022 : विधिमंडळ अधिवेशनातील महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर